________________
(६११) स्थूल बीज-स्पष्टपणे ध्यानात आणून देणारे अक्षर. बीज किंवा मातृका ही तांत्रिक विधींतील विशिष्ट अक्षरे आहेत. निरनिराळया देवतांसाठी ही निरनिराळी मानली गेली आहेत.
(६१२) हंस वाक्य---'हंसः' हे वाक्य. हे अहं सः ह्मणजे मी तो (च आहे) या वाक्याचें संक्षिप्त रूप. प्रत्येक श्वासा बरोबर वायु आंत ओढला ह्मणजे 'सः' या सारखा व वायु बाहेर पडला ह्मणजे 'हं' या सारखा नाद होतो या प्रत्येक श्वासोच्छावासा बरोबर तो मी, तो मी, ही भावना जागृत ठेवणारे तें हंस वाक्य.
(६१३) विंदनादभरितु--बिंदु ह्मगजे अनुस्वारासारख्या नादाने युक्त. बिजद्वय-बीजय.
शिउशक्ति--शिव शक्ति. 'हं' हे आत्म सूचक अक्षर शिवाचें व ‘सः' हे अन्यसृष्टिसूचक अक्षर शक्तीचे द्योतक मानले गेले आहे. 'शिव' यांतील 'व' च्या जागी 'उ' आलेला दिसतो. याच प्रमाणे 'जीव' याचेंहि लेखन 'जीउ' असें आढळतें.
(६१४) अजपा--जिचा जप करावा लागत नाहीं तो अजपा. 'ॐ हंसः' या अक्षरांच्या नादाची पुनरुक्ति ह्मणजे जप. तोंडाने जप न करितां प्रत्येक श्वासोच्छवासा बरोबर होतच असतो ह्मणून योगी लोक या मंत्रास 'अजपा गायत्री' असें ह्मणतात.
आतां--आंत च्या ऐवजी लेखकप्रमादाने आतां लिहिले गेलें.
पृथग्बीजें निरनिराळी बीजाक्षरें. आंत प्रवेश केला की सृष्टि व बाहेर पडलें की संहार. 'यदिदं किंच। तत्सृष्ट्वा । तदेवानुप्राविशत्।' या ब्रह्मोपनिषदांतहि हेच सांगितले आहे. ह्मणून मायेचे किंवा सृष्टीचे बीज सकार व ईश्वराचे आत्मप्रतीक बीज हकार अशी निरनिराळी बीजाक्षरे आहेत. Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat ___www.umaragyanbhandar.com
www