Book Title: Marathi - Tattvasara
Author(s): Changdev Vateshwar
Publisher: Prachya Granth Sangrahalay

View full book text
Previous | Next

Page 16
________________ साठींच वेदान्त ज्ञान 'अशिष्याय न देयं' असा प्रतिषेध आहे. चांगदेवानेही या निषेधाचाच अनुवाद केला आहे. अज्ञान पटल मनावर न येऊं देणें फार कठिण आहे व या कार्यांत थोडें यश येऊन पूर्ण सिद्धि प्राप्त न झाली तर काय होईल या प्रश्नाचें उत्तर भगवद्गीतेस अनुसरूनच 'असा अपभ्रष्ट पुरुष चांगल्या कुळांत जन्मून विधियुक्त भक्ति आचरितो व सिद्ध होतो' असें ८४७ ओंवींत दिले आहे. योग्याच्या सिद्धि भ्भ्रंशाचें कारण मात्र चांगदेवानें भिन्न दिलें आहे. योगमार्गांत सिद्धि मिळू लागली कीं आपलें स्थान जाईल ही देवांस भीति वाटू लागते व म्हणून ते या योग्याच्या मार्गांत विघ्ने आणीत असतात अशी चांगदेवांची उपपत्ति आहे. पण ही विघ्नांची भीति सिद्धदशा आंगीं बाणण्यापूर्वीच आहे. सिद्ध झाल्यावर मग विघ्नें कोठलीं ? यापुढें ओंवी ८६७ पासून योगमार्गांतील सिद्धांचीं नांवें दिली आहेत. आजपावेतों हठयोग प्रदीपिकाकार स्वात्माराम योगीश्वरानें सांगितलेली या मार्गांतील " श्री आदिनाथ मत्स्येंद्र शाबरानंद भैरवा । चौरंगी-मीन - गोरक्ष-विरूपाक्ष-बिलेशया : " मंथानो भैरवो योगी शुद्धबुद्धश्च कंथडि: । कोरंटकः सुरानंदः सिद्धनाथश्च चर्पटिः ॥ कानेरी पूज्यपादश्च नित्यनाथ निरंजनः । कपाली बिंदुनाथश्च काकचण्डीश्वराह्वयाः ॥ अल्लमप्रभुदेवश्च घोडा चोलीच टिटिणिः । भालुकी नागदेवश्च खण्डकापालिकस्तथा ॥ एवढ्याच लोकांचीं नांवें माहीत होतीं. पण चांगदेवानें याहूनहि विस्तृत नामावलि दिली आहे. ८८१ ओंवींत ही मालिका संपली नाहीं व पुढील ओंव्या उपलब्ध नसल्यानें ही यादी आणखी किती लांब होती हें सांगतां येत नाहीं. या यादीवरून चांगदेवाच्या काळीं हा पंथ किती पसरला होता व यांत सर्व जातींच्या स्त्री पुरुषांचा कसा समावेश होता एवढें मात्र ठळकपणें नजरेस पडतें. Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com

Loading...

Page Navigation
1 ... 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112