________________
प्रतिक्रमण
दादाश्री : नाही, प्रतिक्रमण तर जेथे राग-द्वेष होत असेल, ‘फाईल' असेल तेथे करायचे. कढी खारट असेल तर कढीचे प्रतिक्रमण नाही करायचे. परंतु ज्यांनी खारट केली असेल त्यांचे प्रतिक्रमण करायचे. प्रतिक्रमणामुळे समोरच्याची परिणति परिवर्तित होत असते.
लघवी करायला गेलो तेथे एक मुंगी वाहून गेली तर तिचे आम्ही प्रतिक्रमण करतो. उपयोग नाही चुकवायचा. वाहणे हे 'डिस्चार्ज'रूप आहे, पण त्यावेळी अतिक्रमण दोष का झाला? जागृति का मंद झाली? त्याचा दोष लागतो.
वाचनकरते वेळी पुस्तकाला नमस्कार करून म्हणावे की, 'दादा, मला वाचण्याची शक्ति द्यावी.' आणि जर एखाद्या दिवशी विसरून गेलो तर उपाय करावा. दोन वेळा नमस्कार करावे आणि म्हणावे की, 'दादा भगवान, माझी इच्छा नव्हती तरीसुद्धा विसरून गेलो तर त्याची माफी मागत आहे. पुन्हा असे नाही करणार.'
वेळीच विधि करायचे विसरून गेलात, मग आठवण आली तर प्रतिक्रमण करून नंतर विधि करायची.
'डिस्चार्ज' मध्ये जे अतिक्रमण होऊन गेलेले आहेत त्यांचे आपण प्रतिक्रमण करत असतो. समोरच्याला दुःख होणार अश्या 'डिस्चार्ज चे प्रतिक्रमण करायचे. येथे महात्मांचे अथवा दादांचे चांगले केले त्याचे प्रतिक्रमण करायचे नसतात. परंतु बाहेर कोणाचे चांगले केले तर त्याचे प्रतिक्रमण करावे लागते, त्यात तुम्हाला उपयोग चुकल्याचे प्रतिक्रमण करावे लागते.
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण केले तर समोरच्याला पोहचणार?
दादाश्री : समोरच्या व्यक्तिला पोहचते. नरम होत जाईल. त्याला खबर पडो अथवा न पडो. पण त्याचा भाव आपल्या प्रति नरम होऊन जातो. आपल्या प्रतिक्रमणमध्ये तर खूपच परिणाम आहे. एक तास जर केले तर समोरच्यात परिवर्तन होत असतो. जर सर्व विधिवत् झाले तर. आपण ज्याचे प्रतिक्रमण करतो तो आपले दोष तर पाहाणार नाही, परंतु आपल्या प्रति त्याला सन्मान उत्पन्न होणार.