________________
४६
प्रतिक्रमण
१२. सुटतात व्यसने ! ज्ञानींच्या रीतीने प्रश्नकर्ता : मला सिगरेट प्यायची वाईट सवय पडून गेली आहे.
दादाश्री : तर त्याला ‘तू' असे मानायचे की हे चुकीचे आहे, वाईट वस्तु आहे अशी, आणि जर कोणी म्हटले की सिगरेट का पीतोस? तर त्याचे रक्षण नाही करायचे. वाईट आहे असे म्हणायचे. किंवा भाऊ, ही माझी कमजोरी आहे असे म्हणायचे. तर एखाद्या दिवशी सुटणार, नाहीतर नाही सुटणार ती.
आम्ही पण प्रतिक्रमण करतो ना, अभिप्रायापासून मुक्त व्हायलाच पाहिजे. अभिप्राय राहिले त्याची हरकत आहे.
प्रतिक्रमण केले तर तो माणूस उत्तमातील उत्तम वस्तु प्राप्त करतो. अर्थात् हे टेक्निकली आहे, सायन्टिफिकली त्यात जरूरी रहात नाही. पण टेक्निकली जरूरी आहे.
प्रश्नकर्ता : सायन्टिफिकली कशाप्रकारे ?
दादाश्री : सायन्टिफिकली हे त्याचे * डिस्चार्ज आहे, तर मग त्याला गरजच काय आहे?! कारण की तुम्ही वेगळे आहात आणि तो वेगळा आहे. एवढ्या सर्व शक्ति नाहीत या लोकांच्या ! प्रतिक्रमण नाही केले म्हणजे पूर्वीचे अभिप्राय राहून जातात. आणि तुम्ही प्रतिक्रमण केले म्हणजे अभिप्रायापासून वेगळे झाले, ही गोष्ट नक्की आहे ना? !
अभिप्राय जेवढे राहतील, तेवढेच मन राहून जाईल. कारण की मन अभिप्रायमुळे बांधलेले आहे.
आम्ही काय सांगतो की, आता व्यसनी होवून गेला, त्याला माझी हरकत नाही, पण जे व्यसन झाले असेल, त्याचे आता भगवंताकडे प्रतिक्रमण करायचे की हे भगवान! ही दारू नाही प्यायला पाहिजे, तरीसुद्धा पीत आहे. त्याची माफी मागतो आहे. ही दारू पुन्हा नाही पिणार अशी मला शक्ति द्यावी. एवढे कर बाबा. तेव्हा लोक टोकत असतात की तू दारू का पीतोस? अरे, तू त्याला असे करून जास्त बिघडवतोस. त्याचे अहित करत *डिस्चार्ज = बांधलेले कर्म उदयातयेवून सूटतात ते.