Book Title: Marathi - Tattvasara
Author(s): Changdev Vateshwar
Publisher: Prachya Granth Sangrahalay

View full book text
Previous | Next

Page 8
________________ चांगदेव वटेश्वराचा " तत्वसार. "" उपोद्र्घात सन १९३३ च्या आक्टोबरमधील गोष्ट. ग्वाल्हेर सरकारनें सुरू केलेल्या प्राच्यवाङ्मय ग्रंथसंग्रहालयाचें काम चालविणाऱ्या श्री. के. ब. डोंगरे यांचे घरीं कांहीं जुन्या पोथ्या पहात असतांना एका वाण्याकडून रद्दी म्हणून विकत आणलेल्या एका गट्ट्यांतलीं दोन पाने माझ्या दृष्टीस पडली. त्यांतील मजकूर ओंवीबद्ध असून त्यांची भाषा जुन्या वळणाची वाटल्यानें मी कारकुनास त्याच प्रकारची सगळी पाने गोळा करावयास सांगितली. शेवटलें पान पहातां पहातां 'श्रीवटेश्वरार्पणमस्तु' हा शेवट पाहून थोडें आश्चर्य वाटलें. "ऐसी चतुर्विध भक्ती रसाळ । वोविया दसाउशत रत्नमाळ । वाइली वटेश्वर चरणयुगळा । चांगा म्हणे" ही शेवटली ओंवी पाहून उत्सुकता वाटली व “शके चौतिसें बारा । परिधावी संवत्सरा। मार्गशिर शुद्ध तीज रविवार । नाम संख्य ।" ही ओंवी वाचून ज्ञानेश्वर समकालीन चांगदेवाचाच हा ग्रंथ असावा ही खात्री वाटून विलक्षण आनंद झाला. हा ग्रंथ पुरा मिळावा म्हणून पुष्कळ खटपट केली पण ती सिद्धीस गेली नाहीं. नागपूर येथें सन १९३३ च्या अखेरीस जें मराठी साहित्य संमेलन झालें त्यांतील प्रदर्शनांत या ग्रंथाची जितकीं पाने मिळाली तितकीं ठेवलीं व प्रो. पोतदारांसारख्या इतिहास संशोधकांची ग्रंथाच्या प्राचीनत्वाबद्दल खात्री झाल्यावर प्राच्य ग्रंथसंग्रहालयाच्या ग्रंथमालेंत प्रथम पुष्प म्हणून या त्रुटित ग्रंथाचें प्रकाशन व्हावयाचें ठरलें. त्याप्रमाणें हें खंडित का होईना पण दुर्मिळ पुष्प आज महाराष्ट्र रसिकांपुढे सादर केलें जात आहे. जुन्या ग्रंथांचा कोठे, केव्हां व कसा शोध लागेल, हें सांगतां येत नाहीं. आतांच पहाना, तापी तीरीं राहणारा चांगदेव कोठें व महाराष्ट्रापासून दूर अंतरावर Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com

Loading...

Page Navigation
1 ... 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 ... 112