________________
संपादकीय 'बिनहक्काचे विषयभोग नरकात घेऊन जातात,' 'बिनहक्काची लक्ष्मी तिर्यंचगतित(पशूयोनित) घेऊन जाते'
-दादाश्री संस्कारी घराण्यात बिनहक्काच्या विषयासंबंधीची जागृती बऱ्याच ठिकाणी दिसते परंतु बिनहक्काच्या लक्ष्मीसंबंधीची जागृती दिसून येणे खूप कठिण आहे. हक्काची आणि बिनहक्काची लक्ष्मी यांची सीमारेषाच सापडत नाही, तेही ह्या भयंकर कलियुगात !
परम ज्ञानी दादाश्रींनी त्यांच्या स्याद्वाद देशनेत आत्मधर्माच्या सर्वोत्तम टोकाचे सर्व स्पष्टीकरण केलेले आहे, इतकेच नव्हे, तर व्यवहार धर्माचे सुद्धा तितक्याच उच्च दर्जाचे स्पष्टीकरण दिले आहे. ज्यामुळे निश्चय आणि व्यवहार या दोन्ही समांतर पंखांनी मोक्षमार्गात झेप घेणे शक्य होते! आणि ह्या काळात व्यवहारात सर्वात विशेष प्राधान्य दिले गेले असेल तर ते केवळ पैशालाच! आणि हा पैशांचा व्यवहार जोपर्यंत आदर्शपणे होत नाही, तोपर्यंत व्यवहार शुद्धी शक्य नाही. आणि ज्याचा व्यवहार बिघडला त्याचा निश्चय बिघडल्याशिवाय राहणारच नाही! त्यासाठी ह्या काळाला अनुरुप पैशांच्या संपूर्ण दोषरहित आदर्श व्यवहाराचे सुंदर विश्लेषण दादाश्रींनी केले आहे. आणि असा दोषरहित आणि आदर्श लक्ष्मीचा (पैशांचा) व्यवहार दादाश्रींच्या जीवनात पाहायला मिळाला, तो या महा महा पुण्यवंतांना!
धर्मात, व्यापारात, गृहस्थजीवनात लक्ष्मी संबंधी स्वतः प्रामाणिक राहून दादाश्रींनी जगाला एक आश्चर्यजनक आदर्श दाखविला आहे. दादाश्रींचे सूत्र होते 'व्यापारात धर्म असावा परंतु धर्मात व्यापार नसावा.' धर्म आणि व्यापार या दोन्हींमध्ये आदर्शाची सांगड दर्शविली आहे ! दादाश्रींनी स्वत:च्या खाजगी जीवनात स्वखर्चासाठी कधीही कुणाचा एक पैसा सुद्धा स्वीकारला नव्हता. उलट स्वत:चे पैसे खर्च करून गावोगावी सत्संग देण्यासाठी जात असत, मग तो प्रवास ट्रेनने असो किंवा प्लेनने ! करोडो रुपये, सोन्याचे दागिने वगैरे भक्तजनांनी त्यांच्या पुढे ठेवले पण