Book Title: Marathi - Tattvasara
Author(s): Changdev Vateshwar
Publisher: Prachya Granth Sangrahalay

View full book text
Previous | Next

Page 107
________________ ३२ (९२८) विविधु-विधिरहित. ज्ञानी पुरुष विधिनिषेधरहित असतो हा संबंध. समंधु-संबंध. (९२९) रोगिया-रोगी, रोगयुक्त. (९३२) खाए हा खाणे या धातूचा प्रयोग सेवन करणे या अर्थी आहे. निंदा, पैशून्य खाणे ह्मणजे निंदा व चहाडी ऐकणे. अजूनहि शिव्या खाणे या प्रयोगांत खाणे या धातूचा उपयोग आहे. वस्तु करुनु ब्रह्म असूनहि, ब्रह्मप्राप्ति करूनहि. (९३३) पुश्चळीकें-पुंश्चली ह्मणजे शिनळ, जारिणी स्त्री. तिच्या त-हेनें झणजे एक सोडून दुसऱ्याचे सेवन करण्याच्या पद्धतीनें. चांगदेवाच्या अभंगांतही हा शब्द सांपडतो. 'पतिव्रते पुंश्चली सांगात झाला, दोहीतें भेटला एक देखा'. चां. अ. सं. १९. (९३४) येकुरु--येकुगुरु या ऐवजी लेखकप्रमादानें 'गु' गळून राहिलेले रूप. (९३५) सांडोवे-त्याग. सांडणे या धातू पासून झालेले नाम. चिखिमिखि-चोखांदळपणा. ओरडा आरड. 'चीखना' या हिन्दी धातूपासून हे रूप झाले असावें सें वाटतें. उपाओ-उपाय. य चा झाला व व मग झालें हे रूप. (९४४) त्रिशुद्धी--पूर्णपणानें, शुद्ध मनाने. या शब्दाची व्युत्पत्ति दोन प्रकाराने Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com

Loading...

Page Navigation
1 ... 105 106 107 108 109 110 111 112