Book Title: Marathi - Tattvasara Author(s): Changdev Vateshwar Publisher: Prachya Granth Sangrahalay View full book textPage 5
________________ ग्रंथ - निरीक्षक व संरक्षक, यांची निवड वगैरे सर्वच बाबतींत त्यांनी सुधारणा घडवून आणली असून हल्लीं संग्रहालय स्थानीय माधव कॉलेजच्या भव्य दिवाणखान्यांतील प्रशस्त ग्यालरींत नेलें आहे आणि संग्रहांतील ग्रंथांच्या संरक्षणाचें काम ओघानेंच कॉलेजचे प्रिंसिपॉल श्रीयुत ताटके यांच्या कडे सोंपविण्यांत आले असून तेव्हांपासून या संस्थेवी सारखी भरभराटच होत आहे. आज या संग्रहालयांत ग्रंथांची संख्या सुमारें पांच हजारांवर गेली आहे. या संग्रहालयाच्या स्थापनेचे मुख्य उद्देश तीन आहेत : '== (१) शंभर वर्षा पूर्वीचे संस्कृत, मराठी, पारशी व अरबी हस्तलिखित ग्रंथ एकत्र करावे, (२) जिज्ञासु अभ्यासकांना हवा तेव्हां त्यांचा उपयोग करून घेता यावा, आणि (३) अप्रसिद्ध पण महत्वपूर्ण अशा ग्रंथांचें प्रकाशन व्हावें, हे ते उद्देश होत. ज्ञानाभिवृद्धीच्या दृष्टीनें हे तिन्ही उद्देश अत्यंत लोकोपकारक आहेत हें सांगावयास नकोच. ग्रंथांचा संग्रह करण्यास सुरुवात केली तेव्हां छापवून प्रसिद्ध करण्यास योग्य असे कितीसे ग्रंथ सांपडतील याविषयीं शंकाच होती. परंतु जसजसे ग्रंथ हस्तगत होत गेले तसतशी ही शंका निवृत्त होऊन अशा प्रकारचे ग्रंथ बरेच दिसूं लागले. ज्या ग्रंथाविषयीं हें "प्राक्कथन" आम्हीं लिहीत आहोंत तो ग्रंथ याच मालिकेंतला होय. तो नुसता अप्रकाशितच नव्हे तर अलभ्यहि पण आहे. मराठी भाषेतील सुप्रसिद्ध संत -- कवी श्रीज्ञानेश्वर महाराज यांचे किंवा ( श्रीयुत पांगारकरांच्या लेखाप्रमाणें ) त्यांच्या कनिष्ठ भगिनी श्रीमुक्ताबाई यांचे उपदेशित योगिराज वटेश्वर चांगदेव ( चांगा वटेश्वर) हे या ग्रंथाचे कर्ते होत. मराठी वाङमयांत या ग्रंथाचें नांवदेखील कोणास माहित नव्हतें, व त्यामुळे उपोद्घातांत लिहिल्याप्रमाणें सरस्वतीच्या महाराष्ट्रीय भक्तांतून या ग्रंथकाराची बहुतेक उचलबांगडीच झालेली होती. परंतु हा ग्रंथ उपलब्ध झाल्यावर त्या संबंधानें येथील उत्साही साहित्यसेवक डॉ. दिवेकर यांनीं एक त्रोटक लेख प्रसिद्ध केला व त्यावरून श्रीयुत पांगारकरांनीं आपल्या "मराठी वाङ् मयाच्या इतिहासांत " या ग्रंथाचा आदरपूर्वक उल्लेख करून ग्रंथकाराचा गौरवहि केला आहे. हल्लीं सांपडलेला हा ग्रंथ त्रुटित आहे, पण तो प्रसिद्ध झाल्यावर संपूर्ण ग्रंथ मिळण्याचाहि संभव आहे. Shree Sudharmaswami Gyanbhandar-Umara, Surat www.umaragyanbhandar.comPage Navigation
1 ... 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 ... 112