________________
पैशांचा व्यवहार
नावापुरते पुण्य म्हणता येईल. त्यानंतर, शारीरिक श्रम फार करावे लागत नाही पण बोलण्याची, म्हणजे वाणीची मेहनत करावी लागते, वकिलांसारखी, त्यास थोडी जास्त पुण्याई म्हणता येईल, श्रमजीवी पेक्षा. आणि त्याच्याही पुढे काय? तर वाणीची डोकेफोड करावी लागत नाही, शारिरीक श्रमाची झंझट नाही, केवळ मानसिक डोकेफोड करून कमाई करतो, तो जास्त पुण्यशाली म्हटला जाईल. आणि त्याच्याही पुढचे काय? नुसता संकल्प केला, त्याक्षणीच सर्वकाही हजर! संकल्प केला तेवढीच मेहनत. संकल्प केला की दोन बंगले आणि हे एक गोदाम, असा संकल्प केला की लगेच सर्व हजर! तो महा पुण्यवान. संकल्प केला तेवढीच मेहनत, बस. संकल्प करावा लागतो. संकल्प केल्याशिवाय होत नाही. थोडीतरी मेहनत पाहिजे ना!
संसार, हा बिना मेहनतीचे फळ आहे. म्हणून उपभोग करा. पण उपभोग करता सुद्धा आला पाहिजे. भगवंतांनी तर सांगितले आहे की या जगात जितक्या आवश्यक वस्तू आहेत, त्या जर तुला कमी पडल्या तर दुःख होणे स्वाभाविक आहे. या क्षणी हवाच बंद झाली, आणि श्वास पण घेणे अवघड होऊन जीव गुदमरायला लागला, तर आपण म्हणू शकतो हे लोक दुःखी आहेत. श्वासोच्छवास अवघडून जीव गुदमरु लागला असे वातावरण निर्माण झाले तर तिथे आपण दु:ख म्हणू शकतो. दुपारची वेळ झाली आणि दोन-तीन वाजेपर्यंत काही खायलाच मिळाले नाही, तर आपण समजू शकतो याला काही दुःख आहे. ज्याच्याशिवाय देह जिवंत राहू शकणार नाही, अशा ज्या आवश्यक वस्तू, त्या नाही मिळाल्या तर त्यास दुःख म्हणता येईल. ते सर्व तर आहेच, ढिगभर आहे, पण त्याचा उपभोगही करीत नाहीत. आणि दुसऱ्याच फंदात पडलेले आहेत. त्या उपभोगताच येत नाही. अजिबात नाही. कारण एक मिलमालक जेवायला बसला, तर बत्तीस प्रकारचे पदार्थ ताटात असतात. पण तो तर मनाने गिरणीत अडकलेला असतो. मालकीण बाईंनी विचारले, 'सांगा तरी आज कशाची भजी बनविली आहे?' तर तो म्हणेल 'मला माहित नाही, तू सारखी विचारु नकोस.' तर असा आहे हा सारा प्रकार.
हे जग तर असे आहे. इथे उपभोग घेणारे पण असतात आणि मेहनत करणारे पण असतात, सगळे सरमिसळ असते. मेहनत करणारा मानतो की