Book Title: Marathi - Tattvasara
Author(s): Changdev Vateshwar
Publisher: Prachya Granth Sangrahalay

View full book text
Previous | Next

Page 90
________________ बंधु-मूळबंध, जालंधरबंध व उडियानबंध हे तीन. यांच्या विषेश विवरणा साठी ज्ञानेश्वरोंतोल अ. ६ मधील १२ व १३ व्या श्लोकांवरील ओंव्या पहाव्यात. भेद-मागें सांगितलेल्या चक्रांचा भेद. मुद्रा--योगशास्त्रांत ध्यान करीत असतांना बोटांच्या विशिष्ट प्रकारच्या ठेवणी सांगितल्या आहेत त्या. (६५६) वज्रासन-एकप्रकारची मांडी घालगे. ज्ञानेश्वरी अ. ६ ओंव्या १९२ ते १९९ मध्ये मूळबंध व वज्रासना ची माहिती देऊन 'अर्जुना हे जाण, मूळबंधाचें लक्षण, वज्रासन गौण, नाम यासी' असे सांगितले आहे. निगतु-निघणारा. भरितु कीजे-भरावा. अपान द्वाराने बाहेर पडणारा वायु उलटा करून शरीरांत भरावा. (६५७) अघे-खालून. ऊर्धे-ऊर्चेचें अपभ्रष्ट रूप. खालून अडविला व वरून दाबला म्हणजे मध्ये भरणारा वायु आकुंचन करावा लागतो व या प्रमाणे आकुंचित झाला की तो उसळू लागतो. अंकुचिजे-आकुंचिजे. (६५८) सूतली प्रबोधे-प्रबोधे असे निरनुस्वार क्रियापद रूप वाचावें. निजलेली जागी होई. (६६०) आविस-आमिष, भक्ष्य. ग्रासिती-खाऊ लागली. तीन्ही चरणांतील क्रियांचा चालू लागली, पेलू लागली, व ग्रासू लागली असा अर्थ केला पाहिजे. Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com

Loading...

Page Navigation
1 ... 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112