________________
नांवे आहेत. मापांप्रमाणे या पात्रांनी वांटे काढावयाचे असतात. आवपनी, आवपनिका यांची ओपणी, ओपणिका ही रूपं सहज सिद्ध होतील व पोवः' या प्राकृत सूत्राप्रमाणे 'प' चा 'व' करून ओवणिका शब्द होणे सुलभ आहे. शिवाय भाग काढून ठेवण्याचे अर्थांत आणखीहि एक अर्थ सुचविला जातो, जो या शब्दाच्या सिद्धिचे खरे स्वरूप सुचवितो. कांडतांना किंवा दळतांना कांहीं विवक्षित कालानंतर नवीन भरण उखळांत किंवा जात्यांत टाकावयाचे असते. हा काल ठरविण्यास अशा गीताचा उपयोग करीत असावेत. म्हणजे एक गीत झाले की एक ओपणी संपली व या अर्थाने ओपणी, ओपी त्या धान्याच्या मापास व तें माप कांडले जात असतांना किंवा दळले जात असतांना म्हटल्या जाणाऱ्या गीतास लावला गेला असावा. या व्युत्पत्तीप्रमाणे ओंबी या शब्दास विशेष अर्थ येतो व हा छंद निर्माण होण्याचे कारणही ध्यानी येतें.
आरंभी आरंभी ओंवीचे चरण निश्चित अक्षर संख्येने युक्त असतील, कारण त्याशिवाय कालमापन बरोबर करता येणार नाही. पण संस्कृत अनुष्टुपाप्रमाणे मराठी ग्रंथकार जेव्हां ओंवीचा ज्योतिष, वेदांत, वैद्यक, इत्यादि शास्त्र ग्रंथ लिहितांनाहि उपयोग करूं लागले, तेव्हां हा अक्षर नियम शिथिल होऊन ओंवीस सयमक गद्याचे स्वरूप आले. याच कारणाकरितां अनुष्टुप् छंदाला ज्याप्रमाणे 'एक नेम नसे गणीं' चे रूप राहिले, तसेंच ओंवीचे रूप राहन शिवाय अक्षर संव्यंचेही बंधन राहिले नाही. म्हणूनच ओंवीचे लक्षण बांधतांना भीष्माचार्यास “गायत्री छंदापासौनि धृतिपर्यत, ग्रंथवोवियांचे तीन चरण जाणावे मिश्रित, प्रतिष्ठेपासौनि जगतीपर्यंत, चौथा चरण" असे सांगावे लागले. ज्ञानेश्वरीतल्या ओंवी चरणाची संख्या मोजून पाहिल्यामुळे राजवाड्यांस असे लक्षण बांधावे लागले की “ओंवीचे पहिले तीन चरण 'सुप्रतिष्ठा' पासून 'धृति' पर्यंतच्या कोणत्याही छंदाचे असतात आणि चौथा चरण 'मध्यमा' पासून 'जगती' "छंदापर्यंतच्या कोणत्याहि छंदाचा असतो." सारांश काय की. भीष्माचार्यांनी ओंवीच्या प्रथम तीन चरणांत कमीतकमी ६ अक्षरें तरी असावीत असा नियम केला व राजवाड्यांनी ही ६ अक्षरांची संख्या ५ वर आणली. चांगदेवाच्या
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com