________________
पैशांचा व्यवहार (संक्षिप्त)
(१)
लक्ष्मीजीचे येणे-जाणे संपूर्ण जगाने लक्ष्मीलाच मुख्य मानली आहे ना! प्रत्येक कार्यात लक्ष्मीलाच प्राध्यान्य दिले जाते, म्हणून लक्ष्मीवरच जास्त प्रीति आहे. लक्ष्मीवर जास्त प्रीति आहे तोपर्यंत देवावर प्रीति जडत नाही. देवावर प्रीति जडली की लक्ष्मीवरची प्रीति उडून जाते. दोघांपैकी एकावर प्रीति असते, एक तर लक्ष्मीवर किंवा नारायणावर! तेव्हा तुम्हाला जिथे योग्य वाटेल तिथे राहा! लक्ष्मी वैधव्य देईल. लग्न केले तर वैधव्यही येणारच ना? आणि नारायण तर लग्नही लावत नाहीत आणि वैधव्यही देत नाहीत. निरंतर आनंदात ठेवतात, मुक्ततेच्या भावात ठेवतात..
म्हणजे गोष्ट तर समजून घ्यायला हवी ना? नुसत्या थापा मारुन कुठपर्यंत चालेल? आणि उपाधी तर कुणालाही नकोच असते. हा मनुष्य देह उपाधीपासून मुक्ती मिळविण्यासाठी आहे, केवळ पैसे कमविण्यासाठी नाही. पैसे कसे कमावतात? मेहनतीने कमावले जातात की बुद्धीने?
प्रश्नकर्ता : दोन्ही प्रकारे.
दादाश्री : जर मेहनतीने पैसे मिळत असतील तर मेहनत मजुरी करणाऱ्याजवळ बरेच पैसे असायला हवे होते. कारण हे मजूरच जास्त मेहनत करतात ना! आणि पैसे जर बुद्धीने कमावता येत असते तर हे सगळे पंडित आहेतच ना! पण त्यांच्या चपला तर मागून अर्ध्या झिजलेल्या