________________
पैलु पारु-पलीकडील तीर. ज्ञानदेवाच्या उत्तर गीतेंत हीच कल्पना जवळ जवळ याच शब्दांत सांगितली आहे. 'तंवचि पांगु कीजे नावेचा, जंववरि पार न पाविजे महा नदीचा, तो पावलिया नावेचा, अनादरु की.'
(६८५) कव्हणी येकी काळवषां पतित-कोणी एक आकस्मिक पडलेली. हे पुढील चरणांतील दोरीचें विशेषण. जालेयां-झाल्यास, झाल्यावर.
(६८७) विव्हावो-विवाह. 'ह'अंती असल्यामुळे ओकारांत रूप होऊन वर्णव्यत्यासाने झालेलें रूप. चेइलेयां-जागे झाल्यावर. चेतणे पासून चेइणे.
(६९०) आधार--आधारचक्र व त्याचे ज्ञान. येथे साही चक्रांची नांवें सागितली आहेत.
(६९१) अनहात श्रवण-अनाहत श्रवण. समाधि लागल्यावर कर्णपथावर जो एक प्रकारचा नाद ऐकू येत असतो तो ऐकणे. हा कशावरहि आघात न करितां होत असल्यामुळे यास अनाहत नाद असें ह्मणतात.
(६९२) अवस्थात्रय जागृति, स्वप्न व सुषुप्ति या तीन स्थिति.
धातुर्वाद-किमया. सोने करण्याची विद्या. विवर-निरनिराळी काढ. या चरणांत १६ अक्षरे आहेत.
झणें-नको. 'चन' या संस्कृत शब्दां पासून हा मराठी शब्द झाला असल्याने हा निषेधार्थी वापरलेला असतो.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com