Book Title: Marathi - Tattvasara
Author(s): Changdev Vateshwar
Publisher: Prachya Granth Sangrahalay

View full book text
Previous | Next

Page 106
________________ चांगली येते. यांत अनेक जातीच्या स्त्रीपुरुषांची नांवें आली आहेत. ८८१व्या ओंवी नंतर ९१२ पावेतोंच्या ओंव्या असलेली दोन पत्रे किंवा ४ पृष्ठे गहाळली आहेत. (९१४) दशी-'देशी' असा पाठ पाहिजे. (९१७) गुरुसेवो-गुरुसेवे असे असावेसे वाटते. शिवोऽस्मि-'अहं ब्रह्मास्मि' या वाक्याबद्दल 'शिवोहमस्मि' अशा वाक्याचा उपयोग आचार्यांनी सुरू केला. मी शिव आहे हा बोध. (९१९) आपणप्येनि-आपलेपणाने. 'गुरुसेवाबळे, जें अटक ऐसे आपणप्येनि फळले' हा अन्वय. अटक-अप्राप्य, न मिळण्या सारखें ; तेंही गुरुसेवेच्या सामर्थ्यामुळे आपण होऊनच प्राप्त झाले, हा भावार्थ. (९२२) तियें-ती आसने व भुवनें. (९२३) वाइजती-वाहाव्यात. खरा शब्दार्थ-वाहिल्या जाव्यात. (९२४) निरययोनिमाझारि-निरययोनि मध्यंतरी झणजे नरकयोनीत. मध्यांतरी चें मज्झात्री असें रूप होऊन माझारिं असें रूप झाले आहे. (९२६) अघोरि-भयंकर अशा. या पदावरून मागील दोन चरण ‘गुरुवचन मनि न धरी'; 'गुरुसिं अहंकार करी' असे एक वचनी असावेतसे वाटते. (९२७) विसुरे–विसरे. विस्मरणे पासून विसुरणे व मग विसरणे. Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com

Loading...

Page Navigation
1 ... 104 105 106 107 108 109 110 111 112