________________
जाणारे साधक कधीही ज्ञानीपद प्राप्त करू शकत नाहीत. कारण अशा ज्ञानाला वांझोटे ज्ञान म्हटले जाते. खरे ज्ञानी जसे की परम पूज्य दादाश्रींनी स्वतः निश्चय आणि व्यवहार या दोन्ही पंखांना समांतर ठेवून मोक्ष गगनात विहार केला आहे आणि लाखो लोकांनाही करविला आहे. तसेच व्यवहार ज्ञान आणि आत्मज्ञानाची सर्वोत्कृष्ट समज देऊन लोकांना जागृत केले आहे.
प्रस्तुत पुस्तकात जीवन जगण्याची कला, जी परम पूज्य दादाश्रींच्या श्रीमुखातून निघालेल्या बोधकलेला संक्षिप्त रुपात संकलित करण्यात आले आहे. सुज्ञ वाचकांनी अधिक विस्तारपूर्वक जाणण्यासाठी तसेच प्रत्येक व्यक्तीसोबत होणाऱ्या व्यवहारच्या सोल्युशनसाठी दादाश्रींचे मोठे ग्रंथ मिळवून अधिक सखोल समज प्राप्त करणे गरजेचे आहे. आईवडील आणि मुलांचा व्यवहार, पती- पत्नीचा दिव्य व्यवहार, वाणीचा व्यवहार, पैशांचा व्यवहार इत्यादी व्यवहार ज्ञानाविषयी असलेल्या दादाश्रींच्या ग्रंथाचे आराधन करून क्लेशरहित जीवन जगू शकतो.
- डॉ. नीरूबहन अमीनचे जय सच्चिदानंद.
11