Page #1
--------------------------------------------------------------------------
________________
શ્રી યશોવિજયજી
જૈન ગ્રંથમાળા
घाघासाहेब, लावनगर.
शेन : ०२७८- २४२५३२२
३००४८४९
गदेव वटेश्वर
कृत
तत्वसार
प्राच्य ग्रंथसंग्रहालय – उज्जयिनी.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #2
--------------------------------------------------------------------------
________________
॥ श्री ॥
चांगदेव वटेश्वर कृत तत्वसार.
संपादक
डॉ. ह. रा. दिवेकर,
साहित्याचार्य, एम्. ए., डी.
रा. ब. लक्ष्मण भास्कर मुळे
यांच्या
प्राक्कथनासह.
प्रकाशक
प्राच्य ग्रंथसंग्रहालय - - उज्जयिनी.
`^^^^^^ ~~
आलीजाह दरबार प्रेस, ग्वाल्हेर.
किंमत रु० १.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #3
--------------------------------------------------------------------------
________________
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #4
--------------------------------------------------------------------------
________________
॥श्री॥
प्राक्कथन.
ग्वाल्हेर संस्थानांतील प्रजाजनांचे अनेक प्रकारे हित करणाऱ्या व आपल्या राज्यांत भिन्न भिन्न प्रकारच्या जनहितकारक संस्था स्थापन करणाऱ्या आमच्या क० माधवराव महाराजांच्या मनांत प्राचीन ग्रंथांचा संग्रह करण्याची कल्पना बरीच वर्षे घोळत होती. परंतु त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे त्यांच्या हयातीत या कल्पनेस मूर्त स्वरूप येऊ शकले नाही. निघृण काळाने त्यांना या लोकांतून अकालींच उचलून नेल्याने त्यांच्या अशा कित्येक कल्पना अमूर्तावस्थेतच राहिल्या असतील. प्रस्तुत "प्राच्य ग्रंथसंग्रहा" ची योजनाही, त्यांच्या पश्चात् त्यांच्या ज्या काही अपूर्ण राहिलेल्या आकांक्षा कौन्सिलने यथामति व यथाशक्ति पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, त्यांपैकी एक होय.
हा संग्रह कोठे करावा याविषयों बरेच दिवस विचार चालला होता. त्यांत या संग्रहास, अत्यंत प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेली, एका काळी सर्व विद्यांचें व विशेषतः ज्योतिष विद्येचे आद्यपीठ म्हणून नावाजलेली, सप्त पुरोंत अग्रगण्य असलेली, पवित्र उज्जयिनी नगरी योग्य वाटली व त्याप्रमाणे हे ग्रंथ संग्रहालय उज्जयिनीस स्थापन करण्याचे ठरविण्यात आले आणि पुढे सन १९३१ या वर्षी बडोदे संस्थानचे अधिपति श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांनी उज्जयिनीस भेट दिली तेव्हां त्यांनीहि पण, या कार्यास हेच स्थल योग्य अशी आपली संमति दर्शविली. ___ वरील ठरावाप्रमाणे उज्जयिनीस या संग्रहालयाची स्थापना आरंभी शहरांत एका मध्यवस्तीच्या ठिकाणों करून त्यासाठी सोळा सभासदांचें एक व्यवस्थापक मंडळ नेमण्यांत आले. “अल्पारंभः क्षेमकरः" या न्यायाने पहिली दोन वर्षे त्याचे कार्य बहुतेक सावकाशच चालले होते. पुढे सन १९३३ सालों या संस्थेचे चालकत्व श्रीयुत केशवराव डोंगरे यांचे हाती आले व त्यांनी आपल्या धडाडीच्या स्वभावास अनुसरून या कार्यास जोराची चालना दिली. सभासद,
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #5
--------------------------------------------------------------------------
________________
ग्रंथ - निरीक्षक व संरक्षक, यांची निवड वगैरे सर्वच बाबतींत त्यांनी सुधारणा घडवून आणली असून हल्लीं संग्रहालय स्थानीय माधव कॉलेजच्या भव्य दिवाणखान्यांतील प्रशस्त ग्यालरींत नेलें आहे आणि संग्रहांतील ग्रंथांच्या संरक्षणाचें काम ओघानेंच कॉलेजचे प्रिंसिपॉल श्रीयुत ताटके यांच्या कडे सोंपविण्यांत आले असून तेव्हांपासून या संस्थेवी सारखी भरभराटच होत आहे. आज या संग्रहालयांत ग्रंथांची संख्या सुमारें पांच हजारांवर गेली आहे.
या संग्रहालयाच्या स्थापनेचे मुख्य उद्देश तीन आहेत :
'==
(१) शंभर वर्षा पूर्वीचे संस्कृत, मराठी, पारशी व अरबी हस्तलिखित ग्रंथ एकत्र करावे, (२) जिज्ञासु अभ्यासकांना हवा तेव्हां त्यांचा उपयोग करून घेता यावा, आणि (३) अप्रसिद्ध पण महत्वपूर्ण अशा ग्रंथांचें प्रकाशन व्हावें, हे ते उद्देश होत. ज्ञानाभिवृद्धीच्या दृष्टीनें हे तिन्ही उद्देश अत्यंत लोकोपकारक आहेत हें सांगावयास नकोच.
ग्रंथांचा संग्रह करण्यास सुरुवात केली तेव्हां छापवून प्रसिद्ध करण्यास योग्य असे कितीसे ग्रंथ सांपडतील याविषयीं शंकाच होती. परंतु जसजसे ग्रंथ हस्तगत होत गेले तसतशी ही शंका निवृत्त होऊन अशा प्रकारचे ग्रंथ बरेच दिसूं लागले. ज्या ग्रंथाविषयीं हें "प्राक्कथन" आम्हीं लिहीत आहोंत तो ग्रंथ याच मालिकेंतला होय. तो नुसता अप्रकाशितच नव्हे तर अलभ्यहि पण आहे.
मराठी भाषेतील सुप्रसिद्ध संत -- कवी श्रीज्ञानेश्वर महाराज यांचे किंवा ( श्रीयुत पांगारकरांच्या लेखाप्रमाणें ) त्यांच्या कनिष्ठ भगिनी श्रीमुक्ताबाई यांचे उपदेशित योगिराज वटेश्वर चांगदेव ( चांगा वटेश्वर) हे या ग्रंथाचे कर्ते होत. मराठी वाङमयांत या ग्रंथाचें नांवदेखील कोणास माहित नव्हतें, व त्यामुळे उपोद्घातांत लिहिल्याप्रमाणें सरस्वतीच्या महाराष्ट्रीय भक्तांतून या ग्रंथकाराची बहुतेक उचलबांगडीच झालेली होती. परंतु हा ग्रंथ उपलब्ध झाल्यावर त्या संबंधानें येथील उत्साही साहित्यसेवक डॉ. दिवेकर यांनीं एक त्रोटक लेख प्रसिद्ध केला व त्यावरून श्रीयुत पांगारकरांनीं आपल्या "मराठी वाङ् मयाच्या इतिहासांत " या ग्रंथाचा आदरपूर्वक उल्लेख करून ग्रंथकाराचा गौरवहि केला आहे. हल्लीं सांपडलेला हा ग्रंथ त्रुटित आहे, पण तो प्रसिद्ध झाल्यावर संपूर्ण ग्रंथ मिळण्याचाहि संभव आहे.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #6
--------------------------------------------------------------------------
________________
या संग्रहालयाची आतां कायमची व्यवस्था सरकारांतून झाली असून राज्यांतील लोकांकडे गाबाळांत पडल्यामुळे मागे पुढे नष्ट होणारे व तसेच मालकांस तादृश उपयोग नसूनहि नुसते जतन करून ठेविलेले प्राचीन दुर्मिळ ग्रंथ, मालकाच्या इच्छेप्रमाणे विनामूल्य किंवा योग्य मोबदला देऊन हस्तगत केले आहेत. तसेंच राज्याबाहेर जालवण, गुलसराय, मोरट, बनारस, पुणे, त्रावणकोर, या ठिकाणांहूनही असे अनेक ग्रंथ मिळविले आहेत व पुढेही मिळविण्याचे प्रयत्न चालू आहेत. तरी पण ग्रंथ संग्रहालय म्हटले की त्याला असे ग्रंथ मिळतोल तितके मिळविण्याची इच्छाही नेहमीच असावयाची, ही गोष्ट उघड होय. यास्तव ज्यांच्या संग्रही अशा प्रकारचे प्राचीन ग्रंथ असतील त्यांनी ते वर सांगितल्याप्रमाणे फुकट अथवा योग्य किंमत घेऊन देण्याची कृपा केल्यास त्यांचा संग्रहालयांत साभार स्वीकार केला जाईल.
तूर्त संग्रहालयांतोल संग्रहोत ग्रंथांपैकी प्रस्तुत "तत्वसार" हा पहिलाच ग्रंथ प्रकाशित होत आहे, व त्यासंबंधाने आवश्यक असलेली सर्व माहिती संपादकाने उपोद्घातांत व टोपांत दिलेलोहि आहे तेव्हां त्याविषयों येथे विशेष लिहिण्याचे अर्थातच कांहीं प्रयोजन नाही. साहित्यप्रेमो लोकांकडून त्याचें अवश्य स्वागत होईल असा भरवसा वाटतो.
सरते शेवटी, ज्या कौन्सिलने या संग्रहालयाची सर्व व्यवस्था करून हा ग्रंथ प्रसिद्धीस आणण्याची संधि दिलो त्यांचे आभार मानणे उचित होय. वस्तुतः या ग्रंथाच्या प्रकाशनाचे श्रेय लवकरच आपल्या राज्याची सूत्रे हाती घेणान्या आमच्या महाराजांकडे आहे. त्यांनों दिलेल्या उत्तेजनामुळे हे काम अगोदर हाती घेऊन ते शेवटास नेतां आलें आहे, हे सांगण्यास आनंद वाटतो, व म्हणूनच त्यांच्या कारकिर्दीत या संग्रहालयाचे कार्य चांगले वाढीस लागेल व अधिक चांगले होईल अशी दृढ आशा आहे.
मुक्काम लष्कर, ग्वाल्हेर, मंगळवार, ज्येष्ठ वद्य १२, शके १८५८, ता. १६ । जून सन १९३६.
ल. भा. मळे,
शिक्षण मंत्री.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #7
--------------------------------------------------------------------------
________________
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #8
--------------------------------------------------------------------------
________________
चांगदेव वटेश्वराचा " तत्वसार.
""
उपोद्र्घात
सन १९३३ च्या आक्टोबरमधील गोष्ट. ग्वाल्हेर सरकारनें सुरू केलेल्या प्राच्यवाङ्मय ग्रंथसंग्रहालयाचें काम चालविणाऱ्या श्री. के. ब. डोंगरे यांचे घरीं कांहीं जुन्या पोथ्या पहात असतांना एका वाण्याकडून रद्दी म्हणून विकत आणलेल्या एका गट्ट्यांतलीं दोन पाने माझ्या दृष्टीस पडली. त्यांतील मजकूर ओंवीबद्ध असून त्यांची भाषा जुन्या वळणाची वाटल्यानें मी कारकुनास त्याच प्रकारची सगळी पाने गोळा करावयास सांगितली. शेवटलें पान पहातां पहातां 'श्रीवटेश्वरार्पणमस्तु' हा शेवट पाहून थोडें आश्चर्य वाटलें. "ऐसी चतुर्विध भक्ती रसाळ । वोविया दसाउशत रत्नमाळ । वाइली वटेश्वर चरणयुगळा । चांगा म्हणे" ही शेवटली ओंवी पाहून उत्सुकता वाटली व “शके चौतिसें बारा । परिधावी संवत्सरा। मार्गशिर शुद्ध तीज रविवार । नाम संख्य ।" ही ओंवी वाचून ज्ञानेश्वर समकालीन चांगदेवाचाच हा ग्रंथ असावा ही खात्री वाटून विलक्षण आनंद झाला. हा ग्रंथ पुरा मिळावा म्हणून पुष्कळ खटपट केली पण ती सिद्धीस गेली नाहीं. नागपूर येथें सन १९३३ च्या अखेरीस जें मराठी साहित्य संमेलन झालें त्यांतील प्रदर्शनांत या ग्रंथाची जितकीं पाने मिळाली तितकीं ठेवलीं व प्रो. पोतदारांसारख्या इतिहास संशोधकांची ग्रंथाच्या प्राचीनत्वाबद्दल खात्री झाल्यावर प्राच्य ग्रंथसंग्रहालयाच्या ग्रंथमालेंत प्रथम पुष्प म्हणून या त्रुटित ग्रंथाचें प्रकाशन व्हावयाचें ठरलें. त्याप्रमाणें हें खंडित का होईना पण दुर्मिळ पुष्प आज महाराष्ट्र रसिकांपुढे सादर केलें जात आहे.
जुन्या ग्रंथांचा कोठे, केव्हां व कसा शोध लागेल, हें सांगतां येत नाहीं. आतांच पहाना, तापी तीरीं राहणारा चांगदेव कोठें व महाराष्ट्रापासून दूर अंतरावर
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #9
--------------------------------------------------------------------------
________________
असलेल्या ग्वाल्हेरींतील एक वागो कोठें ? आजपर्यंत अशा वाण्यांकडे आलेल्या किती तरी पोथ्या तुकडे होऊन पुड्या बांधण्याचे कामी आल्या असतील किंवा भिजवून कुटल्या जाऊन त्या रांध्याच्या टोपल्या होण्याचे कामी लागल्या असतील ? 'भग्न पृष्ट कटि ग्रीव' होऊन लेखकानें पोथी लिहावी, पण तिची किंमत नसणाऱ्यांच्या हातीं पडून तिची अशी दुरावस्था व्हावी, याहून दुसरें दुर्दैव तें कोणतें? पण आनंदाची गोष्ट आहे कीं उशीरानें कां होईना आम्हां लोकांचे डोळे उघडत आहेत व दिवसेंदिवस असे ग्रंथ नष्ट होण्याची भीति कमी होऊन ते संशोधकांचे हाती पडण्याचा संभव अधिकाधिक होत आहे.
या तत्वसाराची पोथी १०" X५” आकाराच्या जाड दुपदरी कागदावर काजळी शाईनें लिहिली आहे. प्रत्येक पृष्ठावर अकरापासून चौदापर्यंत ओळी आहेत, म्हणजे सामान्यतः प्रत्येक पृष्ठावर बारापासून पंध्रापर्यंत ओंव्या आहेत. दोन्ही पृष्ठे मिळून एका पत्रावरील ओवीसंख्या पंचवीस ते बत्तीस आहे. मूळ लेखकानें या पोथीचीं अशीं छत्तीस पत्रे लिहिली. पण त्यांपैकी फक्त पंधरा उपलब्ध झालीं. उपलब्ध पत्र पुढीलप्रमाणे :--
पत्रांक .
पृष्ठे.
१
१
२१ ते ३०
३२ व ३३
३५ व ३६
ओंवी संख्या.
१-- १३ = १३ ५९०-- ८८१ = २९२ ९१२ - ९६५ =
५४
९९२ – १०३६ =
४५
१५
२९
लेखकानें ही पोथी १४८३ शकांत दुर्मति संवत्सरी आषाढ शुद्ध १ शुक्रवारी पाथरी मुक्कामीं लिहिली आहे. लेखकाचें नांव बोप्प पाठक असें आहे.
४०४
पत्र नं. ३६ वर मूळ लेखकानें आपलें नांव, गांव व लेखनकाल सांगितला आहे. वटेश्वराचा शिष्य चांगदेव हा या तत्वसाराचा लेखक असून ग्रंथाचा लेखनकाल शालिवाहन शक १२३४ परिधावी संवत्सर आहे. हरिश्चंद्र नांवाच्या
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #10
--------------------------------------------------------------------------
________________
पर्वतावर जेथून मंगळगंगा नांवाची नदी निघते व जेथील महादेवाची केदारेश्वराशी तुलना केली जाते त्या ठिकाणी मार्गशीर्ष शुद्ध ३ रविवारी ग्रंथ समाप्त झाला आहे. श्रीयुत ल. रा. पांगारकर यांच्या मतानें 'नगर जिल्ह्यांत आकोले तालुक्यांत एक हरिश्चंद्राचा डोंगर आहे, तेंच हे स्थान असावें'. पण याबद्दलचा कायम निश्चय अजून झालेला नाही. ___ ग्रंथाचा रचणारा चांगदेव वटेश्वर याबद्दल महाराष्ट्र सारस्वत लेखक कै० भावे यांनी असे म्हटले होते की “याच (ज्ञानेश्वर) काळाच्या ग्रंथकारांपैकी ज्याचें नांव मात्र सर्वत्र प्रसिद्ध आहे पण ज्याचे ग्रंथ फार उपलब्ध नाहीत असा चांगदेव हा ग्रंथकार होय." व "उत्तर पंचविशी या नांवाचे एक प्रकरण, एक आरती व सुमारे पांच पंचवीस अभंग इतकीच याची कृति हल्ली उपलब्ध आहे." ही कृति अत्यंत थोडी व तीही पूर्णविश्वासार्ह अशी नसल्यामुळे महाराष्ट्र सारस्वताच्या नवीन आवृत्तीतून या ग्रंथकाराची उचलबांगडी झाली. चांगदेवाचे ग्रंथ एकनाथांस चांगलेच माहीत असावेत असे त्याने आपल्या भागवताचे आरंभींच लिहिलेल्या "वंदूं प्राकृत कवीश्वर। निवृत्ति प्रमुख ज्ञानेश्वर। नामदेव चांगदेव वटेश्वर । ज्यांचे भाग्य थोर गुरु कृपा।। जयांचे ग्रंथ पाहतां। ज्ञान होय प्राकृतां। तयांचे चरणीं माथा। निजात्मता निजभावें॥" या ओंव्यावरून स्पष्ट दिसत आहे. पण हा ग्रंथ जर मिळाला नसता तर चांगदेवाचे नांव महाराष्ट्र सारस्वतांतून हळू हळू लुप्त झाले असते. पण हा मिळाल्यावर आतां तसे होण्याची भीति राहिली नाही. श्री. पांगारकर यांनी आपल्या 'मराठी वाङमयाचा इतिहास, खंड १ ला-ज्ञानेश्वर नामदेवांचा काल' या ग्रंथांत जरी चांगदेवाचे वर्णन ग्रंथकार म्हणून केलेले नसले, तरी बडोद्याच्या सहविचार त्रैमासिकांत वर्ष १२, अंक ४ यांत यावर एक लेख प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्या 'एकनाथ तुकारामांचा काल' या दुस-या खंडांत ६ पाने चांगदेव वटेश्वराच्या तत्वसारावर प्रसिद्ध करून चांगदेवास मराठी वाङमयाच्या इतिहासांत पुन्हा स्थान दिले आहे.
याच खंडांत केलेल्या एका विधानाबद्दल मात्र थोडे लिहिले पाहिजे. पृष्ठ ३ वर श्री. पांगारकरांनी लिहिले आहे की चांगदेव याचेच चक्रपाणि हे दुसरें नांव असावें. पण ते बरोबर वाटत नाही. सिद्धपंथ सांगतांना चांगदेव वर्णन Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #11
--------------------------------------------------------------------------
________________
४
करितात -- "श्रीमुक्तादेवी योगिनी । जे समस्त सिद्ध शिरोमणि । तिये प्रसादें चक्रपाणि । ज्ञान सिद्ध ।” आपल्या स्वतःचा उल्लेख चांगदेवानें या प्रकारें केला असेलसें वाटत नाहीं. शिवाय चक्रपाणि हें नांव वटेश्वराचे शिष्य म्हणजे मुक्ताबाई - चे प्रशिष्य म्हणून शिवकल्याणस्वामींनीं आपल्या गुरुपरंपरेंत स्वतंत्र दिलें आहे व तेथें चांगदेवाचा उल्लेख नाहीं. शिवकल्याणस्वामी म्हणतात - " तो तैसाचि रस वोसंडला। तव मुक्ताबाई प्रकाशला । प्राशुनि तैसाचि उरला । श्री वटेश्वरा दिधला तो ॥ वटेश्वराहुनी चक्रपाणी । लाधले हे अमृतसंजीवनी । विमलानंदी तेथुनी । लाघते झाले ।। " आणि या परंपरेचा उल्लेख करतांना श्री. पांगारकर यांनीं पृष्ठ ५२० वर मुक्ताबाई - वटेश्वर चांगा - चक्रपाणि - असा उल्लेख करून चांगा वटेश्वरास चक्रपाणिचे गुरु म्हणून नमूद केलें आहे. म्हणजे एकदां चक्रपाणि म्हणजे चांगदेव व नंतर चक्रपाणि म्हणजे चांगदेवाचे शिष्य असे दोन्ही परस्पर विरुद्ध उल्लेख श्री. पांगारकरांनी केले आहेत.
हा ग्रंथ लिहिणारा चांगदेव याबद्दलही बराच गोंधळ आहे. चांगदेव नांवाचे पांच चार पुरुष होऊन गेले. त्यांपैकीं या ग्रंथकाराचें नांव चांगा वटेश्वर आहे. महाराष्ट्र सारस्वतकार. भावे यांनी म्हटल्याप्रमाणें " या चांगदेवाचीं चरित्रे अनेकांनीं गाइलीं आहेत; पण त्या सर्वांत इतका घोंटाळा आहे कीं आज त्यापासून फारसें निष्पन्न कांहींच होत नाहीं. फक्त एवढेच म्हणण्यासारखें आहे कीं हा पुरुष प्रथम योगमार्गी असून पुढें भक्ति मार्गांत शिरला असावा. हा वयानें वृद्ध असून दीर्घायुषी असावा. हा प्रथम वटेश्वर या नांवाच्या गुरूचा शिष्य असावा व म्हणूनच यास चांगदेव वटेश्वर नांव पडलें असावें. " परंतु तत्वसार ग्रंथाचा उपलब्ध भाग वाचून चांगदेवाने दोन गुरु केले असावेत असें वाटत नाहीं. एक गुरु सोडून दुसरा गुरु करणाऱ्यावर चांगदेवानें जे सणसणीत कोरडे ओढले आहेत (पहा ओ. ९३० - ९५६ ) त्यांवरून स्वतः चांगदेवानें तसें केलें असेल असें म्हणवत नाहीं. गुरुत्याग व गुरुवध चांगदेवानें सारखेच मानले आहेत. निर्दैव माणसें स्वतः शुद्ध नसतात व मग गुरूवर गुरु करितात. एकलव्यासारखी किंवा सावित्रीसारखीं माणसें स्वतःवरच विश्वास ठेवतात व स्वतःच्या विश्वासाच्या सामर्थ्यावरच तरून जातात. असे उद्गार काढणारा चांगदेव स्वतःच दोन गुरु
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #12
--------------------------------------------------------------------------
________________
करणारा असेल असें संभवत नाहीं व असें म्हणावयास यत्किचित् हरकत वाटत नाहीं कीं चांगदेवाचा गुरु एक वटेश्वरच. मग तो वटेश्वर कोणी असो !
आतां या वटेश्वराची तत्वसारांत काय माहिती सांपडते तें पाहूं. प्रारंभीचें गणेश शारदा वंदनानंतरचें गुरुवंदन सांपडलें असतें, तर या प्रश्नावर बराच प्रकाश पडला असता. पण तें जरी सांपडलें नाहीं तरी वटेश्वराचा उल्लेख बरेच ठिकाणीं आला आहे. चांगदेवानें निर्गुण भक्तीचा अनुवाद वटेश्वर प्रसादानें केला आहे. जें जाणल्यानें जाणीवेचा शेवट होतो तें वटेश्वराचें रूप वटेश्वर होऊनच चांगदेव सांगत आहे. त्रिगुण गोप्य गव्हर वटेश्वरस्वामीच्या प्रसादाने चांगदेवाचा संसार नाहींसा झाला व वटेश्वरानेंच आत्मब्रह्म दाऊन चांगदेवास चांगदेवाचें स्वरूप सांगितलें. गुरुशिष्य एक झाले, ही एक होण्याची भावना नाहींशी झाली व ती नाहींची भावना वटेश्वराचे ठिकाणी राहिली. चांगदेवाने ही ग्रंथरूपी पूजा गुरुवटेश्वरास वाहिली. या प्रकारचें अवधूत चांगदेवानें किंवा वटेश्वराच्या सुतानें वर्णन केलें आहे. या सर्व उल्लेखावरून चांगदेवाचे ज्ञानमार्गांतील व योगमार्गांतील गुरु वटेश्वर एकच आहेत असें वाटतें. वटेश्वर जर नुसते योगसिद्धच असते तर वरील ज्ञान त्यांचे कृपाप्रसादानें झालें, असें म्हणून वटेश्वराची मिथ्या स्तुति व ज्ञानगुरुविषयीं अकृतज्ञता चांगदेवानें केव्हांहि नसती दर्शविली शिवाय योगी वटेश्वराचा उल्लेख योगसिद्धांच्या नामावळींत न येणें आश्चर्यकारक नव्हे काय ? त्या मालिकेंत मत्स्येंद्र चौरंगी, गोरक्ष व मुक्तादेवी एवढ्यांचा उल्लेख चांगदेव करितात यावरून वटेश्वर त्या मार्गांतील असतील असा संभव कमी वाटतो.
चांगदेवांचे अभंग पाहतांही वटेश्वर नांवाचा त्याचा योगमार्गी कोणी गुरु होता असें वाटत नाहीं. रा. गोंधळेकरांनी प्रसिद्ध केलेल्या ज्ञानदेवाच्या गाथेंत चांगदेवाचे म्हणून ४६ अभंग दिले आहेत. त्यांतही वटेश्वराचा योगाशीं कोठेच संबंध लावलेला नाहीं. उलट जेथें जेथें वटेश्वराचा संबंध आहे तेथें तेथें तो ज्ञानाशींच आहे. उदाहरणार्थं अभंग ८ मध्ये चांगदेव म्हणतात. 'चांगा वटेश्वरी सोहं झाला । अवघाचि बुडाला ज्ञान डोहीं.' अभंग २० मध्ये 'डोळां लावुनि निजीं निजेला
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #13
--------------------------------------------------------------------------
________________
निवांत। स्वप्नी वटेश्वर देखिला निवांत.' जिवींचे हितगुजज्ञान कोणी सांगितलें तर चांगदेव वर्णन करितात 'चांगा म्हणे जिवींचे गुज, वटेश्वरें मज सांगितले'. (अभंग ३४) शेवटी शेवटी अभंग ४५ मध्ये तर स्पष्टच उल्लेख आहे की 'चांगा सोय धरो ज्ञान-वटेश्वरों। मुक्ताई जिव्हारी बोध करी।' या सर्व अभंगांतून वटेश्वरावा योगमार्गाशों कोठेही संबंध चांगदेवाने सांगितलेला नाही. तेव्हां चांगदेवांच्या या प्रत्यक्ष उल्लेखाविरुद्ध नुसत्या दंतकथांवर उभारलेले वटेश्वराचे योगमार्ग-संबंध प्रमाणभत मानतां येत नाहीत.
___ मग हा वटेश्वर होता तरी कोण? ज्ञानदेवांची भेट होईपर्यंत चांगदेव कोराच होता. अनेक सिद्धोंनी युक्त असून चांगदेवाचें कोरेपण, ईश्वराशी प्रत्यक्ष भेट होत असतांही नामदेवाच्या कच्चेपणासारखेच होते. हे कोरेंपण घालविण्यासाठी ज्ञानराजांनी चांगदेवास चांगदेव पासष्टी लिहून पाठविली. पण तिचा अर्थ त्यास कळेना. तेव्हां श्री. मुक्ताबाईंनी चांगदेवास विश्रांति-वटाखाली त्या चांगदेव पासष्टीचा अर्थ सांगितला व चांगदेवास ईश्वरस्वरूप करून दिले. या दंतकथेवरून वटाखाली दाखविलेल्या स्वतःचे ईश्वरस्वरूपाशी एकजीव झालेला चांगदेव तर पुढे वट +ईश्वर=वटेश्वर या नांवाने ओळखिला जात नसेल ना? म्हणजे मळचा चांगदेव वटाखालों ईश्वर झाल्यामुळे चांगावटेश्वर झाला असावा. वटेश्वर म्हणजे दुसरें कोणी नसून चांगदेवाच्या अंतर्यामी प्रकाशणारें ईश्वर स्वरूप. या कयनेस मान्यता दिली म्हणजे सारी कोडी उलगडतात. 'गुरूनुं शिष्याचा घोंटु भरून', 'तंव शिष्य मुखों प्रवेशला', 'गुरु शिष्य एक झाले तें झालें पणहि गेले, गेले पण राहिलें, वटेश्वरि' इत्यादि तत्वसारांतील वाक्यांचा, बोध स्पष्ट होतो. अभंगांतली अनेक स्थळे उलगडतात. उदाहरणार्थ मागें उल्लेखिलेला चरण आतां अधिक स्पष्ट समजतो. 'चांगया सोय धरी ज्ञान वटेश्वरी' ही मुक्ताबाईची भाषा ज्ञानरूप वटेश्वर मानला तर अधिक समर्पक होईल. अभंग २२ मध्ये 'मुक्ताई म्हणे नांव पै ठेवीन, सुता बोलवीन वटेश्वरा,' याचा अर्थ या कल्पनेनुरूप जास्त चांगला लागतो. शिवाय ४६ अभंगांपैकी ५ अभंगांत चांगदेव हे नांव मुळीच नसून नुसते वटेश्वर हेच नांव आहे. तत्कालीन कवींच्या Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #14
--------------------------------------------------------------------------
________________
आपल्या प्रत्येक अभंगांत आपल्या नांवाची छान घालण्याच्या पद्धतीकडे लक्ष्य दिलें तर वटेश्वर हैं स्वतःचें नांव नसतांना चांगदेवाने घातलें असेल असें संभवत नाहीं. चांगदेवासारख्या वयोवृद्ध व सिद्ध पुरुषाचे गुरु होण्यापेक्षां त्यास स्वस्वरूपाचाच शिष्य करणें मुक्तादेवीस अधिक योग्य वाटलें असेल. वटेश्वराचें कोडें दुसऱ्या एखाद्या अधिक बळकट पुराव्याने सुटेपावेतों वटेश्वर म्हणजे चांगदेवांचें शुद्ध आत्मस्वरूप असेंच मानिलें पाहिजे. हें स्वरूप समजल्यावर चांगदेव, चांगा वटेश्वर, किंवा वटेश्वर या तीन्ही नांवानें एकच व्यक्ति ओळखिली जाण्यास हरकत नाहीं, या उपपत्तीमुळे योगसिद्धांचे मालिकेंत वटेश्वराचें नांव न येण्याचेंही कारण स्पष्ट समजतें.
आतां ग्रंथगर्भी काय सांगितलें आहे हें पाहूं. पहिल्या पांच ओव्यांत गणेशस्तवन असून पुढे १३ पावेतों शारदास्तवन आहे. यापुढे गुरुस्तवन असावेसें वाटतें. यानंतरच्या ज्या ओव्या सांपडल्या नाहींत त्यांत स्थूल व सूक्ष्म भक्तीचें ज्ञान वैराग्य-संमतीनें वर्णन केलेलें असावें असें ५९५व्या ओंवीवरून वाटतें. याप्रमाणें स्थूल व सूक्ष्म भक्ती सांगून चांगदेव निर्गुणभक्तीकडे वळले आहेत. या निर्गुणभक्तीचें विवरण करण्यापूर्वी चांगदेवाने पद, पिंड, रूप व रूपातीत या चार गोष्टींचा विचार केला आहे. पद म्हणजे श्वासोश्वासाबरोबर होणारे सोऽहं, अहंसः हे शब्द. पिंड म्हणजे शरीरास आधारभूत असलेली कुंडलिनी. रूप म्हणजे पंचमहाभूतांचा विस्तार व लय व या संकोच विकासाहून पर, द्वैताद्वैतापलीकडील जो, तो रूपातीत. या रूपातीताची भक्ति तीच निर्गुणभक्ति . ६४१ पर्यंत हाच विषय विस्ताराने प्रतिपादन केला आहे.
ओंवी ६४३ पासून ६६४ पावेतों हठयोग सांगितला आहे. पण यांत मुख्य सांगितलेली गोष्ट म्हणजे शरीर - साधना न करणें. गुरुपरंपरागत व स्वानुभूत वर्गन कसें असतें याचा वरील ओव्या उत्तम मासला आहेत. समाधीच्या या ओंत्र्या व ज्ञानेश्वरींतील या विषयाच्या ओव्या परस्पर ताडून पाहण्या सारख्या आहेत. समाधि लाऊन मन निर्विषय करणें व निर्गुणभक्ति करणें एकच आहे. येथे चांगदेवानें नुसती 'शब्दाची चावटी' केली नसून 'आधी केले मग सांगितलें ' या न्यायानें स्वानुभवच शब्दरूपानें ओतला आहे. पुढें निर्वाण व सिद्ध योग
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #15
--------------------------------------------------------------------------
________________
सांगून ब्रह्मविवरणास आरंभ केला आहे. मग प्रत्येक साकार वस्तु ब्रह्म कशी असते हे सांगून तिचा त्याग कसा करावा याचे विवरण ओंवी ७३० पर्यंत आहे. निरनिराळ्या क्रिया, निरनिराळे योग, निरनिराळी शास्त्रे, एवढेच नव्हे तर पितृगोत्र, जीवभाव यांच्याही ममतेचा त्याग केला पाहिजे. नुसत्या शरीरसिद्धीचीच नव्हे तर तिज बरोबरच पापपुण्य, वर्णभेद, निंदास्तुति, मानापमान, सुखदुःख, आस्तिक नास्तिक वाद, रिद्धि सिद्धि, कर्म निष्कर्म इत्यादिकांची आस सोडतां सोडतां पंच भूतांचाहि त्याग झाला म्हणजे जें अप्रमेय, अक्षय, अविनाश, अच्युत, सदाशिव, सानंदपूर्ण, सर्वज्ञ, शांत, मंगल, वेदवेद्य, ॐकाराक्षर ब्रह्म राहतें तें तूंच आहेस' अशी तत्वमसि वाक्याची फोड केलेली आहे.
हा तत्वमसि उपदेश समजला व मनाचा पूर्णपणे लोप होऊन संकल्प विकल्प मावळले म्हणजे सर्व प्रकारच्या प्रवृत्ति आपोआप मावळतात. मग उचितानुचित कर्माचे बंधन रहात नाही. ब्रह्मवल्ल्युपनिषदांत सांगितल्याप्रमाणे 'एतरह वाव न तपति। किमहं साधु नाकरवम् । किमहं पापमकरवमिति'--मी कोणतें पाप केले किंवा मी कोणतें सत्कृत्य केलें नाहीं इत्यादिकांचा ताप त्यामागें रहात नाही. मग त्याच्या हातून कुकर्म जरी झाले तरी त्याचे बंधन त्यास होत नाही. पण अकर्म करून बंधन होत नाही हा विषय स्पष्टपणे समजला नसेल म्हणून दोन उदाहरणे देऊन शंका घेतल्या आहेत व त्याचेच समाधान मोठ्या मार्मिकपणे केले आहे. संकल्प असो की नसो, कोणाचें ऋण काढिले किंवा विधवा ब्राह्मणस्त्रीने पुरुषसंग केला तर तें ऋण द्यावे लागेल की नाही किंवा त्या विधवेस गर्भ राहील की नाही या शंका, आणि मेल्यावर ऋण द्यावे लागत नाही किंवा क्षारादिक औषधींनी गर्भ धारणाच होत नाही हे समाधान, मूळांतच ओंवी ८०३ ते ८२७ पर्यंत वाचले पाहिजे. ___हे ज्ञान अत्यंत कठिण आहे, थोडा वेळ पटले तरी पुनः पुन्हा अज्ञानाचे पटल मनावर येतच असते, आणि म्हणूनच वर सांगितल्याप्रमाणे क्रिया कर्मांचा लोप करणारे ज्ञान भलत्यास सांगणे साहसाचे आहे. तो लोप आपोआप स्वाभाविकपणे झाला पाहिजे. मुद्दाम करून चालत नाही. हटाने केल्यास उपयोग नाही. या
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #16
--------------------------------------------------------------------------
________________
साठींच वेदान्त ज्ञान 'अशिष्याय न देयं' असा प्रतिषेध आहे. चांगदेवानेही या निषेधाचाच अनुवाद केला आहे. अज्ञान पटल मनावर न येऊं देणें फार कठिण आहे व या कार्यांत थोडें यश येऊन पूर्ण सिद्धि प्राप्त न झाली तर काय होईल या प्रश्नाचें उत्तर भगवद्गीतेस अनुसरूनच 'असा अपभ्रष्ट पुरुष चांगल्या कुळांत जन्मून विधियुक्त भक्ति आचरितो व सिद्ध होतो' असें ८४७ ओंवींत दिले आहे. योग्याच्या सिद्धि भ्भ्रंशाचें कारण मात्र चांगदेवानें भिन्न दिलें आहे. योगमार्गांत सिद्धि मिळू लागली कीं आपलें स्थान जाईल ही देवांस भीति वाटू लागते व म्हणून ते या योग्याच्या मार्गांत विघ्ने आणीत असतात अशी चांगदेवांची उपपत्ति आहे. पण ही विघ्नांची भीति सिद्धदशा आंगीं बाणण्यापूर्वीच आहे. सिद्ध झाल्यावर मग विघ्नें कोठलीं ?
यापुढें ओंवी ८६७ पासून योगमार्गांतील सिद्धांचीं नांवें दिली आहेत. आजपावेतों हठयोग प्रदीपिकाकार स्वात्माराम योगीश्वरानें सांगितलेली या मार्गांतील
" श्री आदिनाथ मत्स्येंद्र शाबरानंद भैरवा । चौरंगी-मीन - गोरक्ष-विरूपाक्ष-बिलेशया : " मंथानो भैरवो योगी शुद्धबुद्धश्च कंथडि: । कोरंटकः सुरानंदः सिद्धनाथश्च चर्पटिः ॥ कानेरी पूज्यपादश्च नित्यनाथ निरंजनः । कपाली बिंदुनाथश्च काकचण्डीश्वराह्वयाः ॥ अल्लमप्रभुदेवश्च घोडा चोलीच टिटिणिः । भालुकी नागदेवश्च खण्डकापालिकस्तथा ॥
एवढ्याच लोकांचीं नांवें माहीत होतीं. पण चांगदेवानें याहूनहि विस्तृत नामावलि दिली आहे. ८८१ ओंवींत ही मालिका संपली नाहीं व पुढील ओंव्या उपलब्ध नसल्यानें ही यादी आणखी किती लांब होती हें सांगतां येत नाहीं. या यादीवरून चांगदेवाच्या काळीं हा पंथ किती पसरला होता व यांत सर्व जातींच्या स्त्री पुरुषांचा कसा समावेश होता एवढें मात्र ठळकपणें नजरेस पडतें.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #17
--------------------------------------------------------------------------
________________
पुढील उपलब्ध ओंव्यांत गुरुभक्तीचे माहात्म्य व गुरुद्रोहाचे दोष वर्णन केले आहेत. चांगदेवाने सांगितलेली गुरुसेवा सामान्य नसून पूर्णपणे स्वत्वास विसरणा-या अनन्यपणाची आहे. गुरु दिसल्या बरोबर तर लोटांगण घातलेंच पाहिजे पण गुरु ज्या दिशेस असेल तिकडेही नमस्कार केला पाहिजे. गुरूचें वृथा अनुकरण तर करूंच नये पण गुरू ज्या आसनावर बसत असतील त्या वरही बसू नये. उलट गुरूच्या घराची किंवा आसनाचीही चित्तशुद्धिसाठी पूजा केली पाहिजे . गुरुत्याग किंवा गुरुद्रोहाच्या पातकास तर सीमाच नाही. एक गुरू सोडून दुसरा करणारास तर चांगदेवाने 'पुंश्चली' ची उपमा दिली आहे. जसे कन्या बरावयापूर्वीच कुळाचा विचार केला पाहिजे तसेंच येथेही आहे. शिवाय चांगदेवाच्या मताने गुरुपासून मिळणारी सिद्धि पुष्कळशी स्वतःवरच अवलंबून आहे. मातीच्या केलेल्या द्रोणाचार्यापासूनहि जर एक लव्यास सिद्धि मिळवितां आली तर मग असिद्ध कोण राहूं शकतो? गुरुद्रोह चुकून घडल्यास त्याचा निस्तार कसा करावा हा भाग पुन्हा गहाळ झाला आहे.
सरते शेवटी संवादात्मक ग्रंथाच्या अंती असणारा 'पूर्णपणे समजले ना?' असा प्रश्न असावासे वाटते. श्रीमद्भगवद्गीतेंत 'कच्चिदज्ञानसंमोहः प्रणष्टस्ते धनंजय' असा प्रश्न विचारून 'स्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव' असे उत्तर आहे. पण येथील उत्तर फारच बहारीचे आहे. येथे शिष्य गुरूसच असें उत्तर देतो की 'आतां समजावयाचे कोणी व काय ? समजणारा, जे समजावयाचें तें व समजण्याची क्रिया ही त्रिपुटीच नाहींशी झाल्यावर मौनाशिवाय उत्तरच काय ? गुरूनेही पण शिष्य इतका तयार झाल्यावर आपणापेक्षां निराळा ठेवण्याचे कारण नाही असे समजून त्यास स्वस्वरूपी मेळविलें. ही मिळणी चांगदेवाने फारच मौजेची वर्णिली आहे. गुरूने आ पसरिला व शिष्याने गुरूचे मुखांत प्रवेश केला व याप्रमाणे गुरु शिष्य एकस्वरूप झाले. तत्वसाराचा शेवट याहून चांगला कसा असू शकणार? सद्गुरूनें जें आपलें निजस्वरूप शिष्यास समजाविले, ते पूर्णपणे समजून शिष्य व गुरु हा द्वैतभाव सुटून दोघेहि एकच ब्रह्मस्वरूप झाले की सर्व तत्वांचे सार प्राप्तच झाले. हाच खरा तत्वसाराचा गर्भितार्थ.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #18
--------------------------------------------------------------------------
________________
ग्रंबाचें अंतर्याम पाहिल्यावर थोडेसें बहिरंगाकडेही लक्ष्य दिले पाहिजे. ग्रंयाचा छंद ओंवी असल्याबद्दल स्वतः चांगदेवानेच अंतिम ओंवींत सांगितले आहे. हा मराठी भाषेतील आद्य छंद होय. मोमेश्वराचा असा स्पष्ट उल्लेख आहे की 'महाराष्ट्रेषु योषिन्दिरोंवो गेया तु कण्डने' म्हणजे महाराष्ट्रांतील बायका कांडतांना ओंव्या गात असतात. अभंग हे नांव जरी जुन्या ग्रंथांत सांपडत नसले तरी ओंवी हे नांव सर्रास सांपडते. ओंवीबद्ध ग्रंथ लिहिणाऱ्या सर्वांनी बहतेक आपल्या ग्रंथाच्या शेवटी या छंदाचे नांव घातले आहे. ज्ञानेश्वरांनी तर 'तैसी गाणीवेते मिरवी, गीतेवीण ही रंगु दावी, तो लोभाचा बंधु वोवी, केली मियां' असे कारण दाखवून ओंवो छंदाचा अंगीकार केला आहे. ___ओंवी शब्दाची व्युत्पत्ति राजवाडे यांनी आपल्या मराठी छंदावरील लेखांत पुढील प्रमाणे दिली आहे. "ऊङ=सूत्र ओंवणे ह्या धातूपासून ओवी हा शब्द निघाला आहे. आ+ऊयन =ओयन =ओयनिका=ओवणिकाओवइआ
=ओवीआ, ओविया. अथवा वे (ओंवणे, ग्रंथ रचना करणे) या धातूपासून नाम ऊति. आ+ऊति=ओति=ओइ=वोवी=ओंवी. अशीहि सिद्धि होऊ शकेल. परंतु ओवणिका हा शब्द ज्या अर्थी शके १५६०तील मुहारिमल्लबास नामें करून मानभाव ग्रंयकाराच्या दर्शनप्रकाश ग्रंथांत आला आहे, त्या अर्थी पहिलीच व्युत्पत्ति ग्राह्य दिसते." पण या दोन्ही व्युत्पत्ति समाधानकारक वाटत नाहीत. कारण आ उपसर्गपूर्वक ऊङ धातु कोठे वापरलेला आढळत नाही. आ+वे धातु जरी उपयोगांत असला तरी ऊति या शब्दाबरोबर आ लागून ओति हा शब्द अप्रयुक्तच आहे. सबब ओंवी शब्दाची व्युत्पत्ति निराळयाच प्रकाराने केली पाहिजे. शिवाय वरील व्युत्पत्तींत घेतलेल्या ओंवणे या अर्थावरूनही ओंवीच्या प्राचीन प्रकाराची उपपत्ति लागत नाही.
ओंवी शब्दाची वर दिलेल्या दोन प्रकारांहून निराळी अशी सिद्धि करतां येण्यासारखी आहे. ती म्हणजे आ+वप् घातूपासून. आवप्=वांटा काढून ठेवणे. यज्ञांत प्रत्येक देवतेस अनुलक्षून जो हविर्भाग निराळा काढून द्यावयाचा असतो त्याचें नांव आवपन. आवपनी, भाषपनिका ही यज्ञांतील लहान पात्रांची Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com
Page #19
--------------------------------------------------------------------------
________________
नांवे आहेत. मापांप्रमाणे या पात्रांनी वांटे काढावयाचे असतात. आवपनी, आवपनिका यांची ओपणी, ओपणिका ही रूपं सहज सिद्ध होतील व पोवः' या प्राकृत सूत्राप्रमाणे 'प' चा 'व' करून ओवणिका शब्द होणे सुलभ आहे. शिवाय भाग काढून ठेवण्याचे अर्थांत आणखीहि एक अर्थ सुचविला जातो, जो या शब्दाच्या सिद्धिचे खरे स्वरूप सुचवितो. कांडतांना किंवा दळतांना कांहीं विवक्षित कालानंतर नवीन भरण उखळांत किंवा जात्यांत टाकावयाचे असते. हा काल ठरविण्यास अशा गीताचा उपयोग करीत असावेत. म्हणजे एक गीत झाले की एक ओपणी संपली व या अर्थाने ओपणी, ओपी त्या धान्याच्या मापास व तें माप कांडले जात असतांना किंवा दळले जात असतांना म्हटल्या जाणाऱ्या गीतास लावला गेला असावा. या व्युत्पत्तीप्रमाणे ओंबी या शब्दास विशेष अर्थ येतो व हा छंद निर्माण होण्याचे कारणही ध्यानी येतें.
आरंभी आरंभी ओंवीचे चरण निश्चित अक्षर संख्येने युक्त असतील, कारण त्याशिवाय कालमापन बरोबर करता येणार नाही. पण संस्कृत अनुष्टुपाप्रमाणे मराठी ग्रंथकार जेव्हां ओंवीचा ज्योतिष, वेदांत, वैद्यक, इत्यादि शास्त्र ग्रंथ लिहितांनाहि उपयोग करूं लागले, तेव्हां हा अक्षर नियम शिथिल होऊन ओंवीस सयमक गद्याचे स्वरूप आले. याच कारणाकरितां अनुष्टुप् छंदाला ज्याप्रमाणे 'एक नेम नसे गणीं' चे रूप राहिले, तसेंच ओंवीचे रूप राहन शिवाय अक्षर संव्यंचेही बंधन राहिले नाही. म्हणूनच ओंवीचे लक्षण बांधतांना भीष्माचार्यास “गायत्री छंदापासौनि धृतिपर्यत, ग्रंथवोवियांचे तीन चरण जाणावे मिश्रित, प्रतिष्ठेपासौनि जगतीपर्यंत, चौथा चरण" असे सांगावे लागले. ज्ञानेश्वरीतल्या ओंवी चरणाची संख्या मोजून पाहिल्यामुळे राजवाड्यांस असे लक्षण बांधावे लागले की “ओंवीचे पहिले तीन चरण 'सुप्रतिष्ठा' पासून 'धृति' पर्यंतच्या कोणत्याही छंदाचे असतात आणि चौथा चरण 'मध्यमा' पासून 'जगती' "छंदापर्यंतच्या कोणत्याहि छंदाचा असतो." सारांश काय की. भीष्माचार्यांनी ओंवीच्या प्रथम तीन चरणांत कमीतकमी ६ अक्षरें तरी असावीत असा नियम केला व राजवाड्यांनी ही ६ अक्षरांची संख्या ५ वर आणली. चांगदेवाच्या
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #20
--------------------------------------------------------------------------
________________
ओव्यावरून ही संख्या आणखीही खाली आणावी लागेल. तत्वसारांतील सर्वांत लहा। ओंवी ६६६वी आहे. इच्यांत तीनच अक्षरांचा एक चरण पडतो. 'हे नोबलें, पाहिले, तेंवीचि कैसें केलें, जाणनेण' ही ती ओंवी. यावरून आपणांस एवढेच म्हणता येईल की अर्थानुरोधाने प्रसंग पडेल तसे ओंवीचे चरण मराठी ग्रंथकार लहान मोठे करीत असत.
येथपर्यंत हा तत्वसार ग्रंथ कसा मिळाला, तो कोठे, केव्हां व कोणी लिहिला आणि त्याचे अंतरंग तथा बहिरंग कसे आहे, याचा विचार केला. आतां ज्यांचे कृपाप्रसादाने हा ग्रंथ प्रसिद्ध होत आहे त्यांचे आभार मानून हा बराच लांबलेला उपोद्घात पुरा करावयाचा आहे. सर्वांत प्रथम प्राच्य ग्रंथसंग्रहालयाचा उपक्रम करणारे ग्वाल्हेर सरकारच्या शिक्षा विभागाचे अधिकारी रा. ब. लक्ष्मण भास्कर मुळे यांचे व ग्वाल्हेर मुक्कामी त्या कार्यास इतकें व्यवस्थित रूप आणून देणारे रा. केशव बळवंत डोंगरे यांचे आभार मानले पाहिजेत. रा. डोंगरे यांनी ग्रंथ प्रकाशित करावयाचे ठरवून उपोद्घात व टीपा लिहिण्याचे काम मजवर सोपविलें. दुसऱ्या एकाद्या लेखकाकडे हे काम दिले गेले असते तर हे याहून पूर्वीच पुरे झालें असते. पण माझे इतर व्यवसाय सांभाळून मला हे कार्य करावे लागल्यामुळे या प्रकाशनास कल्पनेबाहेर विलंब लागला याबद्दल खेद प्रदर्शित करणेही माझें कर्तव्यच आहे. हा सारा विलंब सोसून अलीजाह दरबार प्रेसने हे पुस्तक इतक्या चांगल्या रीतीने छापन दिले याबद्दल प्रेसचे व्यवस्थापक श्री. मानगांवकर यांचे आभार मानल्याशिवाय हे आभार प्रदर्शनाचे कार्य पुरेंच होणार नाही. सबब या सर्वांचे आभार मानून व ज्यांच्या कृपाछत्राखाली हे सर्व सुव्यवस्थित होत आहे ते आमचे श्रीमंत महाराज जिवाजीराव साहेब शिंदे दीर्घायु होऊन अशा प्रकारची वाङ्मयात्मक कामें त्यांच्या राजवटींत अनेक होवोत अशी ईश्वराजवळ प्रार्थना करून हा उपोद्घात पुरा करितों.
लश्कर ग्वाल्हेर. ताः १० मे १९३६.
है. रा. दिवेकर.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #21
--------------------------------------------------------------------------
________________
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #22
--------------------------------------------------------------------------
________________
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #23
--------------------------------------------------------------------------
________________
R
:
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
22.
mmswammy
.
....
36
...
3.
..
.
...
रेश्वरामायानामलागण घाम कमवन्कसमासवशास्त्रविष्ट नागवाअकरानावनातविध वा नचाहान भावाचावला कल्पना हल्ला बाधेनानीलारवतिनदिवानापजानाविधविश्वशना
विद्यासरण माना जानाशाजासमायुसहमगिरिजशंख नमिल्लासपकवताएबदेवापावाचाप्रदक्षिणावरलीगणकानेन मुनामाता सुनानारदजशब्दालानाटिका लागि चीनायकाजसुधामिप्रख या जगासारखवास्यासिकानानिमळविमाउलयमा सगुनी" वाहनावाशांकरावरणामहिमागहनासरस्थान जियनवरसाचालन संवाघार नादावाअवतामाबाद जियानादाबियाधीगी।ईश्वरवे Lamhand IIIतयं परमेश्वशीलंबिकरक्शा संतुष्टवाग
16..
Ain
MunawwagramgmORY
M
KISA
५९
-
SA
www.umaragyanbhandar.com
.
KARANMarigo
-
me agreeti
Profe
Page #24
--------------------------------------------------------------------------
________________
॥ ॐ नमः कुंजरेश्वराय ॥
गणेशवंदन. म्यां नमिला गणेश्वरु, जो कल्मक्षवनकुठारु, सर्वशास्त्रविचारु, पूर्णदीप ॥ १ ॥ ___ जो सौजन्याचा अंकुरु, शब्दब्रह्मविद्येचा उच्चारु, उन्मेषाचा तरुवरु, कल्पवृक्षु जो ॥ २ ॥
जो आनंदें डुल्लत्तु, प्रबोधे नाचतु, तांडव अभिनवितु, शंभुपुत्रु जो ॥ ३ ॥
जो विघ्नविध्वंसनु, अविद्यातॄणदहनु, कुविद्याभरण हुताशनु, ज्ञानाज्ञी जो ॥ ४ ॥ __ जो सगुणगुमु सहजु, गिरिजे शंभुचा आत्मजु, तो नमिला मूषकध्वजु, एकदंतु ॥ ५ ॥
शारदावंदन. वाचा प्रदक्षिणा करुनु, गणेशातें नमुनु, आतां साष्टांगिं प्रणमुनु, शारदेतें ॥ ६ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #25
--------------------------------------------------------------------------
________________
[२]
काश्मिरीची नायका,
जे शब्दब्रह्माची मूळिका, जे बुधीसि प्रेरका, वागेश्वरी ॥ ७ ॥ जे गोक्षीरधवळ, स्फटिक संकाश निर्मळ, विशुद्ध उभयकुळ, ब्रह्मपुत्री ॥ ८ ॥
जिये हंसाचें वाहन, पाशांकुशधरण, महिमाग्नें गहन, सरस्वती ते ॥ ९ ॥
जिये नवरसांचा अळंकारु, सप्त स्वरांचा शृंघारु, नादाचा अवतार, नादमूर्ति ॥ १० ॥
जिया नादाचिया प्रीती, ईश्वरु केला अती, तिं पावविला तृप्ती, नादें तेया ॥ ११ ॥
जय जय परमेश्वरी, लंबिके खेचरी, संतुष्ट वागेश्वरी, परम गुह्य ते ॥ १२ ॥
जे महिमानें गहन, स्वभावें प्रसन्न, भला रे म्हणौनि वचन, अनुवादली ॥ १३॥
वंदन.
आतां
....
.......
.......
.........
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
.......
....
........
........
........
.....
www.umaragyanbhandar.com
Page #26
--------------------------------------------------------------------------
________________
[३] वैराग्य तें ऐसे, जे देह अहंतोस रुसे, इछा क्रिया राहे आपैसें, योगसिद्धि ॥ ५९० ॥ ___ जरि अष्टांग योगाभ्यासु, तरि स्वभावें होय स्वयंप्रकाशु, देखिजे परमहंसु, परमात्मा ॥ ११ ॥
शरीरसिद्धांत गोप्यगहर, ते केंवि करूं गोचर, परि सकळे निःशब्दाधार, कथन करीन ॥ ९२ ॥
जैसा गुरुद्रोहु न पड़े, आणि सिद्धिद्वेषु न घडे, तैसा बोलों उजेडे, शरीरनाथु ॥ ९३ ॥
सोपाने बोलिजैल, शास्त्राज्ञा कथिजैल, अध्यात्मि किजैल, रूप चांग ॥ ९४ ॥
हे स्थूल सूक्ष्म भक्ति, बोलिलि ज्ञान वैराग्यसंमति । ते परियसा निर्गुणभक्ति, चांगा म्हणे ॥ ९५ ॥
निर्गुणभक्ति. जे वातिवरि गिवसिता, न दिसे संसारवार्ता, ते हि निर्गुण भक्ति सेवितां, प्रपंचु तुटे ॥ ९६ ॥
जे पापापुण्यापूर्वि, जन्म मरणातें हारवि, महा बोधु चेववि, आत्मस्वरूपें ॥९७॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #27
--------------------------------------------------------------------------
________________
[४]
जे दुसरेपणा हाणि, स्वर्गसंसारा धुणि, जे सेवितां निर्वाणिं, स्वयं शिव ॥ ९८॥ ____ हे निर्गुण भक्ति, आइकिजें स्वात्महीति, आहो इये परौति, वस्तु असेचिना ॥ ९९ ॥ ___ आतां वटेश्वराप्रसादें, मी निर्गुणभक्ति अनुवादें,
तरि आइकतु श्रोते विनोदें, चांगा म्हणे ॥ ६०० ॥ ___ तर सांगैन परमशरिराचि स्थिति, ते परिसा निर्गुण भक्ति, जिया कैवल्य प्राप्ति, मोक्षरूप ॥ १ ॥
तिचे विभाग. ते निर्गुण भक्ति द्विधा, रूप रूपातित पदा, गुरुनसादें सानंद, रहस्य कथीन ॥ २ ॥ __पदा पिंडाची स्थिति, रूपरूपातीतप्राप्ति, सबीज भेद वित्पित्ति, प्रथक् सांधैन ॥ ३ ॥ ___पिंडु म्हणिजे कुंडलिणि शक्ति, पद परमहंसु म्हणी. पति, रूप बिंदु कळा ज्योति, एर कळामय ॥ ४ ॥
पद. आता पदाचा विचारु, सांधिजैल नागरु, अवधाने यावें जि अवसरा, एकचित्तपणें ॥५॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #28
--------------------------------------------------------------------------
________________
[५] तरि पद तें परमात्मा म्हणिजे, ते वोंकार स्थान बोलिजे, जेथे वाचा उपजे, चतुर्विध ॥ ६ ॥ __अव्यक्तु उपजे प्राणु, तस्य नादें मनु, मनव्योमा पासोनु, बुद्धि झाली ॥ ७ ॥
मनबुद्धिचा गहरी, तेथें जालिया वाचा च्यारि, परा पश्यंति मध्यमा वैखरि, बोलिजति ज्या ॥ ८ ॥ ___ परा म्हणिजे ते मात्रावृता, तोचि घोषु परमात्मेया साक्षभूता, हे अनुभव संकेत, जाणिजे जी ॥ ९ ॥ __तिये पासौनि पश्यति, तेचि ध्वनि म्हणिपति. मध्यमा तिये परौति, ते नादस्वरूप जी ॥ १० ॥
तिये पासौनि वैखीर, एवं वाचा जालिया च्याही, ते प्रणवादिक गहरी, स्थूल बीज ॥ ११ ॥
तेचि अक्षर द्विधा, हकार सकार भेदा. शिव शक्ति संबोधा, हंसवाक्य पैं ॥ १२ ॥
सकारु विसर्ग संयुक्तु, हकारु बिंदनादभरितु, हे बीजद्वय म्हणीपत, शिउ शक्ति ऐसें ॥ १३ ॥
शक्ति रहस्य सकारु, सबीज शिउ हकारु, हे दोन्ही आणि ॐकारु, अजपा म्हणिजे ॥ १४ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #29
--------------------------------------------------------------------------
________________
[ ६ ] आतां प्रवेशीं सकारु, बाह्य नीर्गमि हकारु, तेचि सृष्टि संहारु, पृथग्बीजें ॥ १५ ॥
अवरोहिं विरोहिं म्हणिपति, चंचळें निश्वळें दिसति, संततें वर्तति, मन व्योमिं ॥ १६ ॥
हें गुरुमुखे पाविजे, छंद रुषि देवत जाणिजे, या परि किजे, मंत्र सिध्दु ॥ १७ ॥
9
एवं पद बोलिलें तें संकेतें कथिलें तव शिष्ये पुसिलें पिंडु कैसा ॥ १८ ॥
पिंड.
आतां पिंडव्याख्यान करीन, संकेतें सांघैन, उन्मेषें बोलैन, बालबोधें ॥ १९ ॥
पिंडु म्हणिपे शक्ति, कुंडलिणि विख्याति, देह गोळकोत्पत्ति, जेथौनियां ॥ २०॥
जे भुजंगळणे सूतले, आधारिं निक्षेपिलि, योगियां जालि, मुक्तिवरदा ॥ २१ ॥
जैसि विद्यु तेजें झळकति, कां जळिं मच्छक तळपति, तैसि आधारि मिरवति, तेज:पुंज ॥ २२ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #30
--------------------------------------------------------------------------
________________
[७] जे रविसंख्या सहस्र, महा तेज प्रकाशु, तेवि स्वयं तंज बहुवसु, आधारिणी ॥ २३ ॥
जे कुळा अकुळा विचारु, पक्ष द्वय निर्धारु, षट् चक्रां आधारु, नाडिया ॥ २४ ॥
दशवायु गुणत्रया, रवि शशि बीज द्वया, पंचभूतिक पीठत्रया, शरीर संख्या ॥ २५ ॥ ___ हे सर्व कुंडलिणिचि सृष्टि, उत्पत्ति संहार स्थिति, आतां गुरु विचारें बोलति, रूप कैसें ॥ २६ ॥
रूप.
आतां रूप सांचैन आइका, जे दशविध परि एकि अनेका, पद पिंड विभागका, परि एकांचि जे ॥ २७ ॥
ते नाद बिंदु कळा ज्योति, एवंविध रूपाचि स्थिति, तियेते जीउ म्हणिपति, गुणात्मकु पैं ॥ २८ ॥ ____ मन बुद्धि चित्त अहंकारु, हा चतुष्टय आकारु, पंचभूतिकिं अनेक विचारु, तोचि जाला ॥ २९ ॥
आतां पंचभूतिकोत्पत्ति, यांचि सांघेन वित्पत्ति, एक एका प्रति, जन्मजाले ॥ ३० ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #31
--------------------------------------------------------------------------
________________
[८] शून्य ब्रह्मा पासोनि, आकाश जन्मले तेथौनि, सर्वा शेषा येउनि, व्यापुनि असे पैं ॥ ३१ ॥
तिये व्योम जन्मला पवनु, तेज तया पासूनु, येकमेकांते प्रसउनु, भूतसृष्टि ॥ ३२ ॥
आप तेजिं जन्मले, पृथ्वि तत्व आपि जालें, क्षिति प्ररोहो पातले । सर्व बीज ॥ ३३ ॥ __ ऐसे नाही पासून जालें, ब्रह्म कतिं विस्तारले, ईश्वर तेज विकरलें, मूलमंत्र ॥ ३४ ॥ __ ईशान म्हणिजे आकाश, वायु म्हणिजे तत्पुरुष, अघोर तेज प्रकाशु, वामदेव म्हणिजे ॥ ३५ ॥ ___ पृथ्वि सद्योजाता पासौनि, ऐसें पंच ब्रह्मी होउनि, येणेचि अनुक्रेमें गगनिं, विलयो पावे ॥ ३६ ॥
हे नादबिंदव्याप, यांते म्हणीजे रूप, आतां सांघेन संक्षेप, रूपातीत ॥ ३७ ॥
रूपातीत. पृथ्वी आपिं विरमे, आप तेजिं उपरमे, तेज पनि चि समे, वायु निराळंबिं ॥ ३८ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #32
--------------------------------------------------------------------------
________________
[९] जैसी दीपकळिका गगनिं, जाए तेथ हारपौनि, तेवि भूतें भूत गिळूनि, शून्य ठाके ॥ ३९ ॥ ___ ऐसा संकोच विकाशु, या वेगळा प्रकाशु,
द्वैताद्वैत आभासु, रूपातीतु पैं ॥ ४० ॥ ___ एवं पद पिंड जालें, रूप रूपातीत बोलिलें, संकळौनि कथिले, भक्तियोग ॥ ४१ ॥ __ ऐसी भक्ति हे प्रधान, एवं गुरुभक्तीचें लक्षण, आतां तूज सांघेन निर्वाण, शिष्यराया ॥ ४२ ॥
हठयोग, आतां साधारण सांघिजैल, हठयोगु बोलिजैल, राजयोगु दाविजैल, तत्वलारें ४३ ॥ ___ जरि हठयोगाची साधना, तरि न वचती देहाभिमान, तेंचि ते अज्ञान, निरसेचिना ॥ ४४ ॥
देहाचें स्थान मान देखौनि, उदास होआवे जाणौनि, अहंभावापासौनि, तरिचि सुटिजे ॥ ४५ ॥
जरि शरीर साधना लागला, तरि अखंड पद चुकला, वृथा अभिमानिं पडला, जन्ममूळिं ॥ ४६ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #33
--------------------------------------------------------------------------
________________
[१०] जहि शरीरसाधना कीजैल, परि देह नाशिवंत जाईल, वरि जन्मांतें सुचिल, दुःखमूळ ॥ ४७॥
हें चौरंगी गोरक्षा साजे, आणि तैसि तियें युग म्हणिजे, येथ आपण नेणिजे, काय होइल ॥ ४८ ॥
आणि ते देवांचे अंश, क्रेत द्वापर बहुवस, हॅ कलियुग सक्केश, कर्म शरीरें ॥ ४९ ॥
आपण आत्मतत्व जाणिजे, मोक्षु येकु पाविजे, येथ विषदं न लविजे, विलंबु पैं ॥
वीर देह साभिमानु सांडौनि, शुन्य ध्यानि विरमौनि, तरि युगसंख्या वांचौनि, तोचि उरे ॥ ५१ ॥
देख पां चौरंगीनाथं, कवण कर्म केलें देहांत, निर्गुण प्रवेशपथिं, सिद्धु झाला ॥ ५२ ॥
जरि सर्व अशेष साधलें, तरि कार्यकारणिं लागलें, स्वभायें देह उभारलें, कल्प कोटी ॥ ५३ ॥
म्हणौनि शरीर जाणावें, परि अभिमाना न यात्रें, मनोमळ तोडावे, शून्यघसणीं ॥ ५४ ॥
पवनाभ्यासु करुनि, बंधु भेद मुद्रा लंघौनि, येणे जाणे सांडौनेि, ब्रह्मचि होजे ॥ ५५ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #34
--------------------------------------------------------------------------
________________
[११) प्रथम वज्रासनी स्थीरुभूता, मूळद्वारिं बंधु निरुता, निगतु पवनु मागुता, भरीतु कीजे ॥ ५६ ॥
अधै अडिजें, ऊर्धे बंधु दाजे, मध्य अंकुचिजे, उच्छाल शक्ती ॥ ५६ ॥
गुरुवचनवर्मभेदें, शक्ति सूतली प्रबोधे, अधो मुख ऊर्धे, कमळ होए ॥ ५८ ॥ ___ पवनघायें हाली, शक्ति पुष्टि उकलली, ऊर्ध पंथें निघाली, ब्रह्मरंध्रा ॥ ५९॥
पवन भारें चालती, ऊर्धक, पेलती, आविंस म्हणौनि ग्रासिती, व्याधि रोगातें ॥६॥
पवनप्रबोधे मातली, जीव भावा मुंकली, तवं सत्राविं श्रवली, शक्ति मुखिं ॥ ६१ ॥ ___ मन पवन संधानें, शक्ति उसळली गगर्ने, भेदली स्थाने, षट्चक्रांची ॥ ६२ ।।
ग्रंथित्रय छेदुनि, षट्चक्रे भेदुनि, त्रिकुटिं योगु संपौनि, निर्गुणोंसें ॥ ६३ ॥
जे जाणतां जाणणें सरे, जेणें मनांचे मनत्व मुरे, तें सांघेन विचारें, चांगा म्हणे ॥ ६४ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #35
--------------------------------------------------------------------------
________________
[१२]
निर्वाण. आतां वटेश्वरु होउनु निगुतें, सांधैन मिं वटेश्वरातें, मना करविं गिळवीन मागुतें, संसारासि ॥ ६५ ॥ विचि कैसें केलें,
हें नोबले, पाहिलें,
जाण नेण ॥ ६६ ॥
जें सोनें घडौनि, अळंकारिं होइजे आनानी, तैसें आत्मा वांचौनि, बोलों नेणें ॥ ६७ ॥
आतां असो हैं किति, उठउं संसाराची पांति, येहविं संसार विस्मृति, आपुला नव्हे ॥ ६८ ॥
जैसे निद्रेच्येनि प्रसादें, भोगीजती स्वप्नींची प्रमादें, तेविं अज्ञानाचेनि मदें, संसारु हा ॥ ६९ ॥
येहविं आत्म प्रबोध दृष्टी, के मन के शृष्टि, हे मनोमय उठीं मना पासौनि ॥ ७० ॥
आतां मनाचें कसण मोडिजैल, मन हा दोषु फेडिजैल, महाटिया बोलिजेल, सिद्धयोगु ॥ ७१ ॥ सिद्धयोग.
मन जिये ठायिं लाविजैल, तो तोचि बंधु पडैल, म्हणौनि निराशी किजल, तेणेंसिंचि ॥ ७२ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #36
--------------------------------------------------------------------------
________________
[१३] जेथ जेथ मन लागैल, तो तोचि संसारु होइल, म्हणौनि पांगुळ किजैल, निराळंबिं ॥ ७३ ॥
निराकार प्रकाशैल, तेथ साकार उछेदैल, निर्गुण भक्ति उपदेसील, गुरु शिष्यासि ॥ ७४ ॥ ___ ज्या भक्ती निरुतें, पातले हृषीकेशातें, ते न येतीचि मागुते, गर्भवासा ॥ ७५ ॥
ते शक्ति शून्य प्रभा, नाभं फांकली व्योमगर्भा, मनोमय सगर्भा, नाशु होए ॥ ७६ ॥
त्रिगुण गोप्य गहरु, तो स्वामि माझा वेटेश्वरु, तस्य प्रसादें संसारु, उन्मळीला ॥ ७७ ॥
जेणें आत्म ब्रह्म दाविले, माझें मज उपसिलें, असत संसारीक नाहिं जालें, चांगा म्हणे ॥ ७८ ॥
साकार ब्रह्म आतां येथूनु तत्वसार, सांघिजैल ब्रह्म साकार, गुरु संवादें विचार, शिष्यासि पैं ॥ ७९ ॥
जें जें दावीतु जाईल, तें तें शिष्यु त्यजील, बंधु पडों नेंदिल, कल्पनेचा ॥ ८० ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #37
--------------------------------------------------------------------------
________________
[१४] जैसी करि जोति घेउनि, गृहवस्तु अबलोकुनि, स्वयं ठेविलें देखौनि, त्यागु कीजै ॥ १ ॥ ___नां तरि ऐली थडीये नावेचा, किजे प्रयत्नु स्विकारु तियेचा, पैलु पारु पावलेयां तिचा, पांगु फिटे ॥ ८२ ॥ _ तैसें देहस्थे देहातीत देखिलें, गुरु प्रसादें जाणांतलें, म्हणौनि त्यजी पुत्रा म्हणीतले, अशेष ही ॥ ८३ ॥
त्या क्रिया कर्म जंजाळ, आणि भ्रांति माया पटळ, स्वप्नावस्था प्रबळ, जाणे पुत्रा ॥ ८४ ॥
जैसी कव्हणी येकि काळ वषां पतित, भुजंगाकार दोरी दीसत, तेलटिकें जालेयां मनत्व, स्वस्थानां आलें ॥८५॥
तैसा अज्ञानकाळ संसारु, आभासु मायामय साकारु, तत्वविचारें असंसारु, तोचि होए ॥ ८६ ॥ ___नांतरि स्वप्निं संपत्ति लाहिजे, विहावो राज्य पाविजे, चेइलेयां असिजे, आपणपेंचि ॥ ८७ ॥
तैसी अज्ञान विस्मृति निद्रा, दृश्यादृश्य स्वप्नभेद, स्वरूपिं चेइलेयां अभेद, स्वयं तोचि ॥ ८८ ॥
तेवि आभास मायामय सकळ, जैसे पाहातां मृग जळ, म्हणोनि त्यजि पुत्रा पाल्हाळ, द्वैत बुद्धि हे ॥ ८९ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #38
--------------------------------------------------------------------------
________________
[१५]
त्याग. त्यजिं आधार स्वाधिष्ठान, मणिपुर अनुहात ज्ञान, विशुद्धाज्ञा साधन, षटुचक्रांचें ॥ ९० ॥
त्यजिं मूळबंधु वायु साधन, खंडज्ञान लंबिकाकरण, अनहात श्रवण, नको भावुं ॥ ९१ ॥
त्यजि अधोर्ध्व मध्यस्थान, आसन मुद्रा लक्ष ध्यान, अजपामंत्र साधन, अवस्था त्रय ॥ ९२ ॥
त्यजं वादु दंडि दारुण, विज्ञान विद्या सर्वज्ञपण, कळा कौशल पांडित्यपण, सांडोनि घाली ॥ ९३॥
त्यजं धातु धातुर्वाद, रस रसायण उपाधि, विवर मुख्य करुनि समस्त विषयबुद्धि, झर्णे सेविं ॥ ९४ ॥
त्यजी तिर्थदेश भ्रमण गिरि गहर कर्दळीवन, निरोपद्रव स्थानीं रहण, प्रारंभी तुं ॥ ९५ ॥
त्या पितृगोत्र समस्त, जीव भाव सांडौनि होये निभ्रांत, देहसिद्धि न लगे सर्वथा, नाशिवंत हें ॥९६॥
ऐसें ही देह साध्य कीजेल, तरि आरिख एक बोलिजैल, ब्रह्मादिकीं देह त्याजजैल, गणना अंतीं ॥९७॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #39
--------------------------------------------------------------------------
________________
[१६]
सर्व नर सुरचक्री विरमति, ब्रह्मरूपी इंद्र हारपति, ब्रह्मा विष्णुमूर्ति विलया जाति, आपुलीया यता ॥९८॥ _ विष्णु रुद्री व्यखस्ते, रुद्र शिवि मागुते, शिव शून्या परोते, शुद्ध बुद्ध ॥ ९९ ॥
ऐसि सूर देहस्थिति, तये काए राहाति, म्हणौनु शरीरसिद्धिभ्रांति, सांडि बापा ॥ ७० ॥
किंबहुना सर्व सांडिजाणे, ऐसें अभेद अंत:करणे, स्वयं शून्य निर्गुणे, महाबोधे ॥१॥ __सांडिं पापपुण्य कुळकथा, होए पद पिंडिं मुक्ता, रूपरूपातीत पाहातां, निःसंशय ॥ २॥ ___ सांडि वर्णभेदु, शुचि शंका बंधु, विश्वरूपिं सानंदु, तुंचि होसि ॥ ३ ॥ ___ सांडि निंदा स्तुति कडवसा, मानाभिरानु काइसा, सुख दुःखीं निराशा, होइ पुत्रा ॥ ४ ॥
त्यजिं आस्ति नास्तिक वादु, भ्रमु वोषधीचा बंधु, अविलिल वाचा प्रबंधु, ज्ञान भ्रंशु॥ ५॥
त्यजिं रिद्धि सिद्धिचि आवडि, स्वर्ग भोगादि फळे थोकडिं, आत्मतत्वापासुनि बापुडि, हीणें देखों ॥ ६ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #40
--------------------------------------------------------------------------
________________
[ १७ ]
त्यजं कर्म निष्कर्म भावना, व्याप्य व्यापक कल्पना, भेदबुद्धि विवंचना, करिसि झणें ॥ ७ ॥
त्यजिं पृथ्वि मागौति, आपें आप तेथिं, तेजि तेज निरुति, निरोपिं पा ॥ ८ ॥
आत्मरूप
पवनीं पवनु त्यजिं, आकाशीं आकाश यजिं, शेषि उरेल त्या भजिं, आत्मरूपा ॥ ९ ॥
त्यजिं बुद्धि चित्त अहंकारु, आणि शून्य मानी विकारु, तेथ उरैल तो विचारु, लाभू विशेषिं ॥ १० ॥
कदालिस्तंभू उकलिता. शून्यगर्भु फळितां, तेणें आकारें वर्ततां, कैवल्य तुं ॥ ११ ॥
कदलिगर्भ दिसे तैसें रूप तुझें असे, स्वयं गुरु तुझें, तरिचि जाणिजे ॥ १२ ॥
नातरि तया मना संहारु, वेदविद्येचा विचारु, तेंचि तत्वसार साचारु, जाण पुत्रा ॥ १३ ॥
मन पवन शून्नीं हारपति, तल्लीन मन तेचि गति, तया परौतें कांहिं आथि, तुं वांचौनि ॥ १४ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #41
--------------------------------------------------------------------------
________________
[१८]
रजी वेवस्ते तमः, रज सत्विं अभिन्न, सत्व शुन्नीं शून्य, विलयो पावे ॥ १५ ॥
ऐसे गुण गुण विरमले मग स्वयं शून्य उरलें, तें स्वरूप आपुलें, फुर्डे जाणा ॥ १६ ॥
जैसी कर्पूरदीप, राणिवी लोपावे ज्योति, शेषि उरे तें प्रति, स्वयं जाण ॥ १७ ॥
भरितें घटु भरितु माहा शून्य पुरीतु, तद्भावे बिंबतु, आपणचि ॥ १८ ॥
जैसि उदकामध्यें घागरि, तरत सबाह्यभ्यंतरी, तैसा शून्य निरंतरी, सुखें असे ॥ १९ ॥
मनि मन विराले, महा शून्य उरलें, तत्वसार पावलें, तेंचि तु जाण ॥ २० ॥
चित्त चेतना मुराली, निराळंभ झाली, भृति नेति नेति बोलिली, रहस्य हैं ॥ २१ ॥
श्रुतिरहस्य.
जें अप्रमेय अपार, सर्वज्ञचि सार, सर्वभूतिं अंतर,
तूंचि असमी ॥ २२ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #42
--------------------------------------------------------------------------
________________
[ ९ ]
जें अक्षय अविनाश, सारासार सर्वस्व, ब्रह्मादिकां उपास्य, कैवल्य जें ॥ २३ ॥
जें
अच्युत अनुगत, सदाशिव साक्षात, सानंद मूर्त,
अनामय || २४ ॥
जें युगांत शेष, घनाघन एक, अनुपम्य सुख, 'सागर जें ॥ २५ ॥
जें निरंतर उदीत, बहुतांसि बहुत,
सर्वज्ञ शांत,
मंगळ जें ॥ २६ ॥
जें त्रिपदा गायत्री सार, उकाराक्षर, वेद वेथ गहर, पावन जें ॥ २७ ॥
जेथ सृष्टि होए जाए, महासुख विसंवलें राहे, ते तुं प्रत्यक्ष पाहे, परीस पुत्रा ॥ २८ ॥
हैं अचळ मूळ तुंचि, जें आदि अंतिं येकचि, द्वैताद्वैत आपणचि येथ भेदु नाहिं ॥ २९ ॥
·
जैसे भांगार आदि अंतिं, तेचि मध्ये भाव भजति, परि वस्तु विचारेंचि तिं, तैसेंचि हें तुं ॥ ३० ॥
कांहिं चित्तिं नस्मर, तुंचि असभि निरंतर, तुंचि ये तुझे उपचार, अर्पलोंच असे ॥ ३१ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #43
--------------------------------------------------------------------------
________________
[२०]
मनोलय.
तुवां तुंचि मनिलें, तरि तूंचि अवघें झालें, मनाचें गेलें, मनपण गा ॥ ३२ ॥
पाहे पां विचारिं, तुच अससी निरंतरिं, मनांचा गहरिं, रिगौनियां ॥ ३३ ॥
मनां माजि रिघ पां, तं रिघालेपण नव्ह पां, नव्हलेपण सांडिं पां, सांडित्यें नसिं ॥ ३४ ॥
तेथ आणीक काय उरैल, आपणपांचि आपण असैल, जेथ शब्द हा खुंटैल, आपें आपु ॥ ३५ ॥
जें बोलतां न बोलवें, मनांसि न कळवे, तें होउनि अघवें, असताच असे ॥ ३६ ॥
पाहे पां तूंचि नाही, तेथ पाविजैल तें काइ, मग ध्यानां कवणिं ठाइ, सामावणी ॥ ३७ ॥
आधीं मनें उरावें, मग ध्यानातें धरावें, आता असो हैं आघवें, आणपांचि ॥ ३८ ॥
अगा हें अघवेंचि उकललें, कांहिंचि नाहीं गुंतलें, मज प्रतीति आले, म्हणौनि बोलिलां ॥ ३९ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #44
--------------------------------------------------------------------------
________________
[२१] पाहें पां तुंचि विचारिं, हे मन नाहीं ऐसें करि, तरि तुजावांवौ निरंतरिं, परिपूर्ण तुं ॥ ४० ॥ ___ जेविं उदकिं उदकबिंदु उठिती, विरालेयां उदकचि होति, तेविं आत्मस्वरूपिं होति जाती, भौतिकीयें ॥४१॥ ___ तैसें चैतन्य विकरलें, उंच नीच जालें, मध्ये पदर पडत गेले, कल्पनेचे ॥ ४२ ॥
ते कल्पना तुझी वितुळली, चित्तवृत्ति नाशली, भेदबुद्धी वुडाली, स्वरूपिंचि ॥ ४३ ॥
तें स्वरूपचि आपण, हे फुडें तुं जाण, वेदांत गुह्य प्रमाण, परिस पुत्रा ॥ ४४ ॥
आधिं रितें होआवे, मग धांउनि भरावें, भरीतचि असे स्वभावे, तरि भरावें काए ॥ ४५ ॥
. स्वात्मविचार.
आपण आपणपेयां वोळगिजे, आपण आपणपेयां म्हवण पूजा कीजे, आपण आपणेयां प्रसन्न होइजे, तेथ मागतें कवण ॥ ४५ ॥
आपण आपणेयां ध्याइजे, सेव्य सेवकां होइजे, पत्र पुष्प वाइजे, आपणपेयां ॥ ४७ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #45
--------------------------------------------------------------------------
________________
[२२] मुंगियेचां ठाउनु ब्रह्मवरि, सभराभरीत बाह्यांतरिं, हें आपण विचारिं, तुं शिष्य राजा ॥ ४८ ॥
येथ मिं आणि तुंचि नाहीं, तेथ हा प्रपंच रिगेल काइ, आपण आपणेयां पाहिं, तूंचि अससी ॥ ४९ ॥
प्रकृति पुरुषां परौतें, जें नीच जंतुमात्रा खालौतें, हें आपणपेंचि निरुतें, तु फुडें जाण ॥ ५० ॥
जो मध्य ना सेवटु, भरितु ना वोहटु, जें अवघें तुंचि निघोटू, तत्वसार पैं ॥ ५१ ॥
आतां हठमात्रा नलग, प्रवृत्तिकर्मा उमग, स्वात्मसिद्धि लाग, जेथें मी दिसे ॥ ५२ ॥
कांहिं प्रवृत्ति निवृत्ति मानसिं, तरि आपणपेयांनि मळ तुजसि, आणि भिं चुकसि, तरि गिवसिसि कोठें ॥ ५३ ॥
अनें साध्य म्हणिजे, तरि साध्यासि दुराविजे, नाहि तरि मनाहिं ऐसें किजे, तरि साध्य सिद्धे ॥ ५४ ॥
कापुसु उगउं जाइजे, नातरि उगवलें असे, तें सहजें, आपल्याचि ॥ ५५ ॥
पाहे पां पश्चिम दिशे जातां, आणि पूर्व दिशे चालतां, तो पावे दूरवार्ता, पदापदा ॥ ५६ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #46
--------------------------------------------------------------------------
________________
[२३]
ऐसे काहिं प्रवृत्ति करौनि पावों म्हणिजे, तर न पयौनि सिणीजे, नातरि निवृत्ति होइजे, तरि होणे तेंचि तुं ॥ ५७ ॥ __ मन सरौनि मावले, तेथ उरे तेंहि निमाले, तरि माहाशून्य उघडले, तेंचि तुं पैं ॥ ५८ ॥ __ जे न मंघतां सांधणे, न पाहाता देखणें, न बोलतां बोलणे, शुद्ध बुद्ध ॥ ५९ ॥
जें सकलगुण निधिवंत, सर्व प्रपंचातित, द्वैताद्वैत व्यक्तिरिक्त, साक्षिभूत जें ॥ ६ ॥
जिवाचे जिव्हार, परमात्मा माहेर, आणि गुढांसि गुढांतर, चैतन्य तें ॥६१ ॥
जेथें शब्दशास्त्र हारपे, पुण्यपापें न सिंपे, नेति नेति म्हणोनि वासिपे, वेदश्रुति ॥ ६२ ॥
जेयासि सुशब्दाचा कळंकु, अनुवादाचा द्वेषु, अद्वैतेंसि रोषु, स्वयं गुह्य ॥ ६३ ॥ ' जेथ जीव परमात्भेयांचि भांगारें हारपति, वेदांति विचाराचे पाए न व्हाति, अद्वैताचिया अहंमति, न लिंपेचि जे ॥ ६४ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #47
--------------------------------------------------------------------------
________________
[२४] जे स्वमेव एकचि, तयासि तोंच, आपणयां आपणचि, होउनि असे ॥ ६५ ॥ ___जं अतीतासि अतीत सर्वी सर्व भरीत, ते हे तुंचि अखंडित, जाण पुत्रा ॥ ६६ ॥
आतां बहुत काइ बोलावें, अवधे तुंचि जाणावें, एवं गुणी आपुलें बरवें, रूप जाण ॥ ६७ ॥
एसें वैर।ग्य उपजलें, तुज तुचि प्रकाशलें, तरि संसार हारपलें, स्वरूपिंचि ॥ ६८ ॥
एवं उपजले ज्ञान, ते तुचि तुं आपण, तरि सुष्ट गति गहन, पातलासि ॥ ६९ ॥
ऐसा आत्मबोधे बोधला, सुखशयनी सूतला, असे गगनी निमाला, आपुलांचि ॥ ७० ॥
अवकाश शून्यातातु, स्वयं शन्नी रतु, मन शेषि तृप्तु, होउनियां ॥ ७१ ॥
कर्मलीला. सहज शून्य भरितु, असें पुत्रा संततु, भुवनत्रयीं विचरतु, स्वयं लीला ॥ ७२ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #48
--------------------------------------------------------------------------
________________
[२५]
अनाश्रय वर्ततु, निर्गुणातीत मत्तु, अनुचित्तें कर्म करि तु, न बंधिजसि ॥ ७३ ॥ ___ परि तेंचि अनुचित्त कर्भ ऐसें, जे साक्षात परमानंदवशे, नेणौनि पाविजे आपैसें, जाणौनियां ॥ ७४ ॥ ___ जब ऐसें बोलिलें, तव शिष्याचे ध्वनित जाणितलें, उचितानुचित उरलें, कैरयेनि किजे ॥ ७५ ॥
तैसा केवळ शुद्ध बुद्ध, जेथे मावळला लोकत्रय संमधु, तरि अनुचित्त कर्म निषेधु, एथें कैचा ॥ ७६ ॥
ऐसें शिष्यचि, जाणितले मनिचे, तरि संतोषौनि गुरुचें, हेचि वाक्य ॥ ७७ ॥ ___एहविं भोगु का भोक्ता, कर्म का कर्ता, हे नाहिं चि तत्वता, ज्ञानियांसि ॥ ७८ ॥ ___ जरि रात्रि दिवसाचिये घरोपरि, असति काय सूर्याचा घरिं, तरी शुभाशुभे दुसरि, होति तेयां ॥ ७९ ॥
येणे जाणें ऐसे, नेणतेयाप्रति दिसे, जरि कांहीं जाणतेया ऐसें, जाणीतले ॥ ८ ॥
जरि जाणीतले, तरि शुभाशुभ निमाले, पाप. पुण्य गेलें, जळौनियां ॥ ८१ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #49
--------------------------------------------------------------------------
________________
[२६]
पापपुण्यलय. म्हणौनु आत्मबोधां पाहालें, तेयां पापपुण्य आंधारें सरले, शुभाशुभ गेले, नाशौनियां ॥ ८२ ॥ ____ ज्ञानियांच्या दृष्टी, पडलें भलें तैसेंहि कर्म नुठी, तोकरूपां दोषसृष्टी, परि बाधिजे ना ॥ ८३ ॥
अथवा अभक्ष भाक्षलें, अपेया पान जाल, अहं कतै केले, तेया बाधेना ॥ ८४ ॥ __येहविं ब्रह्माहमस्मि बोधु, जया जाला निशुद्ध, तो त्या पापपुण्य सन्मंधु, कदाचि नाहीं ॥ ८५ ॥
जन्हि महायज्ञ केले, कां माहापाप घडलें, केलें कर्म मनिहुनि सुनिटले, तरि कवण भोगी ॥ ८६ ॥ ___ मन पाप पुण्य कर, उन्मनी भोगे जरी, पाप पुण्य तरी, बाधिजे ना ॥ ८७ ॥ __जैसा निरंजनी जळतु, सर्व तृणबीज जाळितु, तो अग्नि का भोगितु, जळिनल्यातें ॥ ८८ ॥
तैसा अग्नीसादृश्य मुक्तु, जो तत्वबोधरतु, विधि. निषेधरहितु, बाधिजे ना ॥ ८९ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #50
--------------------------------------------------------------------------
________________
[२७] अगम्य घडलें, अवध्यहि वधलें, जरि मन प्रवर्तलें, ऐसेयासि ॥ ९ ॥
तहिं तो न बंधिजे, पुण्यपापें न घेपिजे, लिपिजे ना भुंजिजे, मनमुक्त जो ॥ ११ ॥
ऐसें केवढे अगाध, आत्मतत्व महाबोध, पुण्यपाप फळउछेद, अविनाशु जो ॥ ९२ ॥
ऐसा गुरु तत्वोपदेशु केला, तव शिष्यु संतोषला, आणि कृताकृत्य जाला, परिपूर्ण तो ॥ ९३ ॥
अतःकरणिं सुटला, जिवभावां मुंकला, स्वयं बोधे बोधला. गुह्य सुखें ॥ ९४ ॥ ___ ध्येय ध्याता विसरला, अखंडितु जाला, समदृष्टी मुक्तु मिसळला, तेया परी ॥ ५५ ॥
किंबहुना शिष्यु उपदेसिला, गुरुरहस्य पातला, परि आक्षेपु केला, तो आइका ॥ ९६ ॥
आक्षेप. तंव शिष्यु म्हणे जी ताता, मज कृपा केली आतां, तुमच्येनि प्रसादें तत्वता, कृतार्थ जालां ॥ ९७ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #51
--------------------------------------------------------------------------
________________
[२८] तापत्रये होतां तापलां, तुमचेया कृपा निवालां, परब्रह्म पातलां, अवाच्य जें ॥ ९८ ॥
गर्भवासु चुकलां, जन्ममरणां मुकला, जीवन्मुक्तु जालां, तुमच्येनि जी ॥ ९९ ॥
तुम्ही सर्वकळासपूर्ण, केला मिं परिपूर्ण, पण विनउनि पुसैन, ते सांधिजो जो ॥८.०॥ __ मुक्तामुक्त कर्म केलें, करून मन उदास जालें तें न बंधे ऐसें बोलिलें, तें कैस्येनि जी ॥ १ ॥ ___ असंभाव्य कीजे, आणि तेणें न बंधिजे, ऐसी मज नुपजे, प्रतीति हे ॥ २ ॥ __देखा पां समर्थाचे रीण काढिजे, परि मर्यादाति घेइजे, काढुन न काढिल म्हणिजे, धरूनियां ॥ ३ ॥
तैसें केलेयां न केले म्हणजे, मनें उदास होइजे, पण तेणोच बाधिजे. जेया परी ॥ ४ ॥
समाधान. तंव गुरु म्हणती सांधैन, आंगावरि काढिले रिण, तो पातला मरण, तरि कवण मागे ॥ ५ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #52
--------------------------------------------------------------------------
________________
[२९] तैसा मनें मनि मेला, तरि कर्म भोगु चुकला, येरा प्रतिग्रहो ठाकला, अप्रचेया ॥ ६॥
आक्षेप. तंव शिष्यु म्हणे अवधारां, हे प्रतीती आले उत्तर, पण संशयो माघारा, वर्ततु असे ॥ ७ ॥ ___तोही परियेसा सांधैन, विषयांवरि दावीन, दृष्टांतु बोलैन, आणिकु येकु ॥ ८॥ ___ ब्राह्मणाची विधवा नारी, साशंकित पुरुषसंगु करी, ते गर्भाभिळाषु न करी, परि गर्भसंभवु होयेचि किं ॥ ९॥ ___ जरि उदास वर्तली, आणि चोरिया प्रवर्तला, गुर्विणी झाली, जेयापरी ॥ १० ॥
तरी तो काय तिया मनोरथु धरिला, मग तियेप्रति फळला, तरि इछेविण जाला, गर्भु केवि ॥ ११ ॥
ते गर्भविषि उदास, हा कीर भर्वसा, तरि संभवला आपैसा, गर्भु वाढे ॥ १२ ॥
एवं शिष्यु बोलिला, तंव गुरुनु दृष्टांतु दाविला, उपपत्ती आणिला, त्याचिये पैं ॥ १३ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #53
--------------------------------------------------------------------------
________________
[३०]
समाधान. गुरु म्हणे उपाओ नेणती, तयां गर्भकम बांधती, येरी क्षारादिकें गाळिती, जाळीनियां ॥ १४ ॥
जैसा बिंदुप्ररोहो न पवे, तैसे उपाय जाणावे, बोषधि जाळाव, गर्भग्थान ॥ १५ ॥ ___ कां गर्भु संभवला जीर, आइकैं सल होतें परि, तिक्त क्षारिं, नास्ति कीजे ॥ १६ ॥
ते क्षार पथ्यकरी, तरि गर्भु जिरे जठरिं, सवेंचि बाहिरी, गळौनु पडे ॥ १७ ॥
तैसें नांव क्षार, सर्व कल्मष संहार, कर्म फळ थार, होंचि मेंदी ॥ १८ ॥
अंतरिं तत्वावलोकन वर्ते, मना प्रतीती परौतें, तत धर्तीचि निवर्ते, कर्म गर्भु ॥ १९ ॥ __ ते अवळोकन ऐसें, जे शुद्ध जाणणे असे, समस्त दोष दृष्टि रुसे, रुसणे नसिं ॥ २० ॥
भि जाणणे किं रुसणे, तेंहि गीळिजे जेणे, आणि केवळ उरे जे असणे, तोंच ते जाण ॥ २१ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #54
--------------------------------------------------------------------------
________________
[३१]
ऐसा जो बोधु, तो समस्तां दोषां करि वधु आणिकु येकु येकु बाळबोधु, बोलु परिस ॥ २२ ॥
तो दृष्टांतें तुं परयास, लोह लागलें परिसेंसि, तें सोनें होय अन्यासि, सूवर्ण तें ॥ २३ ॥
तरि तें काळेपण तें गेलें, परि तेंचि उजळ जालें, तेविं पशुपाश फिटले, प्रबोधतां ॥ २४ ॥
कां ज्योति तमीं प्रवेशे, आणि अंधकारु जातु न दिसे, तोचि प्रकाशे अनायासें, तेजगुणे ॥ २५ ॥
तैसें तत्वतेज निर्मळ, तेणें अज्ञान होय उजळ, निवर्ते अवलिला, कर्मतम ॥ २६ ॥
कामना न धरीतु, कर्म करीतो मुक्तु, तत्वदृष्टि अवलोकितु, प्राप्तु तो गा ॥ २७ ॥
शिष्योद्वार.
9
एवं विधिं दृष्टांतिं शिष्यासिं आलें प्रतित, म्हणें फिटली जि भ्रांति, तात्कालाचे पैं ॥ २८ ॥
संशय सल फिटलें, मन निशल्य जालें, मग म्हणें जी उद्धरीलें, कृपा करूनि ॥ २९ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #55
--------------------------------------------------------------------------
________________
[ ३२ ]
शिष्यू म्हणे ताता, निःसंशय जालां सर्वथा, परब्रह्मेआ तृप्तां केलें मातें ॥३०॥
"
मानसें मनोरथु पुरला, आणि स्वात्मबोधार्थ बाणला, दुस्तरु तरला, भवसिंधु हा ॥ ३१ ॥
जि तुम्हां देवांचि उपमा देतां, न्यून हें सर्वथां, कैवल्य ज्ञान मज पाहाता, तुम्हिच जी ॥ ३२ ॥
अंतष्करणीं बोधला, मग स्तुति करू लागला, तत्र गुरु निवारिला, संकेतें तो ॥ ३३ ॥
म्हणे रक्षिलां जि ताता, म्हणौनि चरणावरि ठेविला माथा, हे तत्व पाहातां त्रुप्ति नाहीं ॥ ३४ ॥
हे मनचि नाहीं सर्वथा, ते अनुपम्य साधतां या आत्मसुखा आता, तुम्ही केलि ॥ ३५ ॥
गुरूचें सांगणें.
तव गुरुमूर्त्ति म्हणे पुत्रा, येथ तुजचि आर्हता, हैं आणिकासि सर्वथा, सांघो नये ॥ ३६ ॥
हें तुवांचि जाणावें, आणिकांसि न सघावें, सृष्टिघातकां न व्हावें, आइक पुत्रा ॥ ३७ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #56
--------------------------------------------------------------------------
________________
[३३] जो संसार सुखातीतु, आणि वैराग्य युक्तु, तो करावा तप्तु, येरां सांघावे नां ॥ ३८ ॥
जेया विषयसुख न सरे, वैराग्य नाहिं पुरे, सांघितलेयांहि न पुरे, कांहिं केलें ॥ ३९ ॥
म्हणौनि तें सर्व गोप्य करावे, तुवांचि जाणावें, गुरु म्हणे न सांघावे, कव्हणा प्रति ॥ ४० ॥
ऐसेंहि जरि सांघितले, तरि तुवां काये जाणितलें, मूर्खासि येइल वहिले, प्रतीति कां ॥ ११ ॥ __ जे विषयसुषे भुलति, ते ब्रह्म केवि जाणति, बापुडे ठाकति, चोचावले ॥ ४२ ॥
म्हणौनु सांघितले नेणति, विचंबले ठाकति, भ्रष्टाभ्रष्टिं सिणति, गर्भवासिं ते ॥ ४३ ॥ ___ आतां जाणावें निगुते, नेणणें रिगों नेदावें तेथें, एहावें गर्भवासि बहुतें, दुःखें असति ॥ ४४ ॥
प्रश्न
गुरु ब्रह्मोपदेशु करिति, एर ते सवेंचि विसरति, तयां कवणि गति, शिष्यु पुसे ॥ ४५ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #57
--------------------------------------------------------------------------
________________
[३४]
उत्तर. __तंव गुरु म्हणे महामति, आतां परिस ते गति, इच्छेच्या पावति, योगातें ते ॥ ४६॥ ___ ते उत्तम कुळिं जन्मति, शुचि प्राज्ञ होति, आणि विधियुक्त भक्ति, करिति ते ॥४७॥ __ मग तोषे अनुक्रम पावने, पावे देवत्रय चिन्हें, तेयांचेनि माने, आयुष्य भोगा ॥४८॥ __ मग तो मर्त्यलोकी उपजे, माया मोहें न घेपिजे, आणि स्वयं ज्ञान सहजे, योगु पावे ॥ ४९ ॥
शंका. तव शिष्य म्हणे परियसा, तया तत्वज्ञा विधि काइसा, जो उतकर्षु स्वेच्छा, सर्व कर्मि ॥ ५० ॥
निरसन तंव श्रीगुरु म्हणति, तेया देवांचि विघ्ने पडति, त्ये तेया करिति, उपसर्ग ॥५१॥
कव्हणी येकु ज्ञानाचिया चाडा, रिगाला वैराग्या फुढा, तव देवाचा धाडा, पडला तेया ॥ ५२ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #58
--------------------------------------------------------------------------
________________
[३५] ज्ञान जाणावे या लागि, लागला गुरुचा संगि, तरि देवाचा आंगि, अनि जळे ॥ ५३ ॥
कव्हणा एकाचा विचारिं, देखिलि ज्ञानाचि उजिरि, तरि कुदळिघात वरि, आरोढिले ॥ ५४ ॥
देखां पां शुकदेवो चालविले, रंभेचे पोट चिरविले, ऐसें अकृत्य केलें, केसणे पैं ॥ ५५ ॥
संन्यासि कां तापस, ज्ञानहनि बहुवस, ते घडिये खापर सादृश्य, करून फेडी ॥ ५६ ॥
जरि म्हणसि कवण, तरि सान ते जाण, लोष्ट कपालि सहितु आपण, इदृ देखे ॥ ५७ ॥ __ हे बलि अविद्या करिति, उपसर्ग चिंतिति, आमचे पद इछिति, म्हणौनियां ॥ ५८ ॥
एहविं ज्ञाने जो सरिसा, तयासि विघ्नलेशु काइसा, हे साधकाचि दशा, सांघितली ॥ ५९ ॥
प्रसादप्राप्ति. तव शिष्ये विस्मयो केला, अंतष्करणी संतोषला, मग चरणा लागला, श्रिगुरुचेया ॥ ६ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #59
--------------------------------------------------------------------------
________________
[ ३६ ]
चरणावरौनु उठविला, समीप बैसविला, मग म्हणे देवाहुनि आगळा, केलां तुम्ही ॥ ६१ ॥
हर्षविनोदें फुडा, नाचतु गुरुपुढां विचि म्हणे मज गोड, दिधलें स्वामिं ॥ ६२ ॥
"
गुरुचरण मस्तकीं ठेविले, आणि पोटेंसि धरिले, मग हात पसरले, प्रसादासि ॥ ६३ ॥
गुरूनि मूखचा उगाळु दिधला, महाप्रसाद म्हणौनि येरे घेतला, मग शिष्यें पुसिला, सिद्धपंथु ॥ ६४ ॥
सिद्धपंथ.
शिष्यु म्हणे ताता, कवण कवणा प्राप्ता, या वस्तू तृप्ता, अनंत सिद्ध ॥ ६५ ॥
आदिनाथा प्रसादें, उमास्वामिसंवादें, मछिंद्र प्रबोधें, प्रकट जाले ॥ ६६ ॥
जो पद पिंड ज्ञाता, निगाले करचरण दृष्टांता, तो जाण चौरंगीं सिद्धांता, कुळ दिपकु ॥ ६७ ॥
श्रीगोरक्षनाथ, देह सिद्धि सिद्धांत, परमतत्व विख्यात, आचार्ये जाण ॥ ६८ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #60
--------------------------------------------------------------------------
________________
[३७]
श्रीमुक्तादेवी योगीनि, जे समस्त सिद्ध शिरोमणि, तिये प्रसादें चक्रपाणि, ज्ञानसिध्दु ॥ ६९ ॥
जळांघरु मेडुकि कंथडि, धुंधडी, कापड, विरूपाक्षु ॥ ७० ॥
सर्व सुसावेरी, नागार्जुन कणेरी, लुइलाला कुकरि, रत्नघोषु ॥ ७१ ॥
कान्हु कुदाळ, दारिपु कलालि, भुसकु कांबळ, कोरंटकु ॥ ७२ ॥
चर्पट कपीट कांसारि, चाटु भाटु कुंभार, कनखळु मिखळु चमारि, साति तांति ॥ ७३ ॥
घटामहिषु चोखली, सर्व भक्षकु सिद्ध वरली, काश्यपु चिहाळी, घटु मनाक्षु ॥ ७४ ॥
पंकज दुखंडि, लिचका परखंडि, जळांघरु कवडि, निर्गुण भंगी ॥ ७५ ॥
कुमुदु गुडरी, वोडिका कावेरी, पाहाणु सागरी, अजपा बोधि ॥ ७६ ॥
अवधुतु गुंड मराउळ शबरी, मनु अजगीरि, जिराबाई खेचरी, देमादेवी ॥ ७७ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #61
--------------------------------------------------------------------------
________________
[ ३६ ]
भादु माहिळु चिंचणी, धामु धूम्र टिंटिणि, अतिबळु महाबळु माथणी, गोविचंदु ॥ ७८ ॥
बोधि जैनंदु, कपाळि सोमचंदु, भर्तुरि विजयचंदु, ताल्हा तेलि ॥ ७९ ॥
चंडाळि हाडि, डोंकि घोडा चुळि, गोदाइ थाकडि, विमळनाथु ॥ ८० ॥
वणकाकळि, षडगु कोकावळि, मेदडि सुतली,
सर्व भक्षु ॥ ८१ ॥ हरिध—
..... ......
देव, पर
शिवा परौती धांव, महिमेसि गा ॥ १२ ॥ गुरुभक्ति.
ईश्वर वाचा ऐसीचि, सर्व शास्त्र सिद्धांत तैसेचि, तरितुं गुरुद्रोहो कहिंचि, पडों नेदिं ॥ १३ ॥
गुरु जेथनि देखिजे, तेथेंचि लोटांगण घालिजे, कां जिये दर्शि आइकीजे, नमस्कारिजे तया देशा ॥१४॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #62
--------------------------------------------------------------------------
________________
[ ३९ ]
गुरुस्थानिंहुनि आलें, कां गुरुकथन केलें, येर व्यापार राहाले, आइकावे या ॥ १५ ॥
ऐसी अनन्य भक्ति, तोच उत्तम पुरुष असति, आणि गुरुभक्ती परौति, सिद्धि नाहीं ॥ १६ ॥
देहें मनें वाचा, गुरुसेवे आदरु जेयाचा, तरि शिवोस्मि हो तेयाचा, बोधु वाढे ॥ १७ ॥
अज्ञान निःशेष जाये, केवळ ज्ञान राहे, आपणपें आपण पाहे, गुरुसेवा पैं ॥ १८ ॥
ऐसे आपण येोनि फललें, जें अटक गुरुसेवाबळें, परि गुरुवचन केवळें, उलंघावें ना ॥ १९ ॥
गुरु करिती तें न करावें, गुरु बोलती तें न बोलावें, आणि गुरुचें न चोरावें, कांहिंच गा ॥ २० ॥
गुरु सांघती तें कीजे, गीत कां गुरुसिं पाठांतर न कीजे, गीत शास्त्रिं ॥
गुरु जिये आसन बैसति, कां भुवनीं जिये वसती, तिये सेवाबुद्धि पूजजति, चित्तशुद्धि ॥ २२ ॥
शास्त्र नोचरीजे, २१ ॥
गुरुचे गुरु तेही मनी धरीजती, गुरु तत्विं पूजी - जति, गुरुनाममाळा वाइजती, वैखरीसि ।। २३ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #63
--------------------------------------------------------------------------
________________
[ ४० ]
गुरुद्रोह.
ऐसें जो न करी, तो आपणपयां वैरी, आणि निरययोनि माझारि, पडे तो पैं ॥ २४ ॥
गुरुसि वादु करिती, आणि वेद निंदा करिती, ते ब्रह्मघातक होती, महापातकी ।। २५
गुरु वचन मनिं न धरिती, गुरुसिं अहंकारु करीती, तो जाचिजे अघोरिं, गभवासिं ॥ २६ ॥
गुरुवचनांचेनि अहंकारें, कुकमैं पतितु आचरे, आणि गुरुचें विसुरे, नाहिं करी ॥ २७ ॥
ज्ञानी जो विविधु, ऐसा जो असे समंधु, तो लोपौनि अपवादु, आचरे जो ॥ २८ ॥
तो कल्प संख्या वर्षे, असे तो अवगती मुखें, भोगौनियां निमिषें, रोगिया होए ।। २९ ।।
जहीं जाला त्रिकाळवेत्ता, सिद्ध लक्षणीं पूरता, परि गुरुत्यागें सर्वथा, नरक भोगी ॥ ३० ॥
जेणें गुरुसेवा लोपिली, प्रमाणकिया लंघिली, तेणें अधोगती आपुली, वृत्ति केली ॥ ३१ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #64
--------------------------------------------------------------------------
________________
[४१]
जो गुरुतें त्यजूनु जाए, निंदा पैशुन्य खाए, तो पापिया योगी नव्हे, वस्तु करूनु || ३२ ॥
ऐसिया अभक्ती, आपुले गुरु लंघिती, मग आणिकासें करिति, पुश्चळीकें ॥ ३३ ॥
पहिले येकुरूकरीती. एकुचि दिसु मानिती, मग नावडे तार करीती, आणिकु येकु ॥ ३४ ॥
ऐसे गुरु सांडोवे करिती, तैसेचि गुरुद्रोहिं पडती, तयाचि परी भोगीती, गर्भवासु ते ॥ ३५ ॥
गुरु करावेया करिती, मग करुनियां सांडिती, हीण ते त्यजीती, पापबुद्धी ॥ ३६ ॥
तेयां गुरुवधा पाप धडे, आणिक शिवद्रोहो पडे, ते अधोगती रोकडे, घालीजती ॥ ३७ ॥
प्रश्न.
तंत्र शिष्य म्हणे स्वामी, कांहि येक पुसैन जी भिं, तें प्रसन्न होउनि तुम्हीं, सांधावें भज ॥ ३८ ॥
एक खंडज्ञानीं लागले, येक मंत्रयत्रिं जडले, अधमोपदेशि पडले, अघोरे पैं ॥ ३९ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #65
--------------------------------------------------------------------------
________________
[ ४२ ]
उत्तर.
तंव गुरु म्हणती, ते आधिंचि कां नेणती. मग करूनियां करिती, विचारु कां ॥ ४० ॥
ते साच किं लटिकें, हें आधिचि जाणावें निकें, नाहिं तरि साशंके, पात्र होइजे ॥ ४१ ॥
आधीं धडफुडें विचारिजे, मग गुरु कजे, जेवि कुळकन्या वरिजे, जाणौनियां ॥ ४२ ॥
मग केलेयारि ऐसी, हे चिखिमिखी काइसी, पीर आणिक परियोस, उपाओ असे, ॥ ४३ ॥
तरि जयाचा अनुग्रहो आधिं, तयातें पुसावें त्रिशुद्धी, तै आणिकी ठाई बुद्धि, करूं लाहे ।। ४४ ।।
कां आधिला गुरुचेोन अभावें, आणिका गुरूतें भजावें, तैं दोषातें न पवे, साधकु तो ॥ ४५ ॥
गुरु देवंगत होती, कां दिपांतरा जाती, तेया वांचून आणिके ठाई संगती, करूंचि नये ॥ ४६ ॥
जो योगु पहिलिये ठांइ सांघती, तोचि संवादु आणिकी ठाई देखती, तरि आधील गुरु मानिजती,
त्रिशुद्धि गा ॥
४७ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #66
--------------------------------------------------------------------------
________________
[ ४३ ]
येन्हविं कपाळी जडे, नाथिला दोष घडे, जैं आंधळें पर्डे, कराडिसि ॥ ४८ ॥
निर्देवें मानं शुद्ध नव्हति, मग गुरूवार गुरु करिति, ते तैसेचि लोटिजति, अधोगति ॥ ४९ ॥
सदैव तो कोलि भला, जेणे मातियेचा द्रोणु केला, तेयाचा ऐसा विश्वासु जाला, तरि असिड कवणु ॥ ५० ॥
कां सति सावित्रि होउनि, लग्न लागतांचि निधान, भर्ताराचें आइकोनि मन, दृढ चित्त केले ॥ ५१ ॥
ऐसा विश्वासु जेथें, ते तत्पुरुषु निगुते, जे लोटतेयां जुगां मागुते, स्थिर करितीं ॥ ५२ ॥
जो पहिला संकल्पु उठिला, तो तेणें साच केला, तरि शिष्यधर्मु चालता केला, सदैवे तेणें ॥ ५३ ॥
एन्हा गुरू कर्ज, तो मना नये तरि आणिका भजि - जे, तरि गुरुद्रोही कोठें ठेविजे, अधर्मेसि ॥ ५४ ॥
ऐसा अप्रमादु न घडे, तेयाचें ज्यालें वाढे, आणि जिवे ते पुढे, तेया ठाके ॥ ५५ ॥
म्हणौनि प्रयत्नें सेवा कर्ज, मनोवृत्ति भंगो नेदिजे, अवज्ञाने देखिजे, गुरुदेवासि ॥ ५६ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #67
--------------------------------------------------------------------------
________________
[४४
ईश्वरादिक कोपति, ते श्रीगुरूनि राखिजति, आणि श्रीगुरु कोपति, तरि कवणु राखे ॥ ५७ ॥ ___ जो गुरूचा मनी नुरेचि, तो असतां बोधु न पवेचि, कर्मिरूप बसेचि, अर्धकूपीं ॥ ५८ ॥ ___ गुरु येणे आकारें, उमासहितु हरिहरें, वसिजे चराचरें, श्रीगुरू मुर्ति ॥ ५९॥
ब्रम्हाकोटि मध्यन्तु, जितुके काहिं वर्तत, तें श्रीगुरु चरणीं वसत, नितिवंत पैं ॥ ६ ॥ ___ गुरुचरण सेवौनि. आगि हात लावौनि, जिये जळें योत स्पौंनि, तिये तिर्थरूपें ॥ ६१ ॥
गूरु तिर्थरूप जाणिजे, अवज्ञाभेदे न देखिजे, द्रोहो पडो नेंदिजे, दोषदृष्टि ॥ ६२ ॥ __ हे सिद्ध धर्म साधिति, जे ईश्वर बोलिजति, ते आम्हि तुजप्रति, सांघितले ॥ ६३ ॥
प्रश्न. तव शिष्यु म्हणे ताता, गुरु सेविजति आत्महिता, परि प्रमादवशे अवचिता, द्रोहो घडे ॥ ६४ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #68
--------------------------------------------------------------------------
________________
[ ४५ ]
तरि जे याचेया उत्तर, गुरुद्रोहो घोष निस्तर, ऐसेयाच्या उपसारा, सांधिजो जि ॥ ६५ ॥
उत्तर.
तव संतोषोनि गुरुनार्थे, म्हणितलें शिष्यातें, आगा गुरुद्रोहो निवर्ते, गुरुकृपा वि
.....
........ ......
शिष्य म्हणे, आतां जाणिजैल कवणें, मज बोलतांचि अवघडवाणे, बोलणें जें ॥ ९२ ॥
जें हालऊनि न हालणें, नेदखौनि देखणें, सघणवट असणें, व्योम जैसें ॥ ९३ ॥
जे जाणणैचि केवळ, स्वरूपचि निश्चळ, ते म्यांचि मिं निष्फळ, जाणितलें जी ॥ ९४ ॥
ऐसें जाणणें निवडलें, जैसें पाहलेंचि पाहालें, तेंचि तें लाधलें, भ्यांचि मातें ॥ ९५ ॥
ऐसा बोधाचा केवळु, केला मज सुकाळु, कीं जाणावें या अळुमाळ, उरेचि ना ॥ ९६ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
·
www.umaragyanbhandar.com
Page #69
--------------------------------------------------------------------------
________________
[ ४६]
किं जाणणेंचि जालें, आतां द्वैतभाव गेले, नाशौनियां जी । ९७ ॥
आतां जैसें असें तैसें असताच असे, असणेंचि
"
किं जाणावें या मूळ आलें,
असे, अदृश्या शिउ ॥ ९८ ॥
"
ऐकांतासि येकांतपण, परिपूर्ण परिपूर्ण चतुष्टया सि कारण, निर्गुण जे ॥ ९९ ॥
जे येकलेचि येक, आणि शषासि शेष, सुखासि सुख, सुखचि जे ॥ १००० ॥
सदा तृप्त तृप्तवंत, आपणांपांचि निवडत, आपणपेंचि आपण असत, आपणपेंसिं ॥ १ ॥
तुम्हीं कृपादृष्टी पाहिलां, मग आपणपेंचि उठिला, किं उठिलेंपणें जालां, आपणपेंचि ॥ २ ॥
आणि आपणपेंविण कांहिं, विश्वि दुजेंचि नाहिं, अंतिं बोलणेयांचि लिहि, पुसिली जी ॥ ३ ॥
आतां बोलणेयांचा मागु मोडिला चतुष्टयाचा ठाओ फेडिला, तो पैलुपारु पातला, तत्वकृपा ॥ ४ ॥
तुमचिया कृपेच्या भरोवरी, प्रपंचा केली बोहरी, कीं दुसरेपण निदसुरी, सांडोनि गेलें ॥ ५ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #70
--------------------------------------------------------------------------
________________
[४] आतां संसारशंका फीटली, पंचमहद्भतिं भूतें विरमलिं, ऐल पैला मिळालिं, भवबीजेंसिं ॥ ६॥
जिवाची जिवदशा गेली, आणि शिवाची विवंचना ठेली, स्वमेव प्रतीति जाली, अबोलणें जें ॥ ७ ॥
जी म्यां आपण देखिल ऐसे, न देखणेयां सारिखे जैसे, नेणणेयां सारिखें असे, एकचि जें ॥ ८ ॥
ऐसें जें ब्रह्म अमित, अंतर्बाह्य भरीत, संपूर्ण दावित, जालेपणें ॥ ९॥ ___शिष्यु बोलावें तें बोलिला, मग निवांतु बोल नुठेला, अवळोकुं लागला, गुरुमूर्तीतें ॥ १० ॥
ऐसा श्रीगुरूचि जाला जाणीतला, प्राप्तीत हा पातला, आतां स्वरूपिं आपुला, घालुं यासि ॥ ११ ॥ __गुरु म्हणती शिष्यु मुक्तु भला, मिचि ते हा जाला, आतां करुं आपुलां, निजभक्तु ॥ १२ ॥ __तंव श्रीगुरु जाले प्रसन्न, पसरौनि विशाळ वदन, जैसे उजळले गगन, चंद्र बिंबिं ॥ १३ ॥
मग श्रीगुरु म्हणती शिष्यातें, आता तुं प्रवेश गा येथें, पावलासि मातें, अभेदरूपें ॥ १४ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #71
--------------------------------------------------------------------------
________________
[४] ऐसा ध्वनि आइकिला, तंव शिष्यु मुखिं प्रवेशला, जैसा प्रकाशु मीनला, प्रकाशासि ॥ १५ ॥
कां समुद्रिं समुद्रु मिसळला, कां आकाशिं आकाशालयो जाला, हरिहरां जाला, ऐक्यवादु ॥ १६ ॥ __ तैसें उभयतां मीनले, ब्रह्मतीज येकवाटले, गुरु राशि वाढीनले, असंख्यात ॥ १७ ॥
गुरुनु शिष्याचा घोंटु भरूनु, आपणयांहि मिठी देउनु, प्रतीतिमागु सांडौनु, राहिला पैं ॥ १८ ॥
आतां मागां पुढां एकुचि, घनदाट गुरुचि, तया सुखा न येचि, रूप करूं॥ १९ ॥
गुरु शिष्य येक जाले, तें जालेपणहि गेले, गेले. पण राहिले, वटेश्वरिं ॥ २० ॥ ___ ऐसा शिष्यु गुरुभक्ति बोधला, वेदगुह्य पातला, कविता धर्मे संपला, प्रबंधु हा ॥ २१ ॥ ___ हे चतुर्विध भक्ति, हा पांचवां पुरुषार्थ जाणती, ते कष्टिं समाप्ति, पावविली ॥ २२ ॥
महाी बोलिलां आरज, बाळबोधपणे विरज, गुरुवटेश्वरिं वाइली पुजा, चांगा म्हणे ॥ २३ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #72
--------------------------------------------------------------------------
________________
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
• कासमु समुद्रमिसळ को नया मीनल जियकीय
आयएमोहिम
चाहुतमनाआ विघनदाटर वितया सुखान गेलपणराहिलीवि लाभहाि माटी बोलिली रजादा
214
सर्वतीर्थ यज्ञफलापाविजेलाहका
2
जाना रिवाद्वारा
शिष्यव
तमाम
परिपक्व नवलपर
य
माठीपावली २२॥
है।
वाकदरपत
वांग अवधुत्र सिमानामा दनुवशङ्कुकि ॥ कवसवचारमातिथी
गाती थी के
महिमाकाणुसेविनाष्टयज्ञसंपादनाशामा
Page #73
--------------------------------------------------------------------------
________________
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #74
--------------------------------------------------------------------------
________________
[४९] सर्व तीर्थ यज्ञ फळ, पाविजे अवलिळ, हे कथा परिसतु निर्मळ, श्रोते वक्ते ॥ २४ ॥ ___ वटेश्वराचा सुतु, चांगा म्हणे अवधुतु, सिद्धसंकते मातु प्रगट केली ॥ २५ ॥ ___ हा ग्रंथु पावला समाप्ति, तै शााळवाहनु शकु किती, कवण संवत्सरु मासु तिथी, वारु कवणु ॥२६॥ ___ कवण क्षेत्र स्थान देवता, कवण गंगा तीर्था, कैसी महिमा कवणु सेवित, पृथज्ञ सांघों ॥ २७ ॥
शके चौतिसें बारा, परिधावी संवत्सरा, मार्गशिर शुद्ध तीज रविवार, नामसंख्य ॥ २८ ॥
हरिश्चंद्र नान पर्वतु, तेथ महादेओ भक्तु, सुर सिद्धगणी विख्यातु, सेविजे जो ॥ २९ ॥ ___ हरिश्चंद्र देवता, मंगळ गंगा सरितः, सर्व तीर्थ पुरविता, सप्तस्थान ॥ ३० ॥
ब्रह्मस्थळें ब्रह्म न संडितु, चंचल वृक्षु अनंतु. लिंगिं जगन्नाथु, महादेओ ॥ ३१ ।
ऐसा सर्वांचा समाओ, कळी संसारु दुःखाचा प्रवाहो, ता देओ मोक्षाचा उत्साओ, शनैः शनैः ॥ ३२ ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #75
--------------------------------------------------------------------------
________________
[५०] जो तीर्थासि तर्थि, केदारेंसिं तुकिताति, आणि क्षेत्रिं निर्माती, प्रबंधु हा ॥ ३३ ॥
आतां गणनाथ सरस्वती नमस्कार दिनप्रती, जिहिं योगनिर्वाणसमाप्ति ग्रंथु नेला ॥ ३४ ॥ ___ इति गुरुशिष्य संवादे, तत्वसार प्रबंधे, कथिलें वटेश्वरप्रसादे, योगरहस्य हे ॥ ३५ ॥ __ ऐसी चतुर्विध भक्ती रसाळ, वोविया दसाडशत रत्नमाळ, वाइली वटेश्वरचरणयुगळ, चांगा म्हणे ॥३६॥
॥ इति श्री गुरुशिष्य संवाद तत्वसार पूर्णामिति ॥
॥ शुभं भवतु । श्री वटेश्वरार्पणमस्तु । शके १४८३ दुर्मतिनाम संवत्सर अषाढ शुद्ध १ शुक्र नदिने पाथर्ग स्थाने केदारलिंग समीपे बोग पाठकेन इद पुस्तकं लिखितं ॥ शुभं भवतु ॥ लेखकपाठकयोर्विजयी रस्तु ॥ शिवार्पणमस्तु ॥
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #76
--------------------------------------------------------------------------
________________
टीपा. ॐ नमः कुंजरेश्वराय-हा प्रणाम ग्रंथलेखकाने केलेला आहे की ग्रंथका चांगदेवाने, हे सांगणे कठिग आहे. कुंजरेश्वर नांव संस्कृत वाङ्मयांत उपलब्ध नाही. याचा अर्थ गणपति होऊ शकेल किंवा हे एकाद्या कुलदेवतेचेही नांव असू शकेल.
म्यां--जुन्या मराठीत म्यां, मियां व क्वचित् मेयां अशी रूमें आढळतात. संस्कृत मया' वरून ही रू झाली आहेत.
गगेश्वरु--गणपति. अकारांत नामें, विशेषणे व कांहीं धातुसाधितें जुन्या मराठीत उकारांत वापरलेली आढळतात.
कल्मझवनकुठारु--नापरूपी वनाचा नाश करणारा. 'कल्मक्ष हा शब्द सं. 'कल्मष' याचा अपभ्रंश आहे. अशा प्रकारचों रूपके मराठी जुन्या वाङमयांत हवी तेवढी सांपडतील. याच ग्रंथांत अशा रूपकांची रेलचेल कमी नाही. 'कल्मष ध्वंसकारी' पद हितोपदेशांतही सांपडतें.
(२) सौजन्यांचा अंकुरु--चांगलेपणाचा कोंभ. प्रथम पदावरील अनुस्वार लेखकत्रमादाने आला असावा. वरील प्रकारचेच हेही रूपक आहे पण येथें समास न वापरतां विग्रहवाक्य वापरले आहे.
शब्दब्रम्हविद्या-वेदविद्या.
उन्मेप-या शब्दाचा मूळ अर्थ डोळे उघडणे असा आहे. यावरून पुढे याचा अर्थ अज्ञानांधांचे डोळे उघडणारे ज्ञान असा झाला. येथे याच अर्थाने हा शब्द आला आहे. ज्ञानाचा तरुवर हाच खरा कल्पवृक्ष म्हणजे ज्ञान हेच खरोखर कामना पूर्ण करणारे आहे.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #77
--------------------------------------------------------------------------
________________
डुल्लत्तु-डुलत असतो. या प्रकारच्या धातुसाधित विशेषणाचे रूप प्रायः उकारांत सांपडते. शेवटील तकाराचे द्वित्व मागील लकाराच्या द्वित्वामुळे आले आहे.
अभिनवितु-अभिनय करितो. 'य' चा 'व' झाला आहे.
कुविद्याभरणहुताशनु-चांगदेवाने या ओंवींत अविद्या व कुविद्या यांतील भेद मोठ्या गमतीने दाखविला आहे. अविद्या म्हणजे विद्येचा अभाव हा स्वाभाविक असतो. विद्या शिकण्यापूर्वी प्रत्येक मनुष्य अविद्यच असतो. म्हणून अविद्येस स्वाभाविकपणे वाढणाऱ्या गवताची उपमा दिली आहे. पण कुविद्या ही स्वाभाविक नसून स्वतः मिळविलेली असल्यामुळे कृत्रिम व म्हणूनच अलंकारा सारखी असते. अलंकारा प्रमाणेच कुविद्येचीही माणसास ऐट असते. चांगदेवास स्वतःच आपल्या कुविद्येची जाणीव असल्यामुळे त्याज कडून हा भेद दाखविला जाणे अपरिहार्यच होतें. ज्ञानाग्नीस अविद्या तृणास जाळणारा पण कुविद्याभरणाची आहुति खाणारा मुद्दामच म्हटलेंसें वाततें.
ज्ञानाज्ञी-ज्ञानाग्नि, असा पाठ हवा.
गिरिजे शंभुचा–गिरिजेचा म्हणजे पार्वतीचा व शंभु म्हणजे शंकराचा. चांगदेवाच्या भाषेतील हे प्रथम पदाचें सामान्यरूप ध्यानात ठेवण्यासारखे आहे. हिंदीत हा प्रघात सरसहा चालू आहे.
वाचा प्रदक्षिणा करुनु-वाणीने प्रदक्षिणा करून. वाचा हे संस्कृत तृतीयैकवचनांत रूप मराठीत बरेच वेळ तसेंचे तसेंच सांपडतें. उदाहरणार्थ कायावाचामनें. आणखीही काही संस्कृत रूपें मराठीत तशीच राहिली आहेत. जसें राजश्रिया विराजित. ऊन प्रत्ययांत धातुसाधित अव्ययाचें उकारांत रूप श्रीशिवाजी माहराजांच्या वेळच्या पत्रव्यवहारकालापर्यंतही सांपडतें.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #78
--------------------------------------------------------------------------
________________
साष्टांग प्रणमनु – साष्टांग नमस्कार. 'प्रणमुनु' हें रूप 'प्रणमनु' असें पाहिजे. कारण येथें हें ऊन प्रत्ययांत धातुसाधित नसून नाम आहे. साष्टांग नमस्काराची प्रथा महाराष्ट्रांतील असून ती अजूनही 'सा. न. वि. वि.' यांत संक्षेपानें विद्यमान आहे. 'साष्टांगी नमन करुनि आठ वण' या आर्याचरणांत पंतांनीही साष्टांग नमस्कारांमुळे दोन हात, दोन पाय, दोन गुडघे, छाती व शिर या आठ अंगांस घट्टे पडण्याच्या प्रघाताचा उल्लेख केला आहे.
(७)
मूळिका -- मूळ, मुळो.
काश्मिरीची नायिका - विद्येची अधिदेवता. काश्मीर देश दहाव्या शतका पासून बाराव्या शतकापर्यंत विद्येचें माहेरघर झाल्यामुळें त्याकाळीं काश्मीरी हा शब्द विद्या किंवा विद्वानांचा वाचक झालेला होता.
बुधीसी बुद्धीस.
वागेश्वरी - संस्कृत 'वागीश्वरी' चें मराठी अपभ्रष्ट रूप.
(८)
गोक्षीरघवळ-गाईच्या दुधाप्रमाणें शुभ्र.
उभयकुळ—–सासरचें व माहेरचें अशीं दोन्हीं कुळें. सरस्वती, ब्रम्हपुत्री व शिवस्नुषा असल्यानें-- तिची दोन्हीं कुळें शुद्धच होतीं.
( ९ )
जिये -जिला.
पाशांकुशघरण — फांस व अंकुश यांचे धारण. चांगदेव यानें शारदेचें 'वीणा पुस्तक धारिणी' असें वर्णन लें नसून 'पाशांकुशधारिणी' असें केलें आहे. यावरून त्याचे मतानें विद्या ही केवळ विनोद व आनंद उत्पन्न करण्यापेक्षां चित्तास' बांधणारी व इष्टकार्याकडे प्रवृत्त करणारी आहे. 'योगश्चित्तवृत्ति निरोधः या तत्वाप्रमाणें वागणाऱ्या योगेश्वरास हें साजेसेंच आहे.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #79
--------------------------------------------------------------------------
________________
महिमाग्ने–लेखकाच्या प्रमादाने हा शब्द असा लिहिला गेला आहे. 'महिमा' ही तीन अक्षरे लिहिल्यावर पुढच्या ‘गहन' शब्दांतील 'ग' लिहिला गेला. पण काना देऊन त्यास पुरा करण्यापूर्वीच लेखकाच्या लक्षांत आपली चूक आली व त्याने 'ने' हे अक्षर लिहिले. पण 'ग' चा अर्धभाग खोडावयाचा तसाच राहिला. येथील शब्द 'महिमानें' म्हणजे मोठेपणामुळे, असा आहे. १३व्या ओंवीचा प्रथम चरण 'जे महिमानें गहन' असाच आहे.
(१०) नवरस-शृंगार, हास्य, वीर, करुण, रौद्र, भयानक, बीभत्स, अद्भुत व शांत, हे नऊ रस. सप्तस्वर-षड्ज, ऋषभ, गांधार, मध्यम, पंचम, धैवत व निषाद हे सात स्वर
(११) अती, ति-येथें कांहीं लेखन दोष असावासे वाटते. अर्थ स्पष्ट लागत नाही.
(१२) लंबिके, खेचरी ही दोन्हीं योग शास्त्रांतील देवतांची नावे आहेत. या नांवाच्या मुद्राही आहेत.
(१३) अनुवादली—बोलली. सरस्वती प्रसन्न होऊन 'भलारे' असें म्हणाली.
(१४)
आतां-येथे प्रथम पृष्ठ संपलें. पुढची पत्रे न मिळाल्याने पुढे काय असेल हे सांगता येत नाही. पण गणेशशारदावंदना नंतर बहुधा गुरुवंदन असेलसें वाटते. हे सांपडतें तर चांगदेवाच्या गुरूबद्दल काही माहिती विशेष मिळण्याचा संभव होता. येथून पुढची १९ पर्ने म्हणजे ५९० ओंवी पर्यंतचा भाग गहाळला आहे.
(५९०) देह अहंतेसि-देहाभिमानास. या ओंवींत वैराग्याची अत्यंत सुंदर व्याख्या दिली आहे. देहाचा अभिमान सोडणे याचंच नांव वैराग्य. 'रुसणे' या शब्दानें Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com
Page #80
--------------------------------------------------------------------------
________________
फारच बहार केली आहे. समर्थांच्या 'प्रीतिविण रूसूं नये' या सांगण्याप्रमाणें देहाची प्रीति अगदी स्वाभाविक आहे. पण तरीही देह आपला आहे ही गोष्ट ठाऊक असूनही त्याचा अभिमान न बाळगणें हेंच खरें वैराग्य.
इछा - इच्छा.
आपेसें-- आनें आप. याचें शुद्ध रूप आपैसें हिंदी 'आपही से' पासून आपईसें. आपैसें, आपेसें असें झालें असावें .
(५९१)
अष्टांग योग भ्यानु--अञ्टांग योगाभ्यासु. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा व समाधि हीं योगाची आठ अंगें.
परमहंसु -- योग्यांच्या कोटींतील श्रेष्ठ कोटीचा पुरुष. (५९२)
गोप्य गव्हर—न सांगण्यासारखें गूढ.
सकळै-— सकळही. 'ह' चा लोप होऊन सकळइ, 'सकळे' असें रूप झालें आहे. आपैसें हा शब्द पहा.
निःशब्दावार - शब्द रहित अनुभवाच्या आधारावर.
(५९३)
उजेडें— उघडपणानें, स्पष्टपणानें.
(५९४)
सोपानें— क्रमाक्रमाने, पायरी पायरीनें.
बोलिजैल -- बोलिलें जाईल. धातूस 'इजैल' हा प्रत्यय मराठीत कर्मणि रूप होत असे.
चांग - चांगलेपणानें.
लाऊन जुन्या
(५९५)
परियेसा - ऐका. हा धातु संस्कृत 'परीष्' पासून निघाला आहे. 'परीष्’' चें भाववाचक नाम पर्येषण होऊन परियेषणें, परियेसणें या क्रमानें हा मराठींत
उतरला.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #81
--------------------------------------------------------------------------
________________
निर्गुणभक्ति--चांगदेवाने येथून या भक्तीवें वर्गन केले आहे. स्थूलभक्ति व सूक्ष्न भक्ति या दोन प्रकारांचे वर्गन गहाळ झालेल्या ग्रंयभागांत असावें.
चांगा-या नावाने चांगदेव स्वतःचा उल्लेख करितो.
वातिवरी-बारा अंगुळावर. हा नाथ सांप्रदायांतील शब्द आहे. 'तो वातिवरी पवनु, गिवसिता न दिसे' असें ज्ञानेश्वरहि म्हणतात. दोन्ही नाकपुड्यांतून जो वारा वाहत असतो त्याची मर्यादा बारा अंगुलांची आहे. त्याच्या आंत.
गिवसितां--सांपडले असतां. संस्कृत 'गवेषणा' या पासून हा धातु झालासें वाटते.
(५९७) पापा पुण्यापूर्वी-पाप व पुण्य यांच्या कल्पनांचे आधी. प्रथम पदाच्या सामान्यरूपाकडे लक्ष दिले पाहिजे. चेववि-जागृत करी.
(५९८) धुणी-नाश करी.
(५९९) आहो--अहो. वाचकांचे किंवा श्रोत्यांचे लक्ष वेधण्यासाठी वापरलेलें संबोधन. इये परौति--इच्याहून पलीकडची म्हणजे श्रेष्ठ.
(६००) वटेश्वराप्रसादें--वटेश्वराच्या कृपेनें. 'र' चा काना लेखक प्रमादाने पडलेला दिसतो. वटेश्वरा बद्दलची माहिती उपोद्घातांत पहावी.
आइकतु-ऐकोत. आज्ञार्थों संस्कृत उकारांत धातुरूपावरून हे रूप प्रचारांत आले. पुढे शेवटचा 'उ' उपांत्य स्वराशी मिळून आइकोत-ऐकोत असें रूप झाले. आ+ईश् या संस्कृत धातूपासून ऐकणे हा धातु जन्मला आहे. अजूनही Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #82
--------------------------------------------------------------------------
________________
एकाद्याचें ध्यान आकर्षण करून त्यास ऐकावयास लावावयाचें असतां आपण 'हें पहा' म्हणतो.
जिया --जीमुळे. संस्कृत 'यया' पासून.
(६०२)
रूपरूपातित पदा-रूप व रूपातीत या नांवाची.
सानंद -- चांगदेव ओंवीच्या यमकाबद्दल बराच बेफिकीर दिसतो. येथेंच धा, दा, व द चें यमक आहे.
(६०३)
पाप्ति--प्राप्ति.
विलित्ति - - ' व्युत्पत्तिचें' अपभ्रष्ट रूप. प्रथक्-पृथक्, वेगळेपणें.
(६०४)
कुडंलिणि शक्ति - - कुंडलिनी नांवाची एक नाडी शरीरांत आहे. ही जागृत करणें योगाचें एक मुख्य कार्य आहे. ज्ञानेश्वरी अ. ६, ओव्या २२१ ते २९१ यांत कुंडलिनी, तिची जागृति व त्या पासून होणारा परिणाम फारच सुरस रीतीनें सांगितला आहे. या ग्रंथांतही पुढें थोडेंसें कुंडलिनी - वर्णन आहेच.
म्हगोतो -- म्हणिन या धातूचा प्रयोग या ग्रंथांत बरेच वेळा केला आहे. कर्तरि रूप म्हणिपणें व कर्मणि म्हणिजणें.
एर-- इतर. याचें येर असेंहि रूप आढळतें.
( ६०५ )
सांधिजैल -- सांगणें याचें रूप वरेच वेळां सांघणें असें घकार युक्त सांपडलें. नागरु -- चांगल्या रीतीचा. नगर पासून हा शब्द झाला आहे. नगरांत
शोभेसा.
अवधाने - अवधान, ध्यान. न वरील मात्रा पुढील दे मुळें लेखकप्रमादानें पडली असावी.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #83
--------------------------------------------------------------------------
________________
वोंकार--ॐकार. शब्दांच्या आरंभीच्या ओकारा बद्दल वोकार व एकाराबद्दल येकार नेहमी येतो.
(६०७) तस्य-संस्कृत रूप जसेच्या तसेंच आले आहे. मन व्योमा पासोनु--मनाच्या आकाशा पासून म्हणजे पोकळीतून.
(६०८) मन बुद्धिचा गव्हरी–मनाच्या व बुद्धीच्या गूढ ठिकाणी. 'च' याच्या मराठीतल्या दुहेरी उच्चारामुळे पुष्कळ ठिकाणी 'च' च्या जागी 'च्य' व 'च्य' च्या जागी 'च' लिहिला जातो. उदाहरणार्थ येथेच 'च्या' चे ऐवजी 'चा' लिहिला गेला व पुढच्याच चरणांत 'चारि' च्या जागी 'च्यारि' लिहिले गेले. या चारी प्रकाराच्या वाणींचे वर्णन समर्थांनीही दासबोधांत दशक १७वा, समास ८वा, ओंव्या १ ते ३ मध्ये केले आहे.
(६०९) मात्रवृता-मात्रावृता. निवळ इंद्रियाने युक्त. भगवद्गीतेतहि ‘मात्रा' शब्द याच अर्थों 'मात्रास्पर्शाः' या पदांत आला आहे.
परमात्मेया--परमात्म्याचा.
घोषु-घोष, ध्वनि, नाद, व शब्द या चार निरनिराळ्या एका पुढील एक पायऱ्या आहेत. अत्यंत सूक्ष्म तो घोष, नंतर ध्वनि, किंचित्स्थूल तो नाद व दुसऱ्याच्या श्रवणेंद्रियास गोचर तो शब्द.
(६१०) पश्यंति--पश्यंती. परेच्या पुढील वाणीचे स्वरूप. परा ही पूर्णपणे अव्यक्त, दुसऱ्याच्या नजरेस येणारी ती पश्यंती, ओंठ हालावयास लागले की मध्यमा व स्पष्ट ऐकू येऊ लागली की वैखरी, असे वाणीचे चार भेद केले आहेत. Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #84
--------------------------------------------------------------------------
________________
(६११) स्थूल बीज-स्पष्टपणे ध्यानात आणून देणारे अक्षर. बीज किंवा मातृका ही तांत्रिक विधींतील विशिष्ट अक्षरे आहेत. निरनिराळया देवतांसाठी ही निरनिराळी मानली गेली आहेत.
(६१२) हंस वाक्य---'हंसः' हे वाक्य. हे अहं सः ह्मणजे मी तो (च आहे) या वाक्याचें संक्षिप्त रूप. प्रत्येक श्वासा बरोबर वायु आंत ओढला ह्मणजे 'सः' या सारखा व वायु बाहेर पडला ह्मणजे 'हं' या सारखा नाद होतो या प्रत्येक श्वासोच्छावासा बरोबर तो मी, तो मी, ही भावना जागृत ठेवणारे तें हंस वाक्य.
(६१३) विंदनादभरितु--बिंदु ह्मगजे अनुस्वारासारख्या नादाने युक्त. बिजद्वय-बीजय.
शिउशक्ति--शिव शक्ति. 'हं' हे आत्म सूचक अक्षर शिवाचें व ‘सः' हे अन्यसृष्टिसूचक अक्षर शक्तीचे द्योतक मानले गेले आहे. 'शिव' यांतील 'व' च्या जागी 'उ' आलेला दिसतो. याच प्रमाणे 'जीव' याचेंहि लेखन 'जीउ' असें आढळतें.
(६१४) अजपा--जिचा जप करावा लागत नाहीं तो अजपा. 'ॐ हंसः' या अक्षरांच्या नादाची पुनरुक्ति ह्मणजे जप. तोंडाने जप न करितां प्रत्येक श्वासोच्छवासा बरोबर होतच असतो ह्मणून योगी लोक या मंत्रास 'अजपा गायत्री' असें ह्मणतात.
आतां--आंत च्या ऐवजी लेखकप्रमादाने आतां लिहिले गेलें.
पृथग्बीजें निरनिराळी बीजाक्षरें. आंत प्रवेश केला की सृष्टि व बाहेर पडलें की संहार. 'यदिदं किंच। तत्सृष्ट्वा । तदेवानुप्राविशत्।' या ब्रह्मोपनिषदांतहि हेच सांगितले आहे. ह्मणून मायेचे किंवा सृष्टीचे बीज सकार व ईश्वराचे आत्मप्रतीक बीज हकार अशी निरनिराळी बीजाक्षरे आहेत. Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat ___www.umaragyanbhandar.com
www
Page #85
--------------------------------------------------------------------------
________________
(६१६) अवरोहिं विरोहि-चढ उतारांत. श्वासाच्या आत बाहेर यण्यांत. मनव्योमि-चित्ताच्या चिदाकाशांत ही नादाक्षरें सततच वावरत असतात.
(६१७) छंदरुषिदेवत--प्रत्येक मंत्राचा छंद, ऋषि व देव ठाउक असल्या शिवाय मंत्र सिद्ध होत नाही हा मंत्रशास्त्राचा सिद्धांत आहे व हे सारें गुरुमुखानेंच कळलें पाहिजे हा दंडक आहे.
(६१९) उन्मे-उघडपणाने. मागे जसा उजे. शब्दाचा प्रयोग केला आहे तसाच येथें उन्मेष शब्द वापरला आहे.
बालबोचे-स्पष्टपणे व लहान मुलास समजेल अशा त-हेनें. मराठीसही हा शब्द लावितात ह्मणून मराठीत असाही अर्थ येथें करितां येईल. त्यावेळचे सारेच ग्रंथकार मराठीत लिहीत असतांना या गोष्टीचा उल्लेख करीत असत. पुढेहि ओंवी १०२३ त ही गोष्ट चांगदेवानें- हि स्पष्ट केली आहे.
(६२०) देहगोळकोत्पत्ति-देहाच्या गोळ्याची उपज. सर्व देहास ही नाडी मुख्य आधार मानिलो गेल्यामुळे देहनिर्मितीसच ही कारण मानिली गेली आहे. ६०४ ओंको मध्येहो कुंडलिनी ह्मणजेच पिंड असें ह्मटले आहे.
(६२१) भुजंगळणे-भुजंगपणे बद्दल चुकीने लिहिले असावें.
सूतले--निजलो असे. 'सूतना' या हिंदी धातूवरून 'सूतणे' या मराठी धातूचा प्रयोग केला आहे. पुढेहि ओंवी ६५८ मध्ये 'सूतली' ह्मणजे निजलेली या अर्थों या धातूचा प्रयोग सांपडतो. 'सूतले' हे रूप लेखकप्रमादाने झाले असावें व या लेखकप्रमादाचे कारण प्राचीन लिपीतील मात्र प्रमाणे लिहिली जात असणारी
वेलांटी असावी. Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #86
--------------------------------------------------------------------------
________________
आधारि--आधारचक्राचे ठिकाणी. योगशास्त्रांत आपल्या शरीराच्या ठिकाणी सहा चक्रं मानली आहेत. गुदद्वाराजवळील शिवणीच्या ठिकाणी (१) आधारचक्र, नाभिप्रदेशाजवळ (२) स्वाधिष्ठानचक्र, हृदयदेशाचे ठिकाणी (३) मणिपूरचक्र, नासामूली (४) अनाहतचक्र, कपाळाचे ठिकाणी (५) विशुद्ववक व शिरोभागों (६) आज्ञाचक अशों ही सहा चकें होत. चक्र मगजे शरीरांत खोलगट असलेली वाटोळी जागा. समाधि लावतांना वायु ऊर्ध्व करून ब्रह्मांडों नेऊ लागले झणजे या सहा चक्रांच्या ठिकाणी तो भरून राहत असतो अशी योगाची माहिती आहे.
(६२२) विद्यु-विद्युत्, वीज. मछक-भत्स्य, मासा. 'त्स' चा प्रायः 'छ' होतो. 'क' हा स्वार्थी प्रत्यय आहे. आधारि-आधारि.
(६२३) आघारिगी--आधारिणी, आधार असलेली किंवा आधारस्थानी राहणारी.
(६२४) कुळा अकुळा--कुल शब्द हा येथे शक्तिमार्ग संप्रदायांतील अर्थों वापरला आहे. शक्ति व तिचें सूजन या अर्थों कुल शब्द येथे वापरला आहे. या पासूनच कौल मगजे वाममार्गो शाक्त असा अर्थ होतो. या शक्तीचा ह्मणजे कुंडलिनीचा विचार शाक्त व अशाक्त दोघेहि करितात.
पक्षद्वय--जीव आणि शिव या दोन्ही पक्षास.
नाडिया-इडा, पिंगला व सुषुम्ना या तीन्ही नाडीस. योगशास्त्रांत या तीन नाड्या मुख्य मानिल्या आहेत.
(६२५) दशवायु-प्राण, अपान, व्यान, उदान व समान हे पांच व चलन, वलन, प्रसारण, निरोधन व आकुंचन करणारे किंवा नाग, कूर्म, कृकश, देवदत्त व धनंजय
www.umaragyanbhandar.com
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
Page #87
--------------------------------------------------------------------------
________________
१२
या पांच नांवांनी प्रसिद्ध असलेले पांच मिळन दहा. पहा दासबोध द. १६, स. ६, ओं. ३, ४.
गुणत्रया-सत्व, रज व तम या तीन गुणांस. पीठत्रया—पीठचया असा पाठ हवा.
शरीरसंख्या--सात. ही सातही पीठे पश्चिम मार्गाची ह्मणून ज्ञानदेवांनी आपल्या उत्तरगीतेत पुढील प्रमाणे सांगितली आहेत. त्रिकुंभ किंवा त्रिकूट, श्रीहट, गोल्हाट, औट, भ्रमर, चैतन्य व ब्रह्मरंध्र ही ती सात पीठे होत.
दशविध-गुणात्मक जीव, मन, बुद्धि, चित्त, अहंकार व पंचमहाभूतें मिळून दहा प्रकारचें.
(६३०) जन्मजाले---जन्मजले, जन्म दिले या अर्थी जन्मजणे या धातूचे रूप असावें. ओंवी ६३२ मध्ये 'प्रसउनु' असें झटले आहे.
(६३१) सर्वां शेषां--सर्व इतर गोष्टींत.
(६३३) क्षितिप्ररोहो--क्षिति प्ररोहें असा पाठ असावा. जमिनी पासून वाढल्याने.
(६३४) केति--किति किंवा केंवि. विकरलें-विकारले.
(६३५) ईशान--या व पुढील ६३६ या ओंवीत पंचतत्वांवर स्थापिलेली पांच ईश्वरस्वरूपं सांगितली आहेत. विभूति धारण मंत्रांत शिर, मुख, हृदय गुह्य व पाद या पांच ठिकाणी आकाश, वायु, तेज, आप व पृथ्वी या पांच भूतांचे भस्म करून Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com
Page #88
--------------------------------------------------------------------------
________________
१३
अंगीं चचिण्याची कल्पना आहे. या पांच मंत्रांतील प्रथम शब्द प्रत्येक भूताचा अधिपति मानला आहे. 'ईशानः सर्व विद्यानां' या मंत्रांतील ईशान, 'तत्पुरुषाय विद्महे' या मंत्रांतील तत्पुरुष, 'अघोरेभ्यो' यांतील अघोर, 'वामदेवाय नमो' पैकीं वामदेव व 'सद्योजातं प्रपद्यामि' यांतील सद्योजात, हीं तीं पांच ईश्वर स्वरूपें होत.
(६३६)
अनुक्रेमें—अनुक्रमें असा पाठ हवा. पुढील मात्रेमुळे 'क' वर मात्रा लिहिली
गेली.
(६३९)
दीपकळिका - - दिव्याची ज्योत. हा संकोच व विकास उपनिषद्ग्रंथांस प्रमाणभूत आहे. ब्रह्मवल्लींत हाच क्रम सांगितला आहे.
( ६४० )
यावेगळा -- याहून निराळा. रूपातीत म्हणजे सर्व प्रकारच्या रूपांत राहणारा पण त्याहून निराळा. 'स्थिरचर व्यापुनि अवघा जो जगदात्मा दशांगुलें उरला'तो.
(६४१)
संकळौनि - संकलन करून, एकत्र करून. द्विमात्रक औकारांत रूप ध्यानांत ठेवण्या सारखें आहे.
(६४३)
हठयोग — योगमार्गाचा एक प्रकार. या प्रकारांत देहास दंड देऊन चित्ताची चंचलता मोडावयाची असते.
राजयोग — योगमार्गाचा एक दुसरा प्रकार. हा सुलभ असल्यामुळे हठयोगाविरुद्ध याचें नांव राजयोग आहे. यांत आसनावर बसून एकाग्र चित्तानें समाधि साधावयाची असते.
(६४४)
वचती -- जातात. संस्कृत ' व्रज्' पासून 'वच' हा प्राचीन मराठींतील धातु
झाला असावा.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #89
--------------------------------------------------------------------------
________________
१४
(६४५)
स्थानमान -- देह किती दिवस टिकणारा आहे व केवढासा आहे, हें स्थानमान. मराठी तानमान शब्द याच पासून झाला आहे.
होआवें व्हावें.
(६४७)
सुचिल - सुविल. प्रसवील, जन्मदेईल. चव व या दोन्ही अक्षरांच्या तत्कालीन लेखन पद्धतिमुळे झालेला लेखक प्रमाद.
(६४९)
क्रेन द्वापर - कृत त्रेत द्वापर असें लिहितांना चुकून लिहिलें गेलें. हीं तीन युगे येथे सांगावयाची होतीं हैं पुढील ओळींतील कलियुग शब्दावरून स्पष्टच आहे.
(६५१)
वरि - वरच्यावर, सर्वां आधीं .
शून्यध्यानि - कशाचेंहि विशिष्ट ध्यान नसणें याचें नांव शून्यध्यान. म्हणजे शून्याचें ध्यान असा विधायक अर्थ न घेतां निषेधक अर्थच येथें घ्यावयाचा आहे. वांचौनि - जिवंत राहून.
(६५२)
चौरंगीनाथ- -नाथ परंपरेंतील एक पुरुष. याचे हातपाय तुटून पडला असतां या भग्नावयवस्थितींत मत्स्येंद्रनाथाच्या दर्शनाने यास हातपाय फुटले अशी कथा आहे. ज्ञानदेवानेंही ज्ञानेश्वरींत "तो मत्स्येंद्र सप्तशृंगीं । भग्नावयवा चौरंगी । भेटला की तो सर्वांगीं । परिपूर्ण झाला ॥ असा अ. १८, ओंवीं १७५४ मध्यें उल्लेख केला आहे.
"}
(६५४)
शून्य घराणी - शून्य घर्षणीं. हें कांहीं नाहीं, हें कांहीं नाहीं, नेति नेति असा सारखा विचार करून.
(६५५)
पवनाभ्यासु – वायु निरोधाचा अभ्यास, प्राणायामाचा अभ्यास.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #90
--------------------------------------------------------------------------
________________
बंधु-मूळबंध, जालंधरबंध व उडियानबंध हे तीन. यांच्या विषेश विवरणा साठी ज्ञानेश्वरोंतोल अ. ६ मधील १२ व १३ व्या श्लोकांवरील ओंव्या पहाव्यात.
भेद-मागें सांगितलेल्या चक्रांचा भेद.
मुद्रा--योगशास्त्रांत ध्यान करीत असतांना बोटांच्या विशिष्ट प्रकारच्या ठेवणी सांगितल्या आहेत त्या.
(६५६) वज्रासन-एकप्रकारची मांडी घालगे. ज्ञानेश्वरी अ. ६ ओंव्या १९२ ते १९९ मध्ये मूळबंध व वज्रासना ची माहिती देऊन 'अर्जुना हे जाण, मूळबंधाचें लक्षण, वज्रासन गौण, नाम यासी' असे सांगितले आहे.
निगतु-निघणारा.
भरितु कीजे-भरावा. अपान द्वाराने बाहेर पडणारा वायु उलटा करून शरीरांत भरावा.
(६५७) अघे-खालून.
ऊर्धे-ऊर्चेचें अपभ्रष्ट रूप. खालून अडविला व वरून दाबला म्हणजे मध्ये भरणारा वायु आकुंचन करावा लागतो व या प्रमाणे आकुंचित झाला की तो उसळू लागतो. अंकुचिजे-आकुंचिजे.
(६५८) सूतली प्रबोधे-प्रबोधे असे निरनुस्वार क्रियापद रूप वाचावें. निजलेली जागी होई.
(६६०) आविस-आमिष, भक्ष्य.
ग्रासिती-खाऊ लागली. तीन्ही चरणांतील क्रियांचा चालू लागली, पेलू लागली, व ग्रासू लागली असा अर्थ केला पाहिजे.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #91
--------------------------------------------------------------------------
________________
(६६१) मुंकली--मुकली. संस्कृत 'मुञ्च्' वरून अनुस्वार आला.
सत्रावि--सतरावी. चंद्राच्या कळा सोळा आहेत. यांहून निराळी हो सतरावी कला योगमार्गांतली एक संज्ञा आहे. योगशास्त्राची कल्पना आहे कों नासाम्ल व दृष्टीच्यावर एक अमृताने भरलेली नाडी आहे. कुंडलिनी जागृत होऊन तिने शरीरांतले सारे दोष जाळून टाकले व प्रबुद्ध होऊन ती ब्रह्मांडों जाऊं लागली ह्मणजे तिच्या धक्क्याने ही ऊर्ध्वमुख नाडी अधोमुख होते व तिच्यांतून अमृत स्रवू लागते. ज्ञानेश्वरांनी इलाच 'चंद्रामृताचे तळे' ह्मटले आहे.
श्रवलि---स्रवलि, स्रवू लागली.
ग्रंथित्रय--इडा, पिंगला व सुषुम्ना यांच्या गांठी.
नोबले-बोलत नाही. न बोले याचे रूप. जुन्या मराठीत निषेधार्थी धातु करावयाची ही तन्हा दिसते. 'न' हा निषेधार्थी शब्द घेऊन त्या पुढील धातूच्या आद्याक्षराचा स्वर 'न'स लावावयाचा व तें आद्याक्षर अकारांत ठेवावयाचे असा नियम दिसतो. न बोलणे, याचे नोबलणे, न देखणे, याचे नेदखणे, न घेणे चें नेघणे इत्यादि उदाहरणे ध्यानात ठेवण्यासारखी आहेत.
पाहिले—येथें तीनच अक्षराचा एक चरण आहे. ज्ञानेश्वरांनी ओंवीच्या प्रथम तीन चरणांत पांच अक्षरांहून कमी अक्षरें कधीच वापरली नाहीत, पण चांगदेवाने त्र्यक्षरी चरणही क्वचित् वापरला आहे.
(६६७) आनानी-अन्यान्यीं, निरनिराळ्या. अन्य – अन्न होऊन आनं झालें आहे.
(६६८) पांति-पंक्ति, ओळ.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #92
--------------------------------------------------------------------------
________________
(६७०) कें-कोठे, कोठलें. शृष्टि-सृष्टि.
उठी-उठणे, उत्थान. ईकारांत भाववाचक नामें जुन्या मराठीत पुष्कळच आढळतात. उजिरी, लिही, घडी (घडण) इत्यादि उदाहरणे दाखवितां येतील.
(६७१) कसण-आधार, कणा.
(६७३) पांगुळ-निराधार.
(६७६) सगर्भा-साऱ्याच्या साऱ्या, आतील भागा सहित.
(६७७) वेटेश्वरू–वटेश्वरु. तस्य-संस्कृत रूप जसेच्या तसेंच. ओं. ६०७ पहा. उन्मळीला-उन्मूलन केला, उपटून टाकिला, नाहींसा केला.
(६७८) उपसिले-उपदेसिलें. लेखकप्रमादानें मधील 'दे हे अक्षर लिहावयाचें राहिले.
(६८०) नेदिल न देईल. न देणे, 'नेदणें' चे रूप.
(६८२) नांतरी-ना तरी. ऐली थडीये-इकडील तीरावर. प्रयत्नु-प्रयत्लें.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #93
--------------------------------------------------------------------------
________________
पैलु पारु-पलीकडील तीर. ज्ञानदेवाच्या उत्तर गीतेंत हीच कल्पना जवळ जवळ याच शब्दांत सांगितली आहे. 'तंवचि पांगु कीजे नावेचा, जंववरि पार न पाविजे महा नदीचा, तो पावलिया नावेचा, अनादरु की.'
(६८५) कव्हणी येकी काळवषां पतित-कोणी एक आकस्मिक पडलेली. हे पुढील चरणांतील दोरीचें विशेषण. जालेयां-झाल्यास, झाल्यावर.
(६८७) विव्हावो-विवाह. 'ह'अंती असल्यामुळे ओकारांत रूप होऊन वर्णव्यत्यासाने झालेलें रूप. चेइलेयां-जागे झाल्यावर. चेतणे पासून चेइणे.
(६९०) आधार--आधारचक्र व त्याचे ज्ञान. येथे साही चक्रांची नांवें सागितली आहेत.
(६९१) अनहात श्रवण-अनाहत श्रवण. समाधि लागल्यावर कर्णपथावर जो एक प्रकारचा नाद ऐकू येत असतो तो ऐकणे. हा कशावरहि आघात न करितां होत असल्यामुळे यास अनाहत नाद असें ह्मणतात.
(६९२) अवस्थात्रय जागृति, स्वप्न व सुषुप्ति या तीन स्थिति.
धातुर्वाद-किमया. सोने करण्याची विद्या. विवर-निरनिराळी काढ. या चरणांत १६ अक्षरे आहेत.
झणें-नको. 'चन' या संस्कृत शब्दां पासून हा मराठी शब्द झाला असल्याने हा निषेधार्थी वापरलेला असतो.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #94
--------------------------------------------------------------------------
________________
(६९५) नीरोपद्रवस्थानी रहण-निरुपद्रवस्थानी राहणे.
(६९७) आरिख–संस्कृत 'आर्ष' पासून आर्ख, आरिख असे झाले आहे. जुनें व ह्मणूनच सोन्या सारखे असलेले सत्य.
(६९८) यता-इयत्तेने, मर्यादेने. कल्पना अशी आहे की सर्वांचा काळ मर्यादित आहे. माणसें मेल्यावर देव होतील, देवांचे आयुष्य संपल्यावर इंद्रादि देव ब्रह्मरूप होतील, ब्रह्मा आपल्या मर्यादेचे शेवटों विष्णुमूर्तीत लीन होईल.
(६९९) व्यरवस्ते--व्यवस्ते ऐवजी ही अक्षरे लिहिली गेली असावीत. 'व्य' नंतर 'स्ते' चा सकार भाग जो रकारा सारखा असतो तो काढला गेला. पण लगेच चूक लक्षात आल्याने व लिहिला पण मागील रकार खोडावयाचा राहिला. ओं ९ तील महिमाग्ने वरील टीप पहा. व्यवस्ते हा शब्द पुढेहि ७१५ व्या ओंवींत आला आहे. संस्कृत 'व्यवसित' यांतील धातूचे हे रूप आहे. लीन होई, शेवटी
होई.
(७००) सूरदेहस्थिति--सुरदेहस्थिति.
(७०१) अंतःष्करण-अंतःकरण. जुन्या जिव्हामूलीय उच्चारामुळे लेखकप्रमाद,
(७०२) होए होई, होय.
(७०४) कडवसा लेप, बंध.
(७०५) अविलिल–अशुद्ध. संस्कृत 'आविल' पासून झाला असावा.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #95
--------------------------------------------------------------------------
________________
२०
(७०६) थोकडिं-थोडीशी, लहानशी. संस्कृत 'स्तोक' पासून हा शब्द झाला व मग वर्णव्यत्यासाने थोडकी होऊन थोडी अशा रूपाने हाच शब्द आजच्या मराठीत वावरत आहे.
(७०९) उरैल-बाकी राहील. पंचतत्वें पंचतत्वांत मिसळल्यावर में शिल्लक उरेल.
(७११) शून्यगर्भु-ज्याच्या आंत कांहीं नाहीं असा.
(७१२) तुसे-तुज ऐसे, तुजसे.
(७१४) मन पवन-वान्यासारखें चंचल असणारें मन. तुकारामानेही हा शब्द 'जेथ पांगुळले मन पवन' येथे असाचा असाच वापरला आहे.
शूनी-शून्यी. उच्चारदोषामुळे लेखनदोष. 'न्य' चा उच्चार 'न' सारखा बहुधा ऐकू येतो. आथि-'अस्ति' चे रूप आहे. हे प्रश्नार्थक वाक्य समजले पाहिजे.
(७१६) फुडें-स्फुटपणानें, स्पष्टपणानें.
(७१७) राणीवीं-रहाणीवीं, अस्तित्वांत. रहाणे या पासून रहाणीव होऊन राणीव शब्द होतो.
(७२१) निराळंभ-निराधार, निरालंबन शृति-श्रुति.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #96
--------------------------------------------------------------------------
________________
अनामय- -कल्याण.
२१
(७२४)
(७२५)
युगांत शेष— युगांतही शिल्लक राहणारें.
(७२८)
विसवले – विसांवले. 'विश्राम' पासून विसांवा व त्या पासून झालेला विसांवणें हा धातु.
( ७३० )
भांगार - संस्कृत 'भृंगार' ह्मणजें सोनें या पासून हा शब्द झाला असावा. ज्ञानेश्वरकालीं हा शब्द फार प्रचारांत होता.
भाव भजति — निरनिराळीं रूपें घेतें.
तिं -ती.
(७३१)
तुंचिये — तुझ्यांत.
उपचार - सामग्री, सर्व गोष्टी. तुझ्या साऱ्या गोष्टी तुझ्यांतच सामावलेल्या आहेत.
(७३३)
मनांचां- -मनाच्या.
रिगौनियां - रिघून, प्रवेश करून.
(७३४)
सांडित्येनसि - सोडणान्यासह. या ओंवींत चांगदेवानें वस्तुवर्णन करितांना शब्द कसे पांगुळतात हें सुरस रीतिनें दाखविलें आहे. मनांत शिरून विचार केलास तर तूंच तूं आहेसा दिसशील असें सांगितलें खरें. पण मनांत शिर ह्मणता बरोबर शिरणारा व शिरण्याची क्रिया आणि शिरण्याचें टिकाण या तीन गोष्टी भिन्न वाटतात. ह्मणून पुढें सांगितलें कीं रिघालेंपण ह्मणजे आंत शिरण्याच्या
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #97
--------------------------------------------------------------------------
________________
क्रियेस खरें समजू नको. तें रिघणे ह्मणजे रिघणे नव्हे. पण हा निषेधभाव कांहीं तरी अस्तित्व सुचवितो ह्मणून तो सोडावयास सांगावें तो पुन्हां सोडणारा, सोडण्याची क्रिया व सोडावयाची वस्तु ही त्रिपुटी कायमच रहाणार. ह्मणून तो निषेध सोडणाऱ्यासह सोडावयास सांगितला. सारांश पुढील ओंवींत सांगितल्या प्रमाणे या वर्णनांत शब्दच खुंटतात ह्मणजे कुंठित होतात.
(७३७) सामावणी-ईकारांत भाववाचक नाम. लीनता, लय.
__ (७३८) आणपांचि आपणपांचि. 'प' लिहितांना चुकून राहिला.
(७४०) तुजावांचौ निरंतरि-तुझ्या वांचोनि निरंतरी.
(७४६) वोळगिजे-नमस्कार करावा. मूळ संस्कृतधातु 'अवलग.' अव चा झाला वो व ल चा झाला ळ. तुकारामही ह्मणतो 'ब्रह्मादिक जेथें तुह्मां वोळगणे, इतर तुळणे काय पुरे.'
न्हवण-स्नपन पासून झालेले रूप. स्नान घालणे.
आपणेयां-आपल्यास. तुकारामा पुढे ‘मने प्रतिमा स्थापिली, मनें मना पूजा केली, मनें इच्छा पुरविली, मन माउली सकळांची॥ मन गुरु आणि शिष्य, करी आपुलेंचि दास्य, प्रसन्न आप आपणांस, गति अथवा अधोगति.॥' हे लिहितांना या ओंव्या असाव्यातसे वाटतें.
(७४७) वाइजे–वाहिजे.
(७४८) मुंगियेच्या ठाउनु ब्रह्मावरि-मुंगीच्या सूक्ष्म ठिकाणा पासून ब्रह्मा पावेतो.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #98
--------------------------------------------------------------------------
________________
(७५०) परौतें-पलीकडील, श्रेष्ठ, उंच. खालौतें खालील, नीच.
(७५१) निघोटु-निर्भेळ.
तत्वसार–'तत्व' याचें सार. 'तत्वमसि' या महावाक्यांतील ग्राह्य अर्थ. याच अर्थाने हा 'तत्वसार' ग्रंथ असावा असे वाटते. चांगदेवांस ज्ञानदेवांनी जें पांसष्ट ओव्यांचे पत्र लिहिले व जे चांगदेव पासष्टी या नांवाने प्रसिद्ध आहे, त्यांत 'तत्वमसि' या महावाक्याचाच बोध लिहिला आहे. तेव्हां हा बोध झाल्यानंतर या 'तत्वमसि' महावाक्याचे सार चांगदेवाच्या ग्रंथांत येणे साहजिक आहे. पै-पाही. याचें 'पाई' असे होऊन त्याचेच रूपांतर 'पै' असे झाले आहे.
(७५४) मनाहि-मन नाहि. एक नकार लेखकदोषामुळे राहिला. ही ओंवी वाचली की केनोपनिषदांतील 'यदि मन्यसे सुवेदेति' ह्मणजे 'समजलें वाटणारांस समजले नसते' या मंत्राची आठवण येते.
(७५५) या ओंवीचा स्पष्ट अर्थ समजला नाही.
(७५८) माहाशून्य-महाशून्य. मन विचार करतां करतां हारले आणि माझ्या. शिवाय काही नाही हे समजले झणजे शून्य ज्ञान झाले. पण हा बाकी उरलेला मीपणाही नाहींसा झाला ह्मणजे जे काय उरलें तें महाशून्य. 'मी ब्रह्म आहे हे समजून माझ्या मी पणाचा लोप झाला ह्मणजेच खरे ज्ञान आले.
(७६२) सिंपे–'लिंपे' असा पाठ हवा.
वासिपे–'वाश्' ओरडणे या पासून वास, वासिप हा धातु झाला. याचा अर्थ ओरडणे, मोठ्याने सांगणे. Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #99
--------------------------------------------------------------------------
________________
२४
(७६४)
भांगारें - सुवर्णालंकार. या चरणांत १७ अक्षरें आहेत.
पाए न व्हाती-- आधार होत नाहींत. पाया ह्मणजे आधार व व्हातो ह्मणजे होती.
सूतला - निजला. ओं. आपुलांचि - स्वतःच.
(७७०)
६५८ पहा.
(७७३)
अनुचित्तें - अनुचितें. खरें पाहिलें असतां बहुवचन 'कर्मों' असें पाहिजे. पण येथें विशेषणाचें बहुवचन व विशेष्यांचें एकवचन लेखणीच्या घसरण्यानें झालें असावें.
न बंधिजसि - बद्ध होणार नाहींस, बांधिला जाणार नाहींस.
(७७५)
ध्वनित — मनांतील गोष्ट.
(७७७)
शिष्यचि - 'शिष्याचें' असा पाठ हवा.
(७७९)
घरोपरि - हा शब्द बहुधा 'परोपरी' असावा. परोपरी ह्मणजे प्रकार. 'प' च्या ऐवजीं चुकून 'घ' झाला असावा.
(७८२)
पाहालें —— पाहिलें. जिहीं हा कर्ता अध्याहृत आहे.
आंधारें - दृष्टीचा संशय स्पष्ट न दिसणें. आज हाच शब्द 'आंधारी' या रूपांत वावरत आहे.
(७८३)
तोकरूपां — लहान मुलाच्या रूपानें वावरणाऱ्या जीवात्म्यास.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #100
--------------------------------------------------------------------------
________________
२५
दोत्रसृष्टी - 'दोषसृष्टि' हें शुद्ध रूप. लोकांस दोष ह्मणून दिसणाऱ्या गोष्टी. परि-हें येथें उपमावाचक अव्यय आहे. याचा संबंध मागील चरणांतील दोषसृष्टीशी आहे. ज्या प्रमाणें लहान मुलाच्या रूपानें वावरणाऱ्या जीवात्म्यास लोकांस वाईट दिसणाऱ्या गोष्टी बाघत नाहींत ; ह्मणजे त्याचे हातून अशा गोष्टी झाल्या तरी त्यास दोष लागत नाहीं, त्याच प्रमाणें ज्ञान दृष्टि प्राप्त झालेल्या माणसासही उचितानुचित कर्माचें बंधन राहत नाहीं.
(७८५)
तो त्या पापपुण्यसन्मंव- - " तो पापपुण्यसंबंध त्याला' असा अन्वय करून पुढील 'कदाचि नाहीं' शीं जोडावयाचा.
(७८६)
सुनिटलें - 'निसुटलें' असा पाठ हवा. लेखकाच्या चुकीमुळें हा वर्णव्यत्यास झाला असावा. निसुटलें ह्मणजे निघून गेलें.
(७९१)
मनमुऋतु - मनाच्या तडाक्यांतून मुक्त झालेला. अमुक करावें व अमुक करूं नये अशी ज्याच्या मनांत प्रवृत्ति राहिली नाहीं तो.
(७९३)
कृताकृत्य --- ' कृतकृत्य' असा पाठ हवा.
(७९७)
जालां -- झालों. हें उत्तमपुरुष वाचक एकवचनीं रूप ध्यानांत ठेवण्या सारखें आहे. या ग्रंथांत बरेच ठिकाणीं अशा प्रकारचें रूप आलें आहे.
(600)
केलां—केलों. येथें पुढें 'मि' हें उत्तमपुरुषीं सर्वनाम असल्यानें या रूपाबद्दल संशयच नाहीं.
सांघिजो — सांगावें. जुन्या मराठींत द्वितीय पुरुषीं बहुवचनीं असें रूप नेहमी येतें. ज्ञानेश्वरीच्या आरंभींच 'म्हणे निवृत्ति दास, अवघारिजो जी' असें आहे.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #101
--------------------------------------------------------------------------
________________
(८०५) आंगावरि-निवळ स्वतःच्या जवाबदारीवर, कोणास जामीन न ठेवतां.
(८०६) अप्रचेया-अप्रचेतया असा पाठ पाहिजे. प्रचेता ह्मणजे ज्ञानी व अप्रचेता ह्मणजे अज्ञानी.
(८०९) गुर्विणी-गर्भिणी.
(८१२) कीर-निश्चित. 'संस्कृत 'किल' पासून हा शब्द 'ल' चा 'र' होऊन झाला असावा.
(८१३) गुरुनु-गुरूनें. तृतीयेच्या एकवचनाचे रूप.
(८१८) कर्मफळथार-कर्मफळास थारा. थारा ह्मणजे राहण्यास जागा.
(८१९) मना-'मन' असा पाठ हवा. मन अनुभवा पलीकडे आहे. आणि अंत:करणांत ज्ञानप्रकाश असेल तर कर्माचे फळ राहण्यासच असमर्थ होईल. कर्मफळेच्छाच नसल्यास कर्मफळ कसे यावयाचें. कर्मगर्भु-कर्माचें बीज.
(८२०) रुसणेनसि-रुसणाऱ्यासह. मागें ओंवी ७३४ पहा.
(८२२) येकु येकु-एकदांच येक पाहिजे. लेखक प्रमादामुळे द्विरुक्ति.
अन्यासि–'अनायासिं' असा पाठ पाहिजे. कांहीं श्रम न करिता. पुढे ओंवी ८२५ मध्ये स्पष्टच 'अनायासें' असें पद आले आहे.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #102
--------------------------------------------------------------------------
________________
(८२४) पशुपाश-हा शब्द अत्यंत अप्रयुक्त पण फार महत्वाचा आहे. ज्या दोरीने पशु वधस्तंभास बांधला जातो तो पशुपाश. पण कृष्णमिश्राच्या प्रबोधचंद्रोदय नांवांच्या नाटकांत हा शब्द एका विशिष्ट अर्थी वापरला आहे. जीवात्म्यास जखडून टाकणाऱ्या बंधनांस हा शब्द कृष्णमिश्राने वापरला आहे. या अर्थी हा शब्द फक्त याच नाटकांत आला आहे. कृष्णमिश्राचा काल ई. स. च्या अकराव्या शतकाच्या शेवटी शेवटी आहे. या नाटकांत प्रथमच वेदान्त व वैष्णव भक्तीची सुंदर सांगड घातली आहे. चांगदेवाने हा ग्रंथ वाचला असावा असे दिसते. पुढचा 'च' शब्द 'प्रबोधता' ही हेच सुचवितो.
(८२६) अवलिला-लीलेनें, सहज. अवलीला हे शुद्ध रूप.
(८३०) परब्रह्मेआ—परब्रह्माचें योगानें. तृतीयेचें एकवचन.
(८३२) जि-जी, सन्मानार्थी संबोधन. हे संस्कृत 'अयि' चे रूप. य चा झाला ज व अ चा झाला लोप. अजी, जी, दोन्ही रूपें प्रचारांत आहेत व दोन्हींचा मिळून झालेला 'अजीजी' शब्दही मोठ्या माणसाचा कल पाहून बोलणे या अर्थी रूढ आहे. गुरुनिवारिला-'गुरुनि वारिला' असा पदच्छेद करावा. गुरूने निवारण केलें.
(८३४) त्रुप्ति-शुद्ध रूप तृप्ति.
(८३५) आर्हता-योग्यता. अर्हत् या शब्दापासून झालेले भाववाचक नाम. पुढच्याच ओंवीत हेच रूप निरनुस्वार आले आहे.
(८३७) संघावें-सांघावें बद्दल लेखक प्रमादाने लिहिले गेलेलें रूप. अधिकारहीन माणसास ज्ञान न सांगण्याचा योग्य प्रघात भारतवर्षांत फार प्राचीन काळाShree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #103
--------------------------------------------------------------------------
________________
पासून चालत आला आहे. 'इदमशिष्याय न देयं ही सूचना उपनिषदांत वेळोवेळी दिलेली आहे. मनूनेंहि असेंच सांगितले आहे की.
विद्या ब्राह्मणमेत्याह शेवधिस्तेऽस्मि रक्ष माम् ।
असूयकाय मां मा दा यतः स्यां वीर्यवत्तमा । हव्या त्या माणसास हवें तें ज्ञान दिल्याने अर्था ऐवजी अनर्थच होतो. हा अनर्थ ह्मणजेच सृष्टिघात पुढील चरणांत सांगितला आहे. पुढील ओंव्यांतून हाच अर्थ अधिक स्पष्ट केला आहे.
(८४२) _ विषयसुषे-विषय सुखें. ख बद्दल ष जुन्या ग्रंथांतून पुष्कळ ठिकाणी सांपडतो. याचे कारण ह्मणजे नर्मदेच्या उत्तरेस ष चा ख च उच्चार करितात. ष चा ख, य चा ज व ज्ञ चा ग्य असा उच्चार शुक्ल यजुःशाखीय वैदिकलोकांतही प्रचलित आहे.
चोचावले-हा शब्द चोंच या नामा पासून झाला आहे. पक्षी मुळांस चोंच मारून जशी भोके पाडतात तसे करणे ह्मणजे चोचावणे. मोरांबा, मोरावळा करितांना आंब्यांच्या फोडीस किंवा आंवळयांसही चोंचावीत असतात. याच प्रमाणे भिन्न भिन्न संशयांनी चोचावलेले झणजे विद्ध झालेले. अशा प्रकारचे व्यंजक शब्द मराठीत किती तरी आहेत.
(८४३) विचंबलें--'विटंबले' असे असावेसे वाटते.
(८४६) इछेच्या पावती, योगातें ते-ते इच्छेच्या योगातें पावती, असा अन्वय. जो योग पूर्वी इच्छित होते तो त्यांस मिळू लागतो.
(८४८) देवत्रयचिन्हें हा शब्द असाच घेतला तर त्याचा अर्थ तीन्ही देवांची ह्मणजे ब्रह्मा, विष्णु, महेश यांची लक्षणे असा अर्थ होईल. पण हा अर्थ समाधानकारक Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #104
--------------------------------------------------------------------------
________________
२९
वाटत नाहीं. कदाचित् 'देवत्वचिन्हें' असा पाठ असेल व तसा असल्यास यश, श्री, कीर्ति इत्यादि लक्षणें असा चांगला अर्थ होऊं शकेल.
( ८४९)
घेपिजे -- घेणें ह्मणजे आपल्या ताब्यांत घेतलें जाणें घेणें या धातू पासून घेपणें हा शब्द झाला आहे.
(८५०)
विधि - हा शब्द चुकीनें पडलेला दिसतो. पुढील ओंवी वरून हा शब्द विघ्न असावा असें वाटते. आज जरी मराठींत विघ्न शब्द नपुंसकलिंगी आहे तरी स्वप्न शब्दा प्रमाणें पूर्वी तो पुंल्लिंगी व नपुंसकलिंगीं असा दोन्ही लिंगीं असणें शक्य आहे. किंवा चांगदेवाच्या यमक = निरंकुशत्वास अनुसरून 'तया तत्वज्ञा विघ्नें काइसी' असाही पाठ संभवनीय आहे.
(८५१)
त्येते.
(८५२)
चाडा —— चाडेनें, इच्छेनें.
घाडा पडला-घाला पडला. घाला या अर्थी धाडा हा शब्द अजूनही रूढ आहे.
(८५३)
देवाच्या आगि --- देवांच्या आंगीं. देवांच्या देहास आग लागते ह्मणजे ते क्रोधाग्नीनें जळू लागतात.
(८५४)
उजिर - किरण, झांक, प्रभा. संस्कृत 'उज्ज्वल्' या धातू पासून हा शब्द झाला आहे. हें इकारांत भाववाचक नाम.
कुदळिघात वरि आरोढिलें —-वर कुऱ्हाडीचे घाव घालणें सुरूं केलें. (८५५) केसणें - कशानें कैसेनि पासून हें रूप.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #105
--------------------------------------------------------------------------
________________
३०
(८५६)
खापर सादृश्य——खापरासारिखें. फेडी- 'फोडी' असा पाठ हवा.
(८५७)
लोष्टकपालि -अर्थ लागत नाहीं. ही सारीच ओंवी स्पष्ट कळत नाहीं. इदृ-- 'इंद्र' असा पाठ असावासें वाटतें.
(८६०)
श्रीगुरुचेया- श्रीगुरुच्या.
(८६४)
मूखिचा—मुखींचा.
उगाळू—घांस. संस्कृत 'उद्गार' पासून झालेला शब्द.
(८६९)
आचार्य -- शेवटल्या य मुळें हें एकारांत रूप झालें. शेवटीं व असता तर ओकारांत रूप होतें जसें राव चें रावो. पण रायचें होतें राये.
(८७०)
श्रीमुक्तादेवी योगिनी -- या परंपरेंत निवृत्ति व ज्ञानदेव यांचीं नांवें नसून गोरक्षनाथा नंतर मुक्ताबाईचाच योगिनी ह्मणून उल्लेख केला आहे. शिवकल्याण स्वामींनीं आपल्या नित्यानंद दीपिकेच्या शेवटींही अशीच परंपरा दिली आहे. गोरक्षनाथा पासून एक प्रवाह गैनीनाथ, निवृत्ति व ज्ञानदेव या मार्गे आला व दुसरा मुक्ताबाई, वटेश्वर, चांगदेव या मार्गानें आला.
चक्रपाणि - हा वटेश्वराचा शिष्य ह्मणून चांगदेवाचा समकालीन 'वटेश्वराहुनि चक्रपाणि, लाघले हे अमृतसंजीवनी' असें शिवकल्याणस्वामी ह्मणतात. ( ८७१-८८१)
या ओव्यांत या सिद्धयोगमार्गांतील सिद्ध पुरुषांची व स्त्रियांचीं नांवें दिलेलीं आहेत. या पैकीं कांहीं नांवें हठयोगप्रदीपिकेंतही सांपडतात. ( उपोद्घात पहा ) या नांवावरून त्याकाळी हा मार्ग किती व कसा पसरला होता याची कल्पना
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #106
--------------------------------------------------------------------------
________________
चांगली येते. यांत अनेक जातीच्या स्त्रीपुरुषांची नांवें आली आहेत. ८८१व्या ओंवी नंतर ९१२ पावेतोंच्या ओंव्या असलेली दोन पत्रे किंवा ४ पृष्ठे गहाळली आहेत.
(९१४) दशी-'देशी' असा पाठ पाहिजे.
(९१७) गुरुसेवो-गुरुसेवे असे असावेसे वाटते.
शिवोऽस्मि-'अहं ब्रह्मास्मि' या वाक्याबद्दल 'शिवोहमस्मि' अशा वाक्याचा उपयोग आचार्यांनी सुरू केला. मी शिव आहे हा बोध.
(९१९) आपणप्येनि-आपलेपणाने. 'गुरुसेवाबळे, जें अटक ऐसे आपणप्येनि फळले' हा अन्वय. अटक-अप्राप्य, न मिळण्या सारखें ; तेंही गुरुसेवेच्या सामर्थ्यामुळे आपण होऊनच प्राप्त झाले, हा भावार्थ.
(९२२) तियें-ती आसने व भुवनें.
(९२३) वाइजती-वाहाव्यात. खरा शब्दार्थ-वाहिल्या जाव्यात.
(९२४) निरययोनिमाझारि-निरययोनि मध्यंतरी झणजे नरकयोनीत. मध्यांतरी चें मज्झात्री असें रूप होऊन माझारिं असें रूप झाले आहे.
(९२६) अघोरि-भयंकर अशा. या पदावरून मागील दोन चरण ‘गुरुवचन मनि न धरी'; 'गुरुसिं अहंकार करी' असे एक वचनी असावेतसे वाटते.
(९२७) विसुरे–विसरे. विस्मरणे पासून विसुरणे व मग विसरणे.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #107
--------------------------------------------------------------------------
________________
३२
(९२८) विविधु-विधिरहित. ज्ञानी पुरुष विधिनिषेधरहित असतो हा संबंध. समंधु-संबंध.
(९२९) रोगिया-रोगी, रोगयुक्त.
(९३२) खाए हा खाणे या धातूचा प्रयोग सेवन करणे या अर्थी आहे. निंदा, पैशून्य खाणे ह्मणजे निंदा व चहाडी ऐकणे. अजूनहि शिव्या खाणे या प्रयोगांत खाणे या धातूचा उपयोग आहे. वस्तु करुनु ब्रह्म असूनहि, ब्रह्मप्राप्ति करूनहि.
(९३३) पुश्चळीकें-पुंश्चली ह्मणजे शिनळ, जारिणी स्त्री. तिच्या त-हेनें झणजे एक सोडून दुसऱ्याचे सेवन करण्याच्या पद्धतीनें. चांगदेवाच्या अभंगांतही हा शब्द सांपडतो. 'पतिव्रते पुंश्चली सांगात झाला, दोहीतें भेटला एक देखा'. चां. अ. सं. १९.
(९३४) येकुरु--येकुगुरु या ऐवजी लेखकप्रमादानें 'गु' गळून राहिलेले रूप.
(९३५) सांडोवे-त्याग. सांडणे या धातू पासून झालेले नाम.
चिखिमिखि-चोखांदळपणा. ओरडा आरड. 'चीखना' या हिन्दी धातूपासून हे रूप झाले असावें सें वाटतें. उपाओ-उपाय. य चा झाला व व मग झालें हे रूप.
(९४४) त्रिशुद्धी--पूर्णपणानें, शुद्ध मनाने. या शब्दाची व्युत्पत्ति दोन प्रकाराने
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #108
--------------------------------------------------------------------------
________________
३३ .
होऊ शकेल. वैदिक भाषेतही तीन प्रकारचे म्हणजे मानसिक, वाचिक, व कायिक असे तीन प्रकारचे सत्य सांगितले आहे. त्यासच अनुसरून मनाने, वाणीने व कृतीने शुद्ध राहून असा अर्थ करता येईल किंवा कोणचीहि गोष्ट त्रिवार सांगितली म्हणजे पक्की झाली असा प्राचीन प्रघात असल्यामुळे त्रिशद्वी या रूपाचें त्रिशुद्धी असें रूप झाले असावें.
देवंगत-'दिवंगत' असा पाठ असावा व प्राचीन लेखन पद्धतिमुळे तो 'देवंगत' असा लेखकाने वाचला असावा. दिपांतरा-द्वीपांतरा असें पाहिजे. दुसऱ्या ठिकाणी.
__ (९४८) कराडिसी-कठिण जागेत.
(९५०) सदेउ-सदैव, देवकान. मागील ओंवीतल्याच 'निर्देव मनि शुद्ध नव्हती याशी विरोध दाखविण्यासाठी वापरलेला शब्द. पुढेहि ओंवी ९५३ मध्ये सदैव शब्द आलाच आहे. ____ कोलि-कोळी. एकलव्य नांवाचा निषाद. द्रोणाचार्याने व्याघपुत्र म्हणून यास विद्या शिकविण्याचें नाकारल्यावर याने द्रोणाचार्यांची मृण्मयमूर्ति करून तिच्या जवळ विद्या शिकल्याची कथा महाभारतांत प्रसिद्ध आहे. गुरु मातीचा असतांनाहि शिष्य आपल्या भक्तीमुळेच आपला उद्धार करू शकतो हे दाखविण्या: साठी हे ठरीव उदाहरण आहे. मातियेचा द्रोणु-मातीची द्रोणाचार्यांची मूर्ती..
(९५१) निधान-निधन, मृत्यु. लेखकाकडून कामा चुहीने 'बस्त लिहिला गेला.
(९५२) तत्पुरुषु-'सत्पुरुषु' असा ठ हवा.'
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #109
--------------------------------------------------------------------------
________________
३४
जुगां - - जगां किंवा युगां. जे जाणाऱ्या जगांस स्थिर करितात किंवा जाणा-या युगांस स्थिर करितात. दुसरा अर्थ अधिक चांगला वाटतो. हिंदींत युगास 'जुग' ह्मणतात 'जुगजुग जीओ' ह्मणजे युगेंची युगें जिवंत रहा. हा आशीर्वाद हिंदीत प्रसिद्ध आहे. सत्पुरुष जाणान्या कालासही स्थिर करतात हा अभिप्राय.
+
(९५५)
अप्रमादु— प्रमादु असा पाठ हवा.
तेयाचें ज्यालें वाढे—त्याचे ठिकाणी उत्पन्न झालेल्या गोष्टी वृद्धिंगत होतात. जिवे तें पुढें तया ठाके - - वृद्धिंगत झालेले वा उत्पन्न झालेलें त्या पुढें येऊन उभे राहतें. ज्यालें व जिवे हीं दोन्ही रूपें जिणें ह्मणजे उत्पन्न होणें वा जिवंत राहणें या धातू पासून झाली आहेत.
(९५६)
अवज्ञानेदखिजे --अवज्ञानें न देखिजे किंवा अवज्ञा नेदखिजे असा पदच्छेद करावा. पहिल्या अर्थात 'न' राहिला असें समजावे व दुसऱ्या अर्थात अवज्ञा हें तृतीयेचें रूप व नेदखिजे हें न देखणें पासून झालेल्या नेदखणें क्रियापदाचें रूप.
(९५८)
अर्धकूपी -- विहिरींत अर्धा व अर्धा बाहेर असा लोंबकळत.
( ९६०)
ब्रह्माकोटिमध्यस्तु — 'ब्रह्माण्डकोटिमध्यस्थु' असा पाठ हवा.
(९६१)
आगि - आगि, अंगास.
(९६५)
उपसारा--'उपचारा' असा पाठ पाहिजे.
( ९६६-९९२)
या ओव्यांचें पत्र गहाळ झालें आहे.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #110
--------------------------------------------------------------------------
________________
(९९६) अळुमाळ-एवढेसें, 'अडुमाडु' या कानडी रूपापासून ड चा ळ होऊन हे रूप झालें.
शिउ-शिव. चतुष्टय-मन, बुद्धि, चित्त व अहंकार या चार गोष्टी. पहा ओवं. ६२९.
(१०००) शषासि–'शेषासि', असा पाठ हवा.
(१००३) लिहि--इकारांत नाम. लिहिणे हा अर्थ.
(१००५) बोहरी-निरास. अवहरणे याचे जागी वोहरणे रूप होऊन त्याचे इकारांत नाम वोहरी. व व ब च्या अभेदानें बोहरी असें रूप होते.
निदसुरी-पूर्णपणानें. न दुसरी याचेच बोलींत झालेले रूप. दुसरें कांहीं न राहतां या अर्थी हा शब्द वापरला जातो.
(१००९) जालेपणे--स्वयं ब्रह्म झाल्याच्या योगानें. जाहलेपणे बद्दल जालेपणे असा शब्द वापरला जातो.
(१०१३) चंद्रबिंबि-चंद्राचे मंडल उगवलें असतां.
(१०१४) मीनला–मिळाला, एकरूप झाला.
(१०१७) येकवाटले–एकवटलें, एकवट ह्मणजे एकरूप. हा वट प्रत्यय घन, तिक्त, क्षार इत्यादि शब्दांत लागूनच घणवट, तिखट, खारट इत्यादि शब्द झाले आहेत. वट प्रत्ययही संस्कृत 'वत्' चाच अपभ्रंश आहे. कटवत्-कडुवट-कडवट-कटुस्वरूप.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #111
--------------------------------------------------------------------------
________________
(१०१९) रूप करूं-वर्णन करतां. निरूपण या अर्थीच रूप.
(१०२२) ते कष्टि समाप्ति पावविली त्यांनी कष्टांच्या ठिकाणी शेवट पोंचविला असा प्रतिशब्दार्थ. त्यांनी 'पुनरपिजननं, पुनरपि मरणं' या त्रासाचा शेवट केला, या आपत्तींतून मुक्त झाले असा भावार्थ.
(१०२७) पृथज्ञ--'पृथक्' असा पाठ हवा.
(१०२८) चौतिसें बारा-'अंकानां वामतो गति.' या न्यायाने १२३४ हा. शक. एकोत्रींत अजूनही हीच पद्धति सांपडते. छत्तीस छत्तीस शहाण्णवबारा ह्मणजे ३६४३६ = १२९६.
(१०२९) हरिश्चंद्र हा पर्वत, त्याच प्रमाणे मंगळगंगा नांवाची नदी, सप्तस्थान, दक्षिणकेदार इत्यादि गोष्टींवरून या ग्रंथाचे लेखन स्थान निश्चित करता येण्यासारखे आहे. पण अजून पावेतों या स्थानांच्या आधारे हे ठिकाण निश्चित झालेले नाही.
(१०३४) दिनप्रति-प्रतिदिन या ऐवजी दिनप्रति.
(१०३६) दसाडशत-'दसाउडशत' असा पाठ असावासे वाटते. आउड ह्मणजे औट किंवा साडेतीनः आउडशत ह्मणजे एकसें साडेतीन व त्याची दसपट ह्मणजे १०३५., या प्रमाणे रचलेल्पा ज्या ओंव्या त्या.१०३५ रत्नांची माल ठेवकरागुरु, च्या चस्णकमळी वाहिली; असें रूपक..
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com
Page #112
--------------------------------------------------------------------------
________________ થશાહ alchbllo Bળ 3 Tento Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com