SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 102
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ (८२४) पशुपाश-हा शब्द अत्यंत अप्रयुक्त पण फार महत्वाचा आहे. ज्या दोरीने पशु वधस्तंभास बांधला जातो तो पशुपाश. पण कृष्णमिश्राच्या प्रबोधचंद्रोदय नांवांच्या नाटकांत हा शब्द एका विशिष्ट अर्थी वापरला आहे. जीवात्म्यास जखडून टाकणाऱ्या बंधनांस हा शब्द कृष्णमिश्राने वापरला आहे. या अर्थी हा शब्द फक्त याच नाटकांत आला आहे. कृष्णमिश्राचा काल ई. स. च्या अकराव्या शतकाच्या शेवटी शेवटी आहे. या नाटकांत प्रथमच वेदान्त व वैष्णव भक्तीची सुंदर सांगड घातली आहे. चांगदेवाने हा ग्रंथ वाचला असावा असे दिसते. पुढचा 'च' शब्द 'प्रबोधता' ही हेच सुचवितो. (८२६) अवलिला-लीलेनें, सहज. अवलीला हे शुद्ध रूप. (८३०) परब्रह्मेआ—परब्रह्माचें योगानें. तृतीयेचें एकवचन. (८३२) जि-जी, सन्मानार्थी संबोधन. हे संस्कृत 'अयि' चे रूप. य चा झाला ज व अ चा झाला लोप. अजी, जी, दोन्ही रूपें प्रचारांत आहेत व दोन्हींचा मिळून झालेला 'अजीजी' शब्दही मोठ्या माणसाचा कल पाहून बोलणे या अर्थी रूढ आहे. गुरुनिवारिला-'गुरुनि वारिला' असा पदच्छेद करावा. गुरूने निवारण केलें. (८३४) त्रुप्ति-शुद्ध रूप तृप्ति. (८३५) आर्हता-योग्यता. अर्हत् या शब्दापासून झालेले भाववाचक नाम. पुढच्याच ओंवीत हेच रूप निरनुस्वार आले आहे. (८३७) संघावें-सांघावें बद्दल लेखक प्रमादाने लिहिले गेलेलें रूप. अधिकारहीन माणसास ज्ञान न सांगण्याचा योग्य प्रघात भारतवर्षांत फार प्राचीन काळाShree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com
SR No.035284
Book TitleMarathi - Tattvasara
Original Sutra AuthorN/A
AuthorChangdev Vateshwar
PublisherPrachya Granth Sangrahalay
Publication Year1936
Total Pages112
LanguageSanskrit, Marathi
ClassificationBook_Other
File Size7 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy