________________
साष्टांग प्रणमनु – साष्टांग नमस्कार. 'प्रणमुनु' हें रूप 'प्रणमनु' असें पाहिजे. कारण येथें हें ऊन प्रत्ययांत धातुसाधित नसून नाम आहे. साष्टांग नमस्काराची प्रथा महाराष्ट्रांतील असून ती अजूनही 'सा. न. वि. वि.' यांत संक्षेपानें विद्यमान आहे. 'साष्टांगी नमन करुनि आठ वण' या आर्याचरणांत पंतांनीही साष्टांग नमस्कारांमुळे दोन हात, दोन पाय, दोन गुडघे, छाती व शिर या आठ अंगांस घट्टे पडण्याच्या प्रघाताचा उल्लेख केला आहे.
(७)
मूळिका -- मूळ, मुळो.
काश्मिरीची नायिका - विद्येची अधिदेवता. काश्मीर देश दहाव्या शतका पासून बाराव्या शतकापर्यंत विद्येचें माहेरघर झाल्यामुळें त्याकाळीं काश्मीरी हा शब्द विद्या किंवा विद्वानांचा वाचक झालेला होता.
बुधीसी बुद्धीस.
वागेश्वरी - संस्कृत 'वागीश्वरी' चें मराठी अपभ्रष्ट रूप.
(८)
गोक्षीरघवळ-गाईच्या दुधाप्रमाणें शुभ्र.
उभयकुळ—–सासरचें व माहेरचें अशीं दोन्हीं कुळें. सरस्वती, ब्रम्हपुत्री व शिवस्नुषा असल्यानें-- तिची दोन्हीं कुळें शुद्धच होतीं.
( ९ )
जिये -जिला.
पाशांकुशघरण — फांस व अंकुश यांचे धारण. चांगदेव यानें शारदेचें 'वीणा पुस्तक धारिणी' असें वर्णन लें नसून 'पाशांकुशधारिणी' असें केलें आहे. यावरून त्याचे मतानें विद्या ही केवळ विनोद व आनंद उत्पन्न करण्यापेक्षां चित्तास' बांधणारी व इष्टकार्याकडे प्रवृत्त करणारी आहे. 'योगश्चित्तवृत्ति निरोधः या तत्वाप्रमाणें वागणाऱ्या योगेश्वरास हें साजेसेंच आहे.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com