________________
दररोज सकाळी किमान पाच वेळा आपण हृदयापासून प्रार्थना केली पाहिजे की ‘प्राप्त मन, वचन, कायेने या जगातील कुठल्याही जीवाला किंचितमात्रही दु:ख न होवो, न होवो,न होवो!' अशी प्रार्थना करून देखील चुकून कुणाला दुःख दिले गेले तर त्यासाठी हृदयपूर्वक पश्चाताप करुन प्रतिक्रमण-प्रत्याख्यान करुन झालेली चूक धुवून टाकल्याने जीवन निश्चितच शांतीपूर्वक व्यतीत होईल.
घरातील आई-वडील आणि मुले यांच्यामधील कटकटीचा अंत योग्य समजमुळेच येईल. यात मुख्य आई-वडिलांनीच समजून घ्यायचे आहे. पराकोटीचा मोह, ममता आणि आसक्तीमुळे मार पडल्याशिवाय राहत नाही आणि शेवटी स्व-परचे अहितही झाल्याशिवाय राहत नाही. मुलांसंबधीची कर्तव्ये आपण पार पाडावी. भावनेच्या आहारी जाऊन अति लाड करणे आणि परिणामी यातना भोगणे टाळले पाहिजे, हिंदोळ्यावर झुलायचे आणि पडायचेही नाही, अशा प्रकारे. परम पूज्य दादाश्रींनी आई-वडील आणि मुलांच्या व्यवहाराची खूप सखोल समज दोघांच्याही मनःस्थितीला चांगल्या प्रकारे समजून उघड केली आहे. ज्यामुळे लाखो लोकांचे जीवन सुधारले आहे !
पती-पत्नीचे एकमेकांवर अतिशय प्रेम असूनही दोघांच्या जीवनात सतत क्लेश बघायला मिळते, पती-पत्नी दोघेही परस्परांच्या हूंफ (आधार,मायेची ऊब) ने इतके घट्ट बांधलेले आहेत की आपसात कितीही भांडण-तंटे होत असले तरी ते पती-पत्नी या नात्याने आयुष्यभर एकत्र राहतात. पती-पत्नीचे आदर्श संबंध कसे असावेत याचे सुरेख मार्गदर्शन दादाश्रींनी अगदी हसत-हसवत केले आहे.
___ सासू-सुनेचा व्यवहार, धंद्यात शेठ-नोकर किंवा व्यापारी-व्यापारी किंवा भागीदारांसोबतच्या व्यवहार सुद्धा आपण क्लेश रहित कसा करू शकतो, यासाठी उत्तम मार्गदर्शन केले आहे.
फक्त आत्मा-आत्मा करून व्यवहाराकडे संपूर्ण दुर्लक्ष करून पुढे