________________
४
करितात -- "श्रीमुक्तादेवी योगिनी । जे समस्त सिद्ध शिरोमणि । तिये प्रसादें चक्रपाणि । ज्ञान सिद्ध ।” आपल्या स्वतःचा उल्लेख चांगदेवानें या प्रकारें केला असेलसें वाटत नाहीं. शिवाय चक्रपाणि हें नांव वटेश्वराचे शिष्य म्हणजे मुक्ताबाई - चे प्रशिष्य म्हणून शिवकल्याणस्वामींनीं आपल्या गुरुपरंपरेंत स्वतंत्र दिलें आहे व तेथें चांगदेवाचा उल्लेख नाहीं. शिवकल्याणस्वामी म्हणतात - " तो तैसाचि रस वोसंडला। तव मुक्ताबाई प्रकाशला । प्राशुनि तैसाचि उरला । श्री वटेश्वरा दिधला तो ॥ वटेश्वराहुनी चक्रपाणी । लाधले हे अमृतसंजीवनी । विमलानंदी तेथुनी । लाघते झाले ।। " आणि या परंपरेचा उल्लेख करतांना श्री. पांगारकर यांनीं पृष्ठ ५२० वर मुक्ताबाई - वटेश्वर चांगा - चक्रपाणि - असा उल्लेख करून चांगा वटेश्वरास चक्रपाणिचे गुरु म्हणून नमूद केलें आहे. म्हणजे एकदां चक्रपाणि म्हणजे चांगदेव व नंतर चक्रपाणि म्हणजे चांगदेवाचे शिष्य असे दोन्ही परस्पर विरुद्ध उल्लेख श्री. पांगारकरांनी केले आहेत.
हा ग्रंथ लिहिणारा चांगदेव याबद्दलही बराच गोंधळ आहे. चांगदेव नांवाचे पांच चार पुरुष होऊन गेले. त्यांपैकीं या ग्रंथकाराचें नांव चांगा वटेश्वर आहे. महाराष्ट्र सारस्वतकार. भावे यांनी म्हटल्याप्रमाणें " या चांगदेवाचीं चरित्रे अनेकांनीं गाइलीं आहेत; पण त्या सर्वांत इतका घोंटाळा आहे कीं आज त्यापासून फारसें निष्पन्न कांहींच होत नाहीं. फक्त एवढेच म्हणण्यासारखें आहे कीं हा पुरुष प्रथम योगमार्गी असून पुढें भक्ति मार्गांत शिरला असावा. हा वयानें वृद्ध असून दीर्घायुषी असावा. हा प्रथम वटेश्वर या नांवाच्या गुरूचा शिष्य असावा व म्हणूनच यास चांगदेव वटेश्वर नांव पडलें असावें. " परंतु तत्वसार ग्रंथाचा उपलब्ध भाग वाचून चांगदेवाने दोन गुरु केले असावेत असें वाटत नाहीं. एक गुरु सोडून दुसरा गुरु करणाऱ्यावर चांगदेवानें जे सणसणीत कोरडे ओढले आहेत (पहा ओ. ९३० - ९५६ ) त्यांवरून स्वतः चांगदेवानें तसें केलें असेल असें म्हणवत नाहीं. गुरुत्याग व गुरुवध चांगदेवानें सारखेच मानले आहेत. निर्दैव माणसें स्वतः शुद्ध नसतात व मग गुरूवर गुरु करितात. एकलव्यासारखी किंवा सावित्रीसारखीं माणसें स्वतःवरच विश्वास ठेवतात व स्वतःच्या विश्वासाच्या सामर्थ्यावरच तरून जातात. असे उद्गार काढणारा चांगदेव स्वतःच दोन गुरु
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com