Book Title: Marathi - Tattvasara
Author(s): Changdev Vateshwar
Publisher: Prachya Granth Sangrahalay

View full book text
Previous | Next

Page 80
________________ फारच बहार केली आहे. समर्थांच्या 'प्रीतिविण रूसूं नये' या सांगण्याप्रमाणें देहाची प्रीति अगदी स्वाभाविक आहे. पण तरीही देह आपला आहे ही गोष्ट ठाऊक असूनही त्याचा अभिमान न बाळगणें हेंच खरें वैराग्य. इछा - इच्छा. आपेसें-- आनें आप. याचें शुद्ध रूप आपैसें हिंदी 'आपही से' पासून आपईसें. आपैसें, आपेसें असें झालें असावें . (५९१) अष्टांग योग भ्यानु--अञ्टांग योगाभ्यासु. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा व समाधि हीं योगाची आठ अंगें. परमहंसु -- योग्यांच्या कोटींतील श्रेष्ठ कोटीचा पुरुष. (५९२) गोप्य गव्हर—न सांगण्यासारखें गूढ. सकळै-— सकळही. 'ह' चा लोप होऊन सकळइ, 'सकळे' असें रूप झालें आहे. आपैसें हा शब्द पहा. निःशब्दावार - शब्द रहित अनुभवाच्या आधारावर. (५९३) उजेडें— उघडपणानें, स्पष्टपणानें. (५९४) सोपानें— क्रमाक्रमाने, पायरी पायरीनें. बोलिजैल -- बोलिलें जाईल. धातूस 'इजैल' हा प्रत्यय मराठीत कर्मणि रूप होत असे. चांग - चांगलेपणानें. लाऊन जुन्या (५९५) परियेसा - ऐका. हा धातु संस्कृत 'परीष्' पासून निघाला आहे. 'परीष्’' चें भाववाचक नाम पर्येषण होऊन परियेषणें, परियेसणें या क्रमानें हा मराठींत उतरला. Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com

Loading...

Page Navigation
1 ... 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112