Book Title: Marathi - Tattvasara
Author(s): Changdev Vateshwar
Publisher: Prachya Granth Sangrahalay

View full book text
Previous | Next

Page 83
________________ वोंकार--ॐकार. शब्दांच्या आरंभीच्या ओकारा बद्दल वोकार व एकाराबद्दल येकार नेहमी येतो. (६०७) तस्य-संस्कृत रूप जसेच्या तसेंच आले आहे. मन व्योमा पासोनु--मनाच्या आकाशा पासून म्हणजे पोकळीतून. (६०८) मन बुद्धिचा गव्हरी–मनाच्या व बुद्धीच्या गूढ ठिकाणी. 'च' याच्या मराठीतल्या दुहेरी उच्चारामुळे पुष्कळ ठिकाणी 'च' च्या जागी 'च्य' व 'च्य' च्या जागी 'च' लिहिला जातो. उदाहरणार्थ येथेच 'च्या' चे ऐवजी 'चा' लिहिला गेला व पुढच्याच चरणांत 'चारि' च्या जागी 'च्यारि' लिहिले गेले. या चारी प्रकाराच्या वाणींचे वर्णन समर्थांनीही दासबोधांत दशक १७वा, समास ८वा, ओंव्या १ ते ३ मध्ये केले आहे. (६०९) मात्रवृता-मात्रावृता. निवळ इंद्रियाने युक्त. भगवद्गीतेतहि ‘मात्रा' शब्द याच अर्थों 'मात्रास्पर्शाः' या पदांत आला आहे. परमात्मेया--परमात्म्याचा. घोषु-घोष, ध्वनि, नाद, व शब्द या चार निरनिराळ्या एका पुढील एक पायऱ्या आहेत. अत्यंत सूक्ष्म तो घोष, नंतर ध्वनि, किंचित्स्थूल तो नाद व दुसऱ्याच्या श्रवणेंद्रियास गोचर तो शब्द. (६१०) पश्यंति--पश्यंती. परेच्या पुढील वाणीचे स्वरूप. परा ही पूर्णपणे अव्यक्त, दुसऱ्याच्या नजरेस येणारी ती पश्यंती, ओंठ हालावयास लागले की मध्यमा व स्पष्ट ऐकू येऊ लागली की वैखरी, असे वाणीचे चार भेद केले आहेत. Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com

Loading...

Page Navigation
1 ... 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112