Book Title: Marathi - Tattvasara
Author(s): Changdev Vateshwar
Publisher: Prachya Granth Sangrahalay

View full book text
Previous | Next

Page 9
________________ असलेल्या ग्वाल्हेरींतील एक वागो कोठें ? आजपर्यंत अशा वाण्यांकडे आलेल्या किती तरी पोथ्या तुकडे होऊन पुड्या बांधण्याचे कामी आल्या असतील किंवा भिजवून कुटल्या जाऊन त्या रांध्याच्या टोपल्या होण्याचे कामी लागल्या असतील ? 'भग्न पृष्ट कटि ग्रीव' होऊन लेखकानें पोथी लिहावी, पण तिची किंमत नसणाऱ्यांच्या हातीं पडून तिची अशी दुरावस्था व्हावी, याहून दुसरें दुर्दैव तें कोणतें? पण आनंदाची गोष्ट आहे कीं उशीरानें कां होईना आम्हां लोकांचे डोळे उघडत आहेत व दिवसेंदिवस असे ग्रंथ नष्ट होण्याची भीति कमी होऊन ते संशोधकांचे हाती पडण्याचा संभव अधिकाधिक होत आहे. या तत्वसाराची पोथी १०" X५” आकाराच्या जाड दुपदरी कागदावर काजळी शाईनें लिहिली आहे. प्रत्येक पृष्ठावर अकरापासून चौदापर्यंत ओळी आहेत, म्हणजे सामान्यतः प्रत्येक पृष्ठावर बारापासून पंध्रापर्यंत ओंव्या आहेत. दोन्ही पृष्ठे मिळून एका पत्रावरील ओवीसंख्या पंचवीस ते बत्तीस आहे. मूळ लेखकानें या पोथीचीं अशीं छत्तीस पत्रे लिहिली. पण त्यांपैकी फक्त पंधरा उपलब्ध झालीं. उपलब्ध पत्र पुढीलप्रमाणे :-- पत्रांक . पृष्ठे. १ १ २१ ते ३० ३२ व ३३ ३५ व ३६ ओंवी संख्या. १-- १३ = १३ ५९०-- ८८१ = २९२ ९१२ - ९६५ = ५४ ९९२ – १०३६ = ४५ १५ २९ लेखकानें ही पोथी १४८३ शकांत दुर्मति संवत्सरी आषाढ शुद्ध १ शुक्रवारी पाथरी मुक्कामीं लिहिली आहे. लेखकाचें नांव बोप्प पाठक असें आहे. ४०४ पत्र नं. ३६ वर मूळ लेखकानें आपलें नांव, गांव व लेखनकाल सांगितला आहे. वटेश्वराचा शिष्य चांगदेव हा या तत्वसाराचा लेखक असून ग्रंथाचा लेखनकाल शालिवाहन शक १२३४ परिधावी संवत्सर आहे. हरिश्चंद्र नांवाच्या Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com

Loading...

Page Navigation
1 ... 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 ... 112