________________
क्रियेस खरें समजू नको. तें रिघणे ह्मणजे रिघणे नव्हे. पण हा निषेधभाव कांहीं तरी अस्तित्व सुचवितो ह्मणून तो सोडावयास सांगावें तो पुन्हां सोडणारा, सोडण्याची क्रिया व सोडावयाची वस्तु ही त्रिपुटी कायमच रहाणार. ह्मणून तो निषेध सोडणाऱ्यासह सोडावयास सांगितला. सारांश पुढील ओंवींत सांगितल्या प्रमाणे या वर्णनांत शब्दच खुंटतात ह्मणजे कुंठित होतात.
(७३७) सामावणी-ईकारांत भाववाचक नाम. लीनता, लय.
__ (७३८) आणपांचि आपणपांचि. 'प' लिहितांना चुकून राहिला.
(७४०) तुजावांचौ निरंतरि-तुझ्या वांचोनि निरंतरी.
(७४६) वोळगिजे-नमस्कार करावा. मूळ संस्कृतधातु 'अवलग.' अव चा झाला वो व ल चा झाला ळ. तुकारामही ह्मणतो 'ब्रह्मादिक जेथें तुह्मां वोळगणे, इतर तुळणे काय पुरे.'
न्हवण-स्नपन पासून झालेले रूप. स्नान घालणे.
आपणेयां-आपल्यास. तुकारामा पुढे ‘मने प्रतिमा स्थापिली, मनें मना पूजा केली, मनें इच्छा पुरविली, मन माउली सकळांची॥ मन गुरु आणि शिष्य, करी आपुलेंचि दास्य, प्रसन्न आप आपणांस, गति अथवा अधोगति.॥' हे लिहितांना या ओंव्या असाव्यातसे वाटतें.
(७४७) वाइजे–वाहिजे.
(७४८) मुंगियेच्या ठाउनु ब्रह्मावरि-मुंगीच्या सूक्ष्म ठिकाणा पासून ब्रह्मा पावेतो.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com