________________
६४
पैशांचा व्यवहार
प्रश्नकर्ता : आता लाच म्हणून पाचशे रुपये घेण्याची सूट दिली, तर मग जसजशी आवश्यकता वाढत जाईल तसतसे पैसे पण जास्त घेतले तर?
दादाश्री : नाही. तिथे तर एकच नियम, पाचशे म्हणजे पाचशेच. नंतर त्या नियमातच राहायला पाहिजे.
आता माणूस या काळात ह्या अडचणीतून कसे दिवस निभावणार? आणि त्यात जर त्याला कमी पडत असलेल्या पैशांची काही व्यवस्था होऊ शकली नाही, तर काय होईल? काळजीत सापडेल की हे जे पैसे कमी पडतात ते कुठून आणू? ही तर त्याची गरजही भागली, कमी पडलेले पैसे मिळाले. त्याचेही पझल सॉल्व्ह झाले ना? नाहीतर अशा परिस्थित तो चुकीच्या मार्गाने चालू लागेल, आणि मग संपूर्ण लाच घेण्याच्या आहारी जाईल. त्यापेक्षा हा मधला रस्ता काढला. म्हणजे त्याने अनीति केली, तरी पण ती नीतिच म्हटली जाईल, आणि त्याच्यासाठीही हे सोयीस्कर झाले की ही नीतिच म्हणायची. अन त्याचे घर-संसार पण चालेल.
__ वस्तुतः मी काय सांगू इच्छितो, हे जर समजले तर त्याचे कल्याण होऊन जाईल. प्रत्येक वाक्यात मी काय सांगू इच्छितो हे जर नीट लक्षात आले तर त्याचे कल्याण होईल. पण जर तो ही गोष्ट स्वतःच्या भाषेत घेऊन गेला तर काय होईल? प्रत्येकाची स्वत:ची स्वतंत्र भाषा असते. तो स्वत:च्या भाषेत आपल्या परीने फीट करतो, पण त्याच्या लक्षात हे येणार नाही की 'नियमाने अनीति कर!'
मी सुद्धा व्यापार-धंदा करणारा माणूस आहे. आमच्या वाट्याला सुद्धा धंदा-रोजगार-इन्कमटॅक्स हे सर्वकाही येते. आम्ही कॉन्ट्रॅक्टचा व्यवसाय करतो, तरी पण त्यात आम्ही संपूर्णपणे 'वीतराग' राहतो. 'वीतराग' कसे राहू शकतो? 'ज्ञाना'मुळे. अज्ञानामुळे तर लोक दुःखी होत आहेत.
प्रश्नकर्ता : 'खोटे' करण्याची इच्छा नसतानाही खोटे करावे लागते.
दादाश्री : जे नाईलाजाने करावे लागते, त्याचा पश्चाताप करायला हवा. अर्धा तास बसून पश्चाताप केला पाहिजे की, 'असे करायची इच्छा