SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 100
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ २५ दोत्रसृष्टी - 'दोषसृष्टि' हें शुद्ध रूप. लोकांस दोष ह्मणून दिसणाऱ्या गोष्टी. परि-हें येथें उपमावाचक अव्यय आहे. याचा संबंध मागील चरणांतील दोषसृष्टीशी आहे. ज्या प्रमाणें लहान मुलाच्या रूपानें वावरणाऱ्या जीवात्म्यास लोकांस वाईट दिसणाऱ्या गोष्टी बाघत नाहींत ; ह्मणजे त्याचे हातून अशा गोष्टी झाल्या तरी त्यास दोष लागत नाहीं, त्याच प्रमाणें ज्ञान दृष्टि प्राप्त झालेल्या माणसासही उचितानुचित कर्माचें बंधन राहत नाहीं. (७८५) तो त्या पापपुण्यसन्मंव- - " तो पापपुण्यसंबंध त्याला' असा अन्वय करून पुढील 'कदाचि नाहीं' शीं जोडावयाचा. (७८६) सुनिटलें - 'निसुटलें' असा पाठ हवा. लेखकाच्या चुकीमुळें हा वर्णव्यत्यास झाला असावा. निसुटलें ह्मणजे निघून गेलें. (७९१) मनमुऋतु - मनाच्या तडाक्यांतून मुक्त झालेला. अमुक करावें व अमुक करूं नये अशी ज्याच्या मनांत प्रवृत्ति राहिली नाहीं तो. (७९३) कृताकृत्य --- ' कृतकृत्य' असा पाठ हवा. (७९७) जालां -- झालों. हें उत्तमपुरुष वाचक एकवचनीं रूप ध्यानांत ठेवण्या सारखें आहे. या ग्रंथांत बरेच ठिकाणीं अशा प्रकारचें रूप आलें आहे. (600) केलां—केलों. येथें पुढें 'मि' हें उत्तमपुरुषीं सर्वनाम असल्यानें या रूपाबद्दल संशयच नाहीं. सांघिजो — सांगावें. जुन्या मराठींत द्वितीय पुरुषीं बहुवचनीं असें रूप नेहमी येतें. ज्ञानेश्वरीच्या आरंभींच 'म्हणे निवृत्ति दास, अवघारिजो जी' असें आहे. Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com
SR No.035284
Book TitleMarathi - Tattvasara
Original Sutra AuthorN/A
AuthorChangdev Vateshwar
PublisherPrachya Granth Sangrahalay
Publication Year1936
Total Pages112
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Other
File Size7 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy