________________
सांगून ब्रह्मविवरणास आरंभ केला आहे. मग प्रत्येक साकार वस्तु ब्रह्म कशी असते हे सांगून तिचा त्याग कसा करावा याचे विवरण ओंवी ७३० पर्यंत आहे. निरनिराळ्या क्रिया, निरनिराळे योग, निरनिराळी शास्त्रे, एवढेच नव्हे तर पितृगोत्र, जीवभाव यांच्याही ममतेचा त्याग केला पाहिजे. नुसत्या शरीरसिद्धीचीच नव्हे तर तिज बरोबरच पापपुण्य, वर्णभेद, निंदास्तुति, मानापमान, सुखदुःख, आस्तिक नास्तिक वाद, रिद्धि सिद्धि, कर्म निष्कर्म इत्यादिकांची आस सोडतां सोडतां पंच भूतांचाहि त्याग झाला म्हणजे जें अप्रमेय, अक्षय, अविनाश, अच्युत, सदाशिव, सानंदपूर्ण, सर्वज्ञ, शांत, मंगल, वेदवेद्य, ॐकाराक्षर ब्रह्म राहतें तें तूंच आहेस' अशी तत्वमसि वाक्याची फोड केलेली आहे.
हा तत्वमसि उपदेश समजला व मनाचा पूर्णपणे लोप होऊन संकल्प विकल्प मावळले म्हणजे सर्व प्रकारच्या प्रवृत्ति आपोआप मावळतात. मग उचितानुचित कर्माचे बंधन रहात नाही. ब्रह्मवल्ल्युपनिषदांत सांगितल्याप्रमाणे 'एतरह वाव न तपति। किमहं साधु नाकरवम् । किमहं पापमकरवमिति'--मी कोणतें पाप केले किंवा मी कोणतें सत्कृत्य केलें नाहीं इत्यादिकांचा ताप त्यामागें रहात नाही. मग त्याच्या हातून कुकर्म जरी झाले तरी त्याचे बंधन त्यास होत नाही. पण अकर्म करून बंधन होत नाही हा विषय स्पष्टपणे समजला नसेल म्हणून दोन उदाहरणे देऊन शंका घेतल्या आहेत व त्याचेच समाधान मोठ्या मार्मिकपणे केले आहे. संकल्प असो की नसो, कोणाचें ऋण काढिले किंवा विधवा ब्राह्मणस्त्रीने पुरुषसंग केला तर तें ऋण द्यावे लागेल की नाही किंवा त्या विधवेस गर्भ राहील की नाही या शंका, आणि मेल्यावर ऋण द्यावे लागत नाही किंवा क्षारादिक औषधींनी गर्भ धारणाच होत नाही हे समाधान, मूळांतच ओंवी ८०३ ते ८२७ पर्यंत वाचले पाहिजे. ___हे ज्ञान अत्यंत कठिण आहे, थोडा वेळ पटले तरी पुनः पुन्हा अज्ञानाचे पटल मनावर येतच असते, आणि म्हणूनच वर सांगितल्याप्रमाणे क्रिया कर्मांचा लोप करणारे ज्ञान भलत्यास सांगणे साहसाचे आहे. तो लोप आपोआप स्वाभाविकपणे झाला पाहिजे. मुद्दाम करून चालत नाही. हटाने केल्यास उपयोग नाही. या
Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat
www.umaragyanbhandar.com