________________
महिमाग्ने–लेखकाच्या प्रमादाने हा शब्द असा लिहिला गेला आहे. 'महिमा' ही तीन अक्षरे लिहिल्यावर पुढच्या ‘गहन' शब्दांतील 'ग' लिहिला गेला. पण काना देऊन त्यास पुरा करण्यापूर्वीच लेखकाच्या लक्षांत आपली चूक आली व त्याने 'ने' हे अक्षर लिहिले. पण 'ग' चा अर्धभाग खोडावयाचा तसाच राहिला. येथील शब्द 'महिमानें' म्हणजे मोठेपणामुळे, असा आहे. १३व्या ओंवीचा प्रथम चरण 'जे महिमानें गहन' असाच आहे.
(१०) नवरस-शृंगार, हास्य, वीर, करुण, रौद्र, भयानक, बीभत्स, अद्भुत व शांत, हे नऊ रस. सप्तस्वर-षड्ज, ऋषभ, गांधार, मध्यम, पंचम, धैवत व निषाद हे सात स्वर
(११) अती, ति-येथें कांहीं लेखन दोष असावासे वाटते. अर्थ स्पष्ट लागत नाही.
(१२) लंबिके, खेचरी ही दोन्हीं योग शास्त्रांतील देवतांची नावे आहेत. या नांवाच्या मुद्राही आहेत.
(१३) अनुवादली—बोलली. सरस्वती प्रसन्न होऊन 'भलारे' असें म्हणाली.
(१४)
आतां-येथे प्रथम पृष्ठ संपलें. पुढची पत्रे न मिळाल्याने पुढे काय असेल हे सांगता येत नाही. पण गणेशशारदावंदना नंतर बहुधा गुरुवंदन असेलसें वाटते. हे सांपडतें तर चांगदेवाच्या गुरूबद्दल काही माहिती विशेष मिळण्याचा संभव होता. येथून पुढची १९ पर्ने म्हणजे ५९० ओंवी पर्यंतचा भाग गहाळला आहे.
(५९०) देह अहंतेसि-देहाभिमानास. या ओंवींत वैराग्याची अत्यंत सुंदर व्याख्या दिली आहे. देहाचा अभिमान सोडणे याचंच नांव वैराग्य. 'रुसणे' या शब्दानें Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com