SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 82
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ एकाद्याचें ध्यान आकर्षण करून त्यास ऐकावयास लावावयाचें असतां आपण 'हें पहा' म्हणतो. जिया --जीमुळे. संस्कृत 'यया' पासून. (६०२) रूपरूपातित पदा-रूप व रूपातीत या नांवाची. सानंद -- चांगदेव ओंवीच्या यमकाबद्दल बराच बेफिकीर दिसतो. येथेंच धा, दा, व द चें यमक आहे. (६०३) पाप्ति--प्राप्ति. विलित्ति - - ' व्युत्पत्तिचें' अपभ्रष्ट रूप. प्रथक्-पृथक्, वेगळेपणें. (६०४) कुडंलिणि शक्ति - - कुंडलिनी नांवाची एक नाडी शरीरांत आहे. ही जागृत करणें योगाचें एक मुख्य कार्य आहे. ज्ञानेश्वरी अ. ६, ओव्या २२१ ते २९१ यांत कुंडलिनी, तिची जागृति व त्या पासून होणारा परिणाम फारच सुरस रीतीनें सांगितला आहे. या ग्रंथांतही पुढें थोडेंसें कुंडलिनी - वर्णन आहेच. म्हगोतो -- म्हणिन या धातूचा प्रयोग या ग्रंथांत बरेच वेळा केला आहे. कर्तरि रूप म्हणिपणें व कर्मणि म्हणिजणें. एर-- इतर. याचें येर असेंहि रूप आढळतें. ( ६०५ ) सांधिजैल -- सांगणें याचें रूप वरेच वेळां सांघणें असें घकार युक्त सांपडलें. नागरु -- चांगल्या रीतीचा. नगर पासून हा शब्द झाला आहे. नगरांत शोभेसा. अवधाने - अवधान, ध्यान. न वरील मात्रा पुढील दे मुळें लेखकप्रमादानें पडली असावी. Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com
SR No.035284
Book TitleMarathi - Tattvasara
Original Sutra AuthorN/A
AuthorChangdev Vateshwar
PublisherPrachya Granth Sangrahalay
Publication Year1936
Total Pages112
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Other
File Size7 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy