Book Title: Marathi - Tattvasara
Author(s): Changdev Vateshwar
Publisher: Prachya Granth Sangrahalay

View full book text
Previous | Next

Page 99
________________ २४ (७६४) भांगारें - सुवर्णालंकार. या चरणांत १७ अक्षरें आहेत. पाए न व्हाती-- आधार होत नाहींत. पाया ह्मणजे आधार व व्हातो ह्मणजे होती. सूतला - निजला. ओं. आपुलांचि - स्वतःच. (७७०) ६५८ पहा. (७७३) अनुचित्तें - अनुचितें. खरें पाहिलें असतां बहुवचन 'कर्मों' असें पाहिजे. पण येथें विशेषणाचें बहुवचन व विशेष्यांचें एकवचन लेखणीच्या घसरण्यानें झालें असावें. न बंधिजसि - बद्ध होणार नाहींस, बांधिला जाणार नाहींस. (७७५) ध्वनित — मनांतील गोष्ट. (७७७) शिष्यचि - 'शिष्याचें' असा पाठ हवा. (७७९) घरोपरि - हा शब्द बहुधा 'परोपरी' असावा. परोपरी ह्मणजे प्रकार. 'प' च्या ऐवजीं चुकून 'घ' झाला असावा. (७८२) पाहालें —— पाहिलें. जिहीं हा कर्ता अध्याहृत आहे. आंधारें - दृष्टीचा संशय स्पष्ट न दिसणें. आज हाच शब्द 'आंधारी' या रूपांत वावरत आहे. (७८३) तोकरूपां — लहान मुलाच्या रूपानें वावरणाऱ्या जीवात्म्यास. Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com

Loading...

Page Navigation
1 ... 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112