Book Title: Marathi - Tattvasara
Author(s): Changdev Vateshwar
Publisher: Prachya Granth Sangrahalay

View full book text
Previous | Next

Page 101
________________ (८०५) आंगावरि-निवळ स्वतःच्या जवाबदारीवर, कोणास जामीन न ठेवतां. (८०६) अप्रचेया-अप्रचेतया असा पाठ पाहिजे. प्रचेता ह्मणजे ज्ञानी व अप्रचेता ह्मणजे अज्ञानी. (८०९) गुर्विणी-गर्भिणी. (८१२) कीर-निश्चित. 'संस्कृत 'किल' पासून हा शब्द 'ल' चा 'र' होऊन झाला असावा. (८१३) गुरुनु-गुरूनें. तृतीयेच्या एकवचनाचे रूप. (८१८) कर्मफळथार-कर्मफळास थारा. थारा ह्मणजे राहण्यास जागा. (८१९) मना-'मन' असा पाठ हवा. मन अनुभवा पलीकडे आहे. आणि अंत:करणांत ज्ञानप्रकाश असेल तर कर्माचे फळ राहण्यासच असमर्थ होईल. कर्मफळेच्छाच नसल्यास कर्मफळ कसे यावयाचें. कर्मगर्भु-कर्माचें बीज. (८२०) रुसणेनसि-रुसणाऱ्यासह. मागें ओंवी ७३४ पहा. (८२२) येकु येकु-एकदांच येक पाहिजे. लेखक प्रमादामुळे द्विरुक्ति. अन्यासि–'अनायासिं' असा पाठ पाहिजे. कांहीं श्रम न करिता. पुढे ओंवी ८२५ मध्ये स्पष्टच 'अनायासें' असें पद आले आहे. Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com

Loading...

Page Navigation
1 ... 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112