________________
पर्वतावर जेथून मंगळगंगा नांवाची नदी निघते व जेथील महादेवाची केदारेश्वराशी तुलना केली जाते त्या ठिकाणी मार्गशीर्ष शुद्ध ३ रविवारी ग्रंथ समाप्त झाला आहे. श्रीयुत ल. रा. पांगारकर यांच्या मतानें 'नगर जिल्ह्यांत आकोले तालुक्यांत एक हरिश्चंद्राचा डोंगर आहे, तेंच हे स्थान असावें'. पण याबद्दलचा कायम निश्चय अजून झालेला नाही. ___ ग्रंथाचा रचणारा चांगदेव वटेश्वर याबद्दल महाराष्ट्र सारस्वत लेखक कै० भावे यांनी असे म्हटले होते की “याच (ज्ञानेश्वर) काळाच्या ग्रंथकारांपैकी ज्याचें नांव मात्र सर्वत्र प्रसिद्ध आहे पण ज्याचे ग्रंथ फार उपलब्ध नाहीत असा चांगदेव हा ग्रंथकार होय." व "उत्तर पंचविशी या नांवाचे एक प्रकरण, एक आरती व सुमारे पांच पंचवीस अभंग इतकीच याची कृति हल्ली उपलब्ध आहे." ही कृति अत्यंत थोडी व तीही पूर्णविश्वासार्ह अशी नसल्यामुळे महाराष्ट्र सारस्वताच्या नवीन आवृत्तीतून या ग्रंथकाराची उचलबांगडी झाली. चांगदेवाचे ग्रंथ एकनाथांस चांगलेच माहीत असावेत असे त्याने आपल्या भागवताचे आरंभींच लिहिलेल्या "वंदूं प्राकृत कवीश्वर। निवृत्ति प्रमुख ज्ञानेश्वर। नामदेव चांगदेव वटेश्वर । ज्यांचे भाग्य थोर गुरु कृपा।। जयांचे ग्रंथ पाहतां। ज्ञान होय प्राकृतां। तयांचे चरणीं माथा। निजात्मता निजभावें॥" या ओंव्यावरून स्पष्ट दिसत आहे. पण हा ग्रंथ जर मिळाला नसता तर चांगदेवाचे नांव महाराष्ट्र सारस्वतांतून हळू हळू लुप्त झाले असते. पण हा मिळाल्यावर आतां तसे होण्याची भीति राहिली नाही. श्री. पांगारकर यांनी आपल्या 'मराठी वाङमयाचा इतिहास, खंड १ ला-ज्ञानेश्वर नामदेवांचा काल' या ग्रंथांत जरी चांगदेवाचे वर्णन ग्रंथकार म्हणून केलेले नसले, तरी बडोद्याच्या सहविचार त्रैमासिकांत वर्ष १२, अंक ४ यांत यावर एक लेख प्रसिद्ध झाल्यानंतर आपल्या 'एकनाथ तुकारामांचा काल' या दुस-या खंडांत ६ पाने चांगदेव वटेश्वराच्या तत्वसारावर प्रसिद्ध करून चांगदेवास मराठी वाङमयाच्या इतिहासांत पुन्हा स्थान दिले आहे.
याच खंडांत केलेल्या एका विधानाबद्दल मात्र थोडे लिहिले पाहिजे. पृष्ठ ३ वर श्री. पांगारकरांनी लिहिले आहे की चांगदेव याचेच चक्रपाणि हे दुसरें नांव असावें. पण ते बरोबर वाटत नाही. सिद्धपंथ सांगतांना चांगदेव वर्णन Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com