________________
ओव्यावरून ही संख्या आणखीही खाली आणावी लागेल. तत्वसारांतील सर्वांत लहा। ओंवी ६६६वी आहे. इच्यांत तीनच अक्षरांचा एक चरण पडतो. 'हे नोबलें, पाहिले, तेंवीचि कैसें केलें, जाणनेण' ही ती ओंवी. यावरून आपणांस एवढेच म्हणता येईल की अर्थानुरोधाने प्रसंग पडेल तसे ओंवीचे चरण मराठी ग्रंथकार लहान मोठे करीत असत.
येथपर्यंत हा तत्वसार ग्रंथ कसा मिळाला, तो कोठे, केव्हां व कोणी लिहिला आणि त्याचे अंतरंग तथा बहिरंग कसे आहे, याचा विचार केला. आतां ज्यांचे कृपाप्रसादाने हा ग्रंथ प्रसिद्ध होत आहे त्यांचे आभार मानून हा बराच लांबलेला उपोद्घात पुरा करावयाचा आहे. सर्वांत प्रथम प्राच्य ग्रंथसंग्रहालयाचा उपक्रम करणारे ग्वाल्हेर सरकारच्या शिक्षा विभागाचे अधिकारी रा. ब. लक्ष्मण भास्कर मुळे यांचे व ग्वाल्हेर मुक्कामी त्या कार्यास इतकें व्यवस्थित रूप आणून देणारे रा. केशव बळवंत डोंगरे यांचे आभार मानले पाहिजेत. रा. डोंगरे यांनी ग्रंथ प्रकाशित करावयाचे ठरवून उपोद्घात व टीपा लिहिण्याचे काम मजवर सोपविलें. दुसऱ्या एकाद्या लेखकाकडे हे काम दिले गेले असते तर हे याहून पूर्वीच पुरे झालें असते. पण माझे इतर व्यवसाय सांभाळून मला हे कार्य करावे लागल्यामुळे या प्रकाशनास कल्पनेबाहेर विलंब लागला याबद्दल खेद प्रदर्शित करणेही माझें कर्तव्यच आहे. हा सारा विलंब सोसून अलीजाह दरबार प्रेसने हे पुस्तक इतक्या चांगल्या रीतीने छापन दिले याबद्दल प्रेसचे व्यवस्थापक श्री. मानगांवकर यांचे आभार मानल्याशिवाय हे आभार प्रदर्शनाचे कार्य पुरेंच होणार नाही. सबब या सर्वांचे आभार मानून व ज्यांच्या कृपाछत्राखाली हे सर्व सुव्यवस्थित होत आहे ते आमचे श्रीमंत महाराज जिवाजीराव साहेब शिंदे दीर्घायु होऊन अशा प्रकारची वाङ्मयात्मक कामें त्यांच्या राजवटींत अनेक होवोत अशी ईश्वराजवळ प्रार्थना करून हा उपोद्घात पुरा करितों.
लश्कर ग्वाल्हेर. ताः १० मे १९३६.
है. रा. दिवेकर.
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com