________________
आपल्या प्रत्येक अभंगांत आपल्या नांवाची छान घालण्याच्या पद्धतीकडे लक्ष्य दिलें तर वटेश्वर हैं स्वतःचें नांव नसतांना चांगदेवाने घातलें असेल असें संभवत नाहीं. चांगदेवासारख्या वयोवृद्ध व सिद्ध पुरुषाचे गुरु होण्यापेक्षां त्यास स्वस्वरूपाचाच शिष्य करणें मुक्तादेवीस अधिक योग्य वाटलें असेल. वटेश्वराचें कोडें दुसऱ्या एखाद्या अधिक बळकट पुराव्याने सुटेपावेतों वटेश्वर म्हणजे चांगदेवांचें शुद्ध आत्मस्वरूप असेंच मानिलें पाहिजे. हें स्वरूप समजल्यावर चांगदेव, चांगा वटेश्वर, किंवा वटेश्वर या तीन्ही नांवानें एकच व्यक्ति ओळखिली जाण्यास हरकत नाहीं, या उपपत्तीमुळे योगसिद्धांचे मालिकेंत वटेश्वराचें नांव न येण्याचेंही कारण स्पष्ट समजतें.
आतां ग्रंथगर्भी काय सांगितलें आहे हें पाहूं. पहिल्या पांच ओव्यांत गणेशस्तवन असून पुढे १३ पावेतों शारदास्तवन आहे. यापुढे गुरुस्तवन असावेसें वाटतें. यानंतरच्या ज्या ओव्या सांपडल्या नाहींत त्यांत स्थूल व सूक्ष्म भक्तीचें ज्ञान वैराग्य-संमतीनें वर्णन केलेलें असावें असें ५९५व्या ओंवीवरून वाटतें. याप्रमाणें स्थूल व सूक्ष्म भक्ती सांगून चांगदेव निर्गुणभक्तीकडे वळले आहेत. या निर्गुणभक्तीचें विवरण करण्यापूर्वी चांगदेवाने पद, पिंड, रूप व रूपातीत या चार गोष्टींचा विचार केला आहे. पद म्हणजे श्वासोश्वासाबरोबर होणारे सोऽहं, अहंसः हे शब्द. पिंड म्हणजे शरीरास आधारभूत असलेली कुंडलिनी. रूप म्हणजे पंचमहाभूतांचा विस्तार व लय व या संकोच विकासाहून पर, द्वैताद्वैतापलीकडील जो, तो रूपातीत. या रूपातीताची भक्ति तीच निर्गुणभक्ति . ६४१ पर्यंत हाच विषय विस्ताराने प्रतिपादन केला आहे.
ओंवी ६४३ पासून ६६४ पावेतों हठयोग सांगितला आहे. पण यांत मुख्य सांगितलेली गोष्ट म्हणजे शरीर - साधना न करणें. गुरुपरंपरागत व स्वानुभूत वर्गन कसें असतें याचा वरील ओव्या उत्तम मासला आहेत. समाधीच्या या ओंत्र्या व ज्ञानेश्वरींतील या विषयाच्या ओव्या परस्पर ताडून पाहण्या सारख्या आहेत. समाधि लाऊन मन निर्विषय करणें व निर्गुणभक्ति करणें एकच आहे. येथे चांगदेवानें नुसती 'शब्दाची चावटी' केली नसून 'आधी केले मग सांगितलें ' या न्यायानें स्वानुभवच शब्दरूपानें ओतला आहे. पुढें निर्वाण व सिद्ध योग
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com