Book Title: Marathi - Tattvasara
Author(s): Changdev Vateshwar
Publisher: Prachya Granth Sangrahalay

View full book text
Previous | Next

Page 4
________________ ॥श्री॥ प्राक्कथन. ग्वाल्हेर संस्थानांतील प्रजाजनांचे अनेक प्रकारे हित करणाऱ्या व आपल्या राज्यांत भिन्न भिन्न प्रकारच्या जनहितकारक संस्था स्थापन करणाऱ्या आमच्या क० माधवराव महाराजांच्या मनांत प्राचीन ग्रंथांचा संग्रह करण्याची कल्पना बरीच वर्षे घोळत होती. परंतु त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे त्यांच्या हयातीत या कल्पनेस मूर्त स्वरूप येऊ शकले नाही. निघृण काळाने त्यांना या लोकांतून अकालींच उचलून नेल्याने त्यांच्या अशा कित्येक कल्पना अमूर्तावस्थेतच राहिल्या असतील. प्रस्तुत "प्राच्य ग्रंथसंग्रहा" ची योजनाही, त्यांच्या पश्चात् त्यांच्या ज्या काही अपूर्ण राहिलेल्या आकांक्षा कौन्सिलने यथामति व यथाशक्ति पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, त्यांपैकी एक होय. हा संग्रह कोठे करावा याविषयों बरेच दिवस विचार चालला होता. त्यांत या संग्रहास, अत्यंत प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेली, एका काळी सर्व विद्यांचें व विशेषतः ज्योतिष विद्येचे आद्यपीठ म्हणून नावाजलेली, सप्त पुरोंत अग्रगण्य असलेली, पवित्र उज्जयिनी नगरी योग्य वाटली व त्याप्रमाणे हे ग्रंथ संग्रहालय उज्जयिनीस स्थापन करण्याचे ठरविण्यात आले आणि पुढे सन १९३१ या वर्षी बडोदे संस्थानचे अधिपति श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांनी उज्जयिनीस भेट दिली तेव्हां त्यांनीहि पण, या कार्यास हेच स्थल योग्य अशी आपली संमति दर्शविली. ___ वरील ठरावाप्रमाणे उज्जयिनीस या संग्रहालयाची स्थापना आरंभी शहरांत एका मध्यवस्तीच्या ठिकाणों करून त्यासाठी सोळा सभासदांचें एक व्यवस्थापक मंडळ नेमण्यांत आले. “अल्पारंभः क्षेमकरः" या न्यायाने पहिली दोन वर्षे त्याचे कार्य बहुतेक सावकाशच चालले होते. पुढे सन १९३३ सालों या संस्थेचे चालकत्व श्रीयुत केशवराव डोंगरे यांचे हाती आले व त्यांनी आपल्या धडाडीच्या स्वभावास अनुसरून या कार्यास जोराची चालना दिली. सभासद, Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.com

Loading...

Page Navigation
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 ... 112