________________
डुल्लत्तु-डुलत असतो. या प्रकारच्या धातुसाधित विशेषणाचे रूप प्रायः उकारांत सांपडते. शेवटील तकाराचे द्वित्व मागील लकाराच्या द्वित्वामुळे आले आहे.
अभिनवितु-अभिनय करितो. 'य' चा 'व' झाला आहे.
कुविद्याभरणहुताशनु-चांगदेवाने या ओंवींत अविद्या व कुविद्या यांतील भेद मोठ्या गमतीने दाखविला आहे. अविद्या म्हणजे विद्येचा अभाव हा स्वाभाविक असतो. विद्या शिकण्यापूर्वी प्रत्येक मनुष्य अविद्यच असतो. म्हणून अविद्येस स्वाभाविकपणे वाढणाऱ्या गवताची उपमा दिली आहे. पण कुविद्या ही स्वाभाविक नसून स्वतः मिळविलेली असल्यामुळे कृत्रिम व म्हणूनच अलंकारा सारखी असते. अलंकारा प्रमाणेच कुविद्येचीही माणसास ऐट असते. चांगदेवास स्वतःच आपल्या कुविद्येची जाणीव असल्यामुळे त्याज कडून हा भेद दाखविला जाणे अपरिहार्यच होतें. ज्ञानाग्नीस अविद्या तृणास जाळणारा पण कुविद्याभरणाची आहुति खाणारा मुद्दामच म्हटलेंसें वाततें.
ज्ञानाज्ञी-ज्ञानाग्नि, असा पाठ हवा.
गिरिजे शंभुचा–गिरिजेचा म्हणजे पार्वतीचा व शंभु म्हणजे शंकराचा. चांगदेवाच्या भाषेतील हे प्रथम पदाचें सामान्यरूप ध्यानात ठेवण्यासारखे आहे. हिंदीत हा प्रघात सरसहा चालू आहे.
वाचा प्रदक्षिणा करुनु-वाणीने प्रदक्षिणा करून. वाचा हे संस्कृत तृतीयैकवचनांत रूप मराठीत बरेच वेळ तसेंचे तसेंच सांपडतें. उदाहरणार्थ कायावाचामनें. आणखीही काही संस्कृत रूपें मराठीत तशीच राहिली आहेत. जसें राजश्रिया विराजित. ऊन प्रत्ययांत धातुसाधित अव्ययाचें उकारांत रूप श्रीशिवाजी माहराजांच्या वेळच्या पत्रव्यवहारकालापर्यंतही सांपडतें.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com