________________
९०
प्रतिक्रमण
प्रश्नकर्ता : सूक्ष्म, सूक्ष्मतर... दादाश्री : चूका दिसत जातील.
जेव्हा तुम्ही पूर्ण जीवनाचे प्रतिक्रमण करतात, तेव्हा तुम्ही नाही मोक्षमध्ये की नाही संसारात. तसे तर तुम्ही प्रतिक्रमणच्या वेळी पुर्वीचे सगळे विवरण करतात. मन-बुद्धि- चित्त आणि अहंकार सगळ्यांचे फोन-बीन बंद होतात. अंत:करण बंद होते. त्यावेळी मात्र प्रज्ञा शक्ति एकटीच काम करत असते. आत्मा पण त्यात काहीच करत नाही. हा दोष झाल्यावर झाकला जातो. मग दुसरा लेयर (पड) येणार. असे लेयर वर लेयर येत असतात. नंतर मृत्यु समयी शेवटच्या एका तासामध्ये या सगळ्यांचा ताळेबंद (हिशोब) येणार.
भूतकाळातील सगळे दोष वर्तमानमध्ये दिसतात ते ज्ञानप्रकाश आहे ती मेमरी (स्मृति) नाही.
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमणामुळे आत्मावर इफेक्ट होतो खरा?
दादाश्री : आत्मावर तर काहीही इफेक्ट होत नाही. इफेक्ट झाला तर संज्ञी म्हणावे. हा तर आत्मा आहे, हे हंड्रेड परसेंट डिसाइडेड (शंभर टक्के निश्चित) आहे. जेथे मेमरी नाही पोहचत, तेथे आत्माच्या प्रभावाने होत असते. आत्मा अनंत शक्तिवान आहे ते त्याची प्रज्ञाशक्ति पाताळ फोडून दाखवित असते. ह्या प्रतिक्रमणमुळे तर स्वतःला हलके झाल्याची अनुभूति होते, की आता हलके होऊन गेलो आणि वैर सुटून जाते, नियमानेच सुटून जातात. आणि हे प्रतिक्रमण करण्यासाठी समोरची व्यक्ति प्रत्यक्ष भेटली नाही तरी काही हरकत नाही. ह्यात प्रत्यक्षांच्या सह्यांची गरज नाही. जसे कोर्टात प्रत्यक्षांच्या सह्यांची जरूरी आहे तसे येथे नाही. कारण की हे गुन्हे प्रत्यक्ष (हजेरीत) झालेले नाहीत, हे गुन्हे तर लोकांच्या गैरहजेरीत झाले आहेत. तसा लोकांच्या हजेरीत च झालेले आहे, परंतु हजेरीत सह्या केलेल्या नाहीत, सह्या तर आतल्या राग-द्वेष यांच्या आहेत. ( आतून भाव बिघडल्या मुळे गुन्हे झालेले आहेत.)
एखाद्या दिवशी एकांतात बसले असाल आणि, तेव्हा असे प्रतिक्रमण किंवा असे काही करता, करता, करता आतमध्ये थोडा आत्मानुभव होऊन जातो. त्याचा स्वाद येऊन जातो, त्यालाच अनुभव म्हणतात.