________________
९६
प्रतिक्रमण
दादाश्री : अतिक्रमण न्युट्रलच आहे. परंतु त्याच्यामध्ये तन्मयाकार होत असतात म्हणून बीज पडते. जर अतिक्रमणामध्ये तन्मयाकार नाही झालात तर बीज पडणार नाही. अतिक्रमण काहीच करून शकत नाही. आणि प्रतिक्रमण तर आपण तन्मयाकार नाही होत तरी पण करतो. चंदुभाई तन्मयाकार होऊन गेले, ते ही तुम्ही जाणायचे आणि तन्मयाकार नाही झाले ते ही तुम्हीच जाणायचे. तुम्ही तन्मयाकार होतच नाही. तन्मयाकार मनबुद्धि-चित्त-अहंकार होत असते. त्याला तुम्ही जाणतात.
प्रश्नकर्ता : तन्मयाकार चंदुभाई झाले तर चंदुभाईला प्रतिक्रमण करण्याचे सांगावे लागेल ना?
दादाश्री : होय. चंदुभाईला प्रतिक्रमण करण्याचे सांगायचे. प्रश्नकर्ता : स्वप्नामध्ये प्रतिक्रमण होऊ शकते?
दादाश्री : होय. खूप चांगले होऊ शकते. स्वप्नामध्ये प्रतिक्रमण होते, हे आता जे होते ना त्यापेक्षा चांगले होतात. आतातर आपण कसे बसे करून टाकतो. स्वप्नामध्ये जे काही होते ना ते सगळे अगदी पुर्ण पद्धतशीर होत असते. स्वप्नामध्ये 'दादा' दिसतात ते असे 'दादा' तर आपण पाहिलेच नसणार असे 'दादा' दिसतात. जागृतिमध्ये असे दादा नाही दिसणार, स्वप्नामध्ये तर खूपच चांगले दिसतील. कारण की स्वप्न हे सहज अवस्था आहे. आणि ही जागृत ती असहज अवस्था आहे.
क्रमिकमार्गमध्ये आत्मा प्राप्त झाल्यानंतर प्रतिक्रमण (करायचे) नसतात. प्रतिक्रमण विष मानले जाते. आपल्या येथे पण प्रतिक्रमण नसतात. आपण प्रतिक्रमण चंदुभाईच्याकडून करवून घेत असतो. कारण की हे तर अक्रम, येथे तर सगळाच माल भरलेला आहे.
आपण तर समोरच्याचा कोणत्या आत्माची गोष्ट करीत आहोत, प्रतिक्रमण करत आहोत, ते माहित आहे का? प्रतिष्ठित आत्माला नाही करीत, आपण त्याच्या मूळ शुद्धात्माला करीत असतो. शुद्धात्माच्या हजेरीत त्याच्या बरोबर हे झाले त्याबद्दल आपण प्रतिक्रमण करीत आहोत. अर्थात् त्या शुद्धात्माजवळ आपण माफी मागत असतो. नंतर त्याच्या प्रतिष्ठित आत्म्याशी आपल्याला काही घेणे-देणे नाही.