________________
७०
प्रतिक्रमण
दादाश्री : असे आहे, कोणाला थप्पड मारली आणि त्याचे जोखिम येते त्यापेक्षा ही मस्करी करण्यात अनंतपटीने जोखिम आहे. त्याची बुद्धि नाही पोहोचली तेथपर्यंत म्हणून तुम्ही आपल्या बुद्धिच्या लाईटने त्याला तुमच्या ताब्यात घेतले.
प्रश्नकर्ता : ज्याला नविन टेप नाही करायचे, त्याच्यासाठी काय मार्ग?
दादाश्री : कुठलेही स्पंदन करायचे नाही. सर्व काही पाहात रहायचे. पण असे होत नाही ना! हे पण मशीन आहे आणि पुन्हा पराधीन आहे. म्हणून आम्ही दुसरा मार्ग दाखवित आहोत की, टेप झाले की लगेच त्याला पुसून टाकले तर चालेल. प्रतिक्रमण हे पुसायचे साधन आहे. त्याने एकाद जन्मामध्ये फेरफार होऊन सर्व (फालतू) बोलण्याचे बंद होऊ शकते.
प्रश्नकर्ता : शुद्धात्माचे लक्ष बसल्यानंतर निरंतर प्रतिक्रमण होतच राहतात.
दादाश्री : म्हणजे तुमची जबाबदारी राहत नाही. जे बोललात त्याचे प्रतिक्रमण झाले म्हणजे जबाबदारी नाही राहिली ना! कडक बोलायचे पण राग-द्वेष रहित बोलायचे. कडक बोलले गेले तर त्वरित प्रतिक्रमण विधि करून घ्यायची.
मन-वचन-कायाचा योग, भावकर्म-द्रव्यकर्म-नोकर्म, चंदुलाल आणि चंदुलालच्या नांवाची सर्व मायापासून भिन्न अशा 'शुद्धात्मा'ला स्मरूण म्हणायचे की, 'हे शुद्धात्मा भगवान, माझ्याने कडक बोलले गेले ती चुक झाली, त्यासाठी त्याची माफी मागत आहे, आणि ती चुक पुन्हा नाही करणार असा निश्चय करीत आहे. ती चुक नाही करण्याची मला शक्ति द्या.' 'शुद्धात्मा'ला स्मरूण किंवा 'दादा'ला स्मरूण म्हणायचे की, 'ही चूक होऊन गेली' अर्थात् ती झाली आलोचना, आणि ती चुक धुवून टाकायची हे प्रतिक्रमण आणि ती चुक पुन्हा नाही करणार असा निश्चय करायचा, ते प्रत्याख्यान आहे.
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण केल्यानंतर आमची वाणी खूपच चांगली होऊन जाणार, ह्या जन्मातच?