________________
६०
पैशांचा व्यवहार
आणि वसुली करायला गेल्यावर एखादा माणूस पैसे देत नसेल, त्याच्याजवळ पैसे नाहीत म्हणून तो देत नसेल, तर त्याचा अंत पाहत मागे लागू नये. तो आपल्याशी वैर बांधेल! आणि तो जर भूत झाला तर आपल्याला त्रास देईल. त्याच्याजवळ पैसे नाहीत म्हणून देऊ शकत नाही, त्यात त्याचा बिचाऱ्याचा काय गुन्हा? असून सुद्धा न देणारे असतात की नाही लोक?
प्रश्नकर्ता : असून सुद्धा देत नसतील तर काय करायचे?
दादाश्री : असून सुद्धा देत नसतील त्याला काय करणार आपण? जास्तीत जास्त म्हणजे दावा दाखिल करणार! दुसरे काय? त्याला मारहाण केली तर पोलिस आपल्याला पकडून नेतील ना?
खरेतर कोर्टात न जाणे हेच उत्तम. शहाणा मनुष्य कोर्टात जाणार नाही. माझे असतील तर मला मिळतील. नाही मिळाले तर राहिले. पण असल्या भूतांना परत बोलविणार नाही. विनाकारण भूते त्रास देतात. अजून केस जिंकेल तेव्हा जिंकेल पण त्या पूर्वी तर 'बेअक्कल आहात, गाढव कुठले! असे म्हणाणार. हे अकलेचे बारदान! आणि हा माणूस! गाढव नाही! प्रत्येक ठिकाणी असे बोलायचे असते का? आपल्याकडे ते भक्त
आहेत ना, वकील, ते म्हणतात, आम्ही सुद्धा असेच बोलतो. अरे, कशी निर्लज्ज माणसं आहात तुम्ही? हे तर ठीक आहे, की ती माणसं बिचारी सौम्य आहेत, म्हणून ऐकून घेतात. नाहीतर पायातली चप्पल काढून मारली तर काय अवस्था होईल तुमची?
तुमच्याकडून कुणी पैसे घेतले, त्या गोष्टीला तीन-चार वर्षे होऊन गेली, तर एखाद्या वेळी ती रक्कम कोर्टाच्या कायद्याच्या बाहेर सुद्धा निघून जाईल, पण निसर्गाचा कायदा तर कोणी तोडू शकत नाही ना! निसर्गाच्या कायद्यानुसार रक्कम व्याजासकट परत मिळते. इथल्या कायद्यानुसार काही मिळणार नाही, हा तर सामाजिक कायदा म्हणायचा पण त्या निसर्गाच्या कायद्यात रक्कम व्याजासकट परत मिळते. म्हणून कधी कुणी आपले तीनशे रुपये परत करत नसेल, तर आपण त्याच्याकडे पैसे परत घ्यायला जावे. परत मागण्याचे कारण काय? की हा माणूस मुद्दलच परत देत नाही, तर निसर्गाचे व्याज तर किती मोठे असते, शे-दोनशे वर्षात तर रक्कम