Book Title: Marathi - Tattvasara Author(s): Changdev Vateshwar Publisher: Prachya Granth Sangrahalay View full book textPage 6
________________ या संग्रहालयाची आतां कायमची व्यवस्था सरकारांतून झाली असून राज्यांतील लोकांकडे गाबाळांत पडल्यामुळे मागे पुढे नष्ट होणारे व तसेच मालकांस तादृश उपयोग नसूनहि नुसते जतन करून ठेविलेले प्राचीन दुर्मिळ ग्रंथ, मालकाच्या इच्छेप्रमाणे विनामूल्य किंवा योग्य मोबदला देऊन हस्तगत केले आहेत. तसेंच राज्याबाहेर जालवण, गुलसराय, मोरट, बनारस, पुणे, त्रावणकोर, या ठिकाणांहूनही असे अनेक ग्रंथ मिळविले आहेत व पुढेही मिळविण्याचे प्रयत्न चालू आहेत. तरी पण ग्रंथ संग्रहालय म्हटले की त्याला असे ग्रंथ मिळतोल तितके मिळविण्याची इच्छाही नेहमीच असावयाची, ही गोष्ट उघड होय. यास्तव ज्यांच्या संग्रही अशा प्रकारचे प्राचीन ग्रंथ असतील त्यांनी ते वर सांगितल्याप्रमाणे फुकट अथवा योग्य किंमत घेऊन देण्याची कृपा केल्यास त्यांचा संग्रहालयांत साभार स्वीकार केला जाईल. तूर्त संग्रहालयांतोल संग्रहोत ग्रंथांपैकी प्रस्तुत "तत्वसार" हा पहिलाच ग्रंथ प्रकाशित होत आहे, व त्यासंबंधाने आवश्यक असलेली सर्व माहिती संपादकाने उपोद्घातांत व टोपांत दिलेलोहि आहे तेव्हां त्याविषयों येथे विशेष लिहिण्याचे अर्थातच कांहीं प्रयोजन नाही. साहित्यप्रेमो लोकांकडून त्याचें अवश्य स्वागत होईल असा भरवसा वाटतो. सरते शेवटी, ज्या कौन्सिलने या संग्रहालयाची सर्व व्यवस्था करून हा ग्रंथ प्रसिद्धीस आणण्याची संधि दिलो त्यांचे आभार मानणे उचित होय. वस्तुतः या ग्रंथाच्या प्रकाशनाचे श्रेय लवकरच आपल्या राज्याची सूत्रे हाती घेणान्या आमच्या महाराजांकडे आहे. त्यांनों दिलेल्या उत्तेजनामुळे हे काम अगोदर हाती घेऊन ते शेवटास नेतां आलें आहे, हे सांगण्यास आनंद वाटतो, व म्हणूनच त्यांच्या कारकिर्दीत या संग्रहालयाचे कार्य चांगले वाढीस लागेल व अधिक चांगले होईल अशी दृढ आशा आहे. मुक्काम लष्कर, ग्वाल्हेर, मंगळवार, ज्येष्ठ वद्य १२, शके १८५८, ता. १६ । जून सन १९३६. ल. भा. मळे, शिक्षण मंत्री. Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.comPage Navigation
1 ... 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 ... 112