________________
पैशांचा व्यवहार
लक्ष्मी ही तर बायप्रोडक्ट आहे. जसे, आपला हात चांगला राहील की पाय चांगला राहील याचा रात्रंदिवस विचार करावा लागतो का? नाही, कशामुळे? हाता-पायाची काय आपल्याला गरज नाही? आहे, पण त्याचा विचार करण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे लक्ष्मीचाही विचार करू नये. जर का आपला हात दुखत असेल तर त्याच्या उपचारापुरता विचार करावा लागतो, तसेच काही वेळा पैशांचाही विचार करावा लागतो, पण मग तेवढ्या पुरताच. नंतर विचार करण्याची आवश्यकताच नाही. दुसऱ्या भानगडीत पडायचे नाही. लक्ष्मीचे स्वतंत्र ध्यान करू नये. एका बाजूला लक्ष्मीचे ध्यान आहे, तर दुसऱ्या बाजूला दुसरे ध्यान आपण चुकत असतो. स्वतंत्र ध्यान लक्ष्मीचेच नव्हे, तर स्त्रीचे सुद्धा करायचे नसते. स्त्रीच्या ध्यानात रमला तर स्त्रीसारखा होऊन जाईल! लक्ष्मीच्या ध्यानात रमला तर लक्ष्मीसारखा चंचल होऊन जाईल. लक्ष्मी तर सर्व ठिकाणी फिरत राहते निरंतर, तसा तोही फिरतच राहतो. लक्ष्मीचे ध्यान तर करायचेच नसते. मोठ्यात मोठे रौद्रध्यान आहे ते, ते आर्तध्यान नाही, पण रौद्रध्यान आहे ! कारण स्वतःच्या घरी खायला प्यायला आहे, सर्वकाही आहे, तरीही आणखी जास्त लक्ष्मी मिळावी अशी आशा बाळगून असतो, म्हणजे दुसऱ्यांकडे तेवढी टंचाई पडायची. दुसऱ्याला टंचाई भोगावी लागेल, असे प्रमाण भंग करू नका. नाहीतर तुम्ही अपराधी ठराल! आपणहून सहजपणे आली तर त्याचा गुन्हा तुम्हाला लागत नाही. सहजपणे ५ लाख येवोत किंवा पन्नास लाख येवोत. पण मग आल्यानंतर लक्ष्मीला रोखून ठेवायची नसते. लक्ष्मी काय म्हणते? की आम्हाला रोखून ठेवण्याचा प्रयत्न करू नका, जितकी आली तितकी देऊन टाका.
लक्ष्मीचे अंतराय कुठवर असतात? जोपर्यंत कमाई करून घेण्याची इच्छा असते तोपर्यंत! पैशाकडे दुर्लक्ष झाले की मग ढिगभर येतात.
खाण्याची गरज नाही का? शौचाला जाण्याची गरज नाही का? तशीच लक्ष्मीचीही गरज आहे. संडास जसे आठवण न करता होते, तशीच लक्ष्मी सुद्धा आठवण न करता येते.
__ एक जमीनदार माझ्याकडे आला आणि मला विचारु लागला, 'जीवन जगण्यासाठी किती हवेत? माझ्याकडे हजार एकर जमीन आहे,