Book Title: Marathi - Tattvasara
Author(s): Changdev Vateshwar
Publisher: Prachya Granth Sangrahalay

View full book text
Previous | Next

Page 110
________________ (९९६) अळुमाळ-एवढेसें, 'अडुमाडु' या कानडी रूपापासून ड चा ळ होऊन हे रूप झालें. शिउ-शिव. चतुष्टय-मन, बुद्धि, चित्त व अहंकार या चार गोष्टी. पहा ओवं. ६२९. (१०००) शषासि–'शेषासि', असा पाठ हवा. (१००३) लिहि--इकारांत नाम. लिहिणे हा अर्थ. (१००५) बोहरी-निरास. अवहरणे याचे जागी वोहरणे रूप होऊन त्याचे इकारांत नाम वोहरी. व व ब च्या अभेदानें बोहरी असें रूप होते. निदसुरी-पूर्णपणानें. न दुसरी याचेच बोलींत झालेले रूप. दुसरें कांहीं न राहतां या अर्थी हा शब्द वापरला जातो. (१००९) जालेपणे--स्वयं ब्रह्म झाल्याच्या योगानें. जाहलेपणे बद्दल जालेपणे असा शब्द वापरला जातो. (१०१३) चंद्रबिंबि-चंद्राचे मंडल उगवलें असतां. (१०१४) मीनला–मिळाला, एकरूप झाला. (१०१७) येकवाटले–एकवटलें, एकवट ह्मणजे एकरूप. हा वट प्रत्यय घन, तिक्त, क्षार इत्यादि शब्दांत लागूनच घणवट, तिखट, खारट इत्यादि शब्द झाले आहेत. वट प्रत्ययही संस्कृत 'वत्' चाच अपभ्रंश आहे. कटवत्-कडुवट-कडवट-कटुस्वरूप. Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com

Loading...

Page Navigation
1 ... 108 109 110 111 112