________________
प्रतिक्रमण
७३
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण केले तर नविन * चार्ज' नाही होणार?
दादाश्री : आत्मा कर्ता झाला तर कर्म बांधणार. प्रतिक्रमण आत्मा करत नाही. चंदुभाई करतो आणि तुम्ही त्याचे ज्ञाता-द्रष्टा रहा.
निजस्वरूप प्राप्ति नंतर खरे प्रतिक्रमण होतात. प्रतिक्रमण करणारा हवा. प्रतिक्रमण करवून घेणारा हवा.
आपले प्रतिक्रमण म्हणजे काय? की रहाटचा दोरखंड खोलते वेळी जेवढे तुकडे असतील त्यांना जोडून चांगले करून टाकतो तसे आपले प्रतिक्रमण आहे.
प्रश्नकर्ता : झोपेतून उठल्याबरोबरच प्रतिक्रमण सुरू होतात.
दादाश्री : तो 'प्रतिक्रमण आत्मा' झाला. शुद्धात्मा तर आहे परंतु हा प्रतिष्ठित आत्मा तो 'प्रतिक्रमण आत्मा' होऊन गेला. लोकांचा कषायी आत्मा आहे. दुनियेत कोणी एकपण प्रतिक्रमण करू शकेल असा नाही.
जसे जसे प्रतिक्रमण रोकडा (त्वरित) होत जाते तसे तसे शुद्ध होत जाते. अतिक्रमणच्या समोर रोकडा प्रतिक्रमण केले, तर मन, वाणी शुद्ध होत जाते.
प्रतिक्रमण म्हणजे बियाणेला भाजून पेरणी करणे.
आलोचना, प्रतिक्रमण आणि प्रत्याख्यान म्हणजे रोजच्या जमाखर्चाची ताळेबंदी काढणे.'
जेवढे दोष दिसतात तेवढी कमाई. तेवढे प्रतिक्रमण करणे.
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण नाही होत तो प्रकृतिदोष आहे की अंतराय कर्म आहे?
दादाश्री : तो प्रकृतिदोष आहे आणि हा प्रकृतिदोष सर्वठिकाणी नाही होत. अमुक ठिकाणी दोष होतात आणि अमुक ठिकाणी नाही होत. *चार्ज = नवीन कर्म बांधले जातात.