________________
प्रतिक्रमण
१. प्रतिक्रमणाचे यथार्थ स्वरूप मुमुक्षु : माणसाला ह्या जीवनात मुख्यपणे काय करायला पाहिजे?
दादाश्री : मनात जसे असेल, तसे वाणीने बोलावे, तसे वर्तन करावे. आपल्याला जे वाणीने सांगायचे आहे पण मन खराब असेल तर त्याचे प्रतिक्रमण करायचे. प्रतिक्रमण कोणाच्या साक्षीत कराल? तेव्हा म्हणे, ‘दादा भगवान'च्या साक्षीने प्रतिक्रमण करा. हे दिसत आहे ते 'दादा भगवान' नाहीत. हे तर भादरणचे पटेल आहेत, ए.एम.पटेल आहेत. 'दादा भगवान' तर आतमध्ये चौदालोकाचे नाथ प्रकट झालेले आहेत, ते आहे म्हणून त्यांच्या नांवांने प्रतिक्रमण करा, की हे दादा भगवान माझे मन बिघडले त्याबद्दल माफी मागत आहे. मला माफ करा. मी पण त्यांचे नांव घेऊन प्रतिक्रमण करतो.
चांगले कर्म केले त्याला धर्म म्हणतात आणि खराब कर्म केले त्याला अधर्म म्हणतात. आणि धर्म-अधर्मच्या पार जाणे त्याला आत्मधर्म म्हणतात. चांगले कर्म केले म्हणजे क्रेडीट (जमा) होते आणि क्रेडीट भोगण्यास जावे लागेल वाईट कर्म केले म्हणजे डेबीट (उधार) उत्पन्न होते म्हणून डेबीट भोगण्यास जावे लागेल आणि ज्या वही मध्ये क्रेडीट-डेबीट नाहीत, तेथे आत्मप्राप्ति होणार.
मुमुक्षु : या संसारात आलो तर कर्म करावेच लागेल ना? कळतनकळत खराब कर्म झाले तर काय करायचे?
दादाश्री : झाले तर त्याचा उपाय असेल ना मग. नेहमी खराब कर्म