________________
१३
अंगीं चचिण्याची कल्पना आहे. या पांच मंत्रांतील प्रथम शब्द प्रत्येक भूताचा अधिपति मानला आहे. 'ईशानः सर्व विद्यानां' या मंत्रांतील ईशान, 'तत्पुरुषाय विद्महे' या मंत्रांतील तत्पुरुष, 'अघोरेभ्यो' यांतील अघोर, 'वामदेवाय नमो' पैकीं वामदेव व 'सद्योजातं प्रपद्यामि' यांतील सद्योजात, हीं तीं पांच ईश्वर स्वरूपें होत.
(६३६)
अनुक्रेमें—अनुक्रमें असा पाठ हवा. पुढील मात्रेमुळे 'क' वर मात्रा लिहिली
गेली.
(६३९)
दीपकळिका - - दिव्याची ज्योत. हा संकोच व विकास उपनिषद्ग्रंथांस प्रमाणभूत आहे. ब्रह्मवल्लींत हाच क्रम सांगितला आहे.
( ६४० )
यावेगळा -- याहून निराळा. रूपातीत म्हणजे सर्व प्रकारच्या रूपांत राहणारा पण त्याहून निराळा. 'स्थिरचर व्यापुनि अवघा जो जगदात्मा दशांगुलें उरला'तो.
(६४१)
संकळौनि - संकलन करून, एकत्र करून. द्विमात्रक औकारांत रूप ध्यानांत ठेवण्या सारखें आहे.
(६४३)
हठयोग — योगमार्गाचा एक प्रकार. या प्रकारांत देहास दंड देऊन चित्ताची चंचलता मोडावयाची असते.
राजयोग — योगमार्गाचा एक दुसरा प्रकार. हा सुलभ असल्यामुळे हठयोगाविरुद्ध याचें नांव राजयोग आहे. यांत आसनावर बसून एकाग्र चित्तानें समाधि साधावयाची असते.
(६४४)
वचती -- जातात. संस्कृत ' व्रज्' पासून 'वच' हा प्राचीन मराठींतील धातु
झाला असावा.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com