________________
प्रतिक्रमण
म्हणून प्रतिक्रमण करणार ना, एक तास जर कुटुंबियांसाठी प्रतिक्रमण करणार, आपल्या कुटुंबातील सर्वांना आठवण करून, सर्व जवळचे धरून, दूर-दूरची सर्व, त्यांचे भाऊ, बायका, त्यांचे काका, काकांची मुलं-मुली, आणि ते सर्वजण, एक फॅमिली (कुटुंब) असेल ना, तर दोन-तीन-चार पिढीपर्यंत, त्या सगळ्यांना आठवून प्रत्येकाचे एक तास प्रतिक्रमण झाले ना, तर आपल्यामधील भयंकर पाप भस्मीभूत होऊन जाणार. आणि आपल्या प्रति त्या लोकांचे मन स्वच्छ होऊन जाणार. म्हणून आपल्या जवळच्यांचे, सगळ्यांचे आठवण करून-करून प्रतिक्रमण करायचे. आणि रात्री झोप लागत नसेल तर त्यावेळी हे ठरवून केले की चालू रहाते. अशी व्यवस्था नाही करीत? अशी ही व्यवस्था, ही फिल्म चालू झाली तर त्यावेळी खूप आनंद होतो. तो आनंद मावत नाही!
कारण की जेव्हा प्रतिक्रमण करतो ना, त्यावेळी आत्माचा संपूर्ण शुद्ध उपयोग असतो. म्हणजे मध्ये कोणाची दखल नसते.
प्रतिक्रमण कोण करतो? चंदुभाई करतो, कोणासाठी करतो ? तेव्हा म्हणे, ह्या कुटुंबियांना आठवून आठवून करतो. आत्मा पाहणारा, तो पाहतच असतो, दुसरी काही दखल च नाही, म्हणून खूप शुद्ध उपयोग राहणार.
हे प्रतिक्रमण एकवेळा करून घेतले होते, माझ्या हजेरीत मी स्वतः करून घेतले होते, खूप वर्षापूर्वीची गोष्ट सांगत आहे आणि ते विषयविकार संबंधीचे प्रतिक्रमण करून घेतले होते. तेव्हा ते करता करता सगळे इतक्या खोलात उतरत, उतरत, उतरले, की ते मग घरी गेल्यावर सुद्धा थांबत नव्हते. झोपेच्या वेळी पण बंध नाही व्हायचे. जेवण करतेवेळी पण बंद नाही व्हायचे. नंतर मग आम्हालाच ते बंद करावे लागले. स्टॉप करावे लागले !! सगळ्यांना जेवतांना पण बंद नाही व्हायचे झोपतांना पण बंद नाही व्हायचे, फसले होते सगळे नाही?! प्रतिक्रमण आपणहून निरंतर दिवस-रात्र चालतच रहायचे. आता प्रतिक्रमण केल्यानंतर 'बंद करा आता दोन तास होऊन गेले' असे सांगण्यात आले, तरीसुद्धा प्रतिक्रमण त्याचे त्याचे चालूच राहते. बंद करायचे सांगितले तरीसुद्धा बंद नाही होत. मशिनरी सगळी चालू होऊन गेली म्हणून, आतमध्ये चालूच राहते.