________________
पैशांचा व्यवहार
माणसाला कशी दु:खे असतात? एक माणूस मला म्हणाला की माझे बँकेत काहीच नाही. अगदी रिकामा झालो. नादार झालो. मी विचारले, 'देणे किती होते?' तर म्हणाला देणे नव्हते. मग तो नादार म्हटला जाणार नाही. बँकेत हजार, दोन हजार आहेत. नंतर मी विचारले 'बायको तर आहे ना?' तर तो म्हणाला 'बायको काय विकता येते?' मी म्हटले, 'नाही, पण तुझे दोन डोळे आहेत, ते तुला दोन लाखात विकायचे आहेत का?' हे डोळे, हे हात, पाय, डोके या सर्व मिळकतीची तू किंमत तर लाव. बँकेत दमडी पण नसली, तरी तू करोडपती आहेस. तुझ्याजवळ केवढी मोठी इस्टेट आहे. ती विकायची आहे का, बोल, हे दोन हात पण तू विकणार नाहीस. तुझ्याजवळ किती मोठी इस्टेट आहे. ही सर्व इस्टेटच आहे असे समजून समाधानाने राहायचे. पैसे येवोत किंवा न येवोत पण दोन वेळचे जेवण मिळाले पाहिजे.
प्रश्नकर्ता : जीवनात आर्थिक परिस्थिती खालावलेली असेल तर काय करावे?
दादाश्री : एक वर्ष पाऊस नाही पडला तर शेतकरी काय म्हणतात, की आमची आर्थिक परिस्थिती फार खालावली. असे म्हणणार की नाही? परत दुसऱ्या वर्षी पाऊस पडला तर त्यांची परिस्थिती सुधारते, म्हणून जेव्हा आर्थिक स्थिती खालावलेली असेल तेव्हा धीर धरायला हवा. खर्च कमी करून टाकावा आणि मिळेल त्या मार्गाने मेहनत, प्रयत्न वाढवायला हवेत. अर्थात् खालावलेली परिस्थिती असेल तेव्हा हे असे सर्व करावे. बाकी चांगली परिस्थिती असेल तेव्हा तर गाडी नीट रुळावर चालतच असते ना!
या देहाला आवश्यक तेवढेच अन्न पुरवण्याची गरज आहे. त्याला दुसऱ्या कशाचीही आवश्यकता नाही, नाहीतर हे त्रिमंत्र दररोज ऐकेक तास बोला ना! हे बोलल्याने आर्थिक परिस्थिती सुधारेल. म्हणजे याचा उपाय करायला हवा. उपाय केल्यावर परिस्थिती सुधारेल. तुम्हाला हा उपाय आवडेल का?
या दादा भगवानांचे नाव तासभर घेतले तर पैशांचा ढीग होईल. पण तसे करीत नाही ना! हजारो लोकांना पैसे मिळालेत! हजारो लोकांच्या