________________
करणारा असेल असें संभवत नाहीं व असें म्हणावयास यत्किचित् हरकत वाटत नाहीं कीं चांगदेवाचा गुरु एक वटेश्वरच. मग तो वटेश्वर कोणी असो !
आतां या वटेश्वराची तत्वसारांत काय माहिती सांपडते तें पाहूं. प्रारंभीचें गणेश शारदा वंदनानंतरचें गुरुवंदन सांपडलें असतें, तर या प्रश्नावर बराच प्रकाश पडला असता. पण तें जरी सांपडलें नाहीं तरी वटेश्वराचा उल्लेख बरेच ठिकाणीं आला आहे. चांगदेवानें निर्गुण भक्तीचा अनुवाद वटेश्वर प्रसादानें केला आहे. जें जाणल्यानें जाणीवेचा शेवट होतो तें वटेश्वराचें रूप वटेश्वर होऊनच चांगदेव सांगत आहे. त्रिगुण गोप्य गव्हर वटेश्वरस्वामीच्या प्रसादाने चांगदेवाचा संसार नाहींसा झाला व वटेश्वरानेंच आत्मब्रह्म दाऊन चांगदेवास चांगदेवाचें स्वरूप सांगितलें. गुरुशिष्य एक झाले, ही एक होण्याची भावना नाहींशी झाली व ती नाहींची भावना वटेश्वराचे ठिकाणी राहिली. चांगदेवाने ही ग्रंथरूपी पूजा गुरुवटेश्वरास वाहिली. या प्रकारचें अवधूत चांगदेवानें किंवा वटेश्वराच्या सुतानें वर्णन केलें आहे. या सर्व उल्लेखावरून चांगदेवाचे ज्ञानमार्गांतील व योगमार्गांतील गुरु वटेश्वर एकच आहेत असें वाटतें. वटेश्वर जर नुसते योगसिद्धच असते तर वरील ज्ञान त्यांचे कृपाप्रसादानें झालें, असें म्हणून वटेश्वराची मिथ्या स्तुति व ज्ञानगुरुविषयीं अकृतज्ञता चांगदेवानें केव्हांहि नसती दर्शविली शिवाय योगी वटेश्वराचा उल्लेख योगसिद्धांच्या नामावळींत न येणें आश्चर्यकारक नव्हे काय ? त्या मालिकेंत मत्स्येंद्र चौरंगी, गोरक्ष व मुक्तादेवी एवढ्यांचा उल्लेख चांगदेव करितात यावरून वटेश्वर त्या मार्गांतील असतील असा संभव कमी वाटतो.
चांगदेवांचे अभंग पाहतांही वटेश्वर नांवाचा त्याचा योगमार्गी कोणी गुरु होता असें वाटत नाहीं. रा. गोंधळेकरांनी प्रसिद्ध केलेल्या ज्ञानदेवाच्या गाथेंत चांगदेवाचे म्हणून ४६ अभंग दिले आहेत. त्यांतही वटेश्वराचा योगाशीं कोठेच संबंध लावलेला नाहीं. उलट जेथें जेथें वटेश्वराचा संबंध आहे तेथें तेथें तो ज्ञानाशींच आहे. उदाहरणार्थं अभंग ८ मध्ये चांगदेव म्हणतात. 'चांगा वटेश्वरी सोहं झाला । अवघाचि बुडाला ज्ञान डोहीं.' अभंग २० मध्ये 'डोळां लावुनि निजीं निजेला
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com