________________
८२
प्रतिक्रमण
निघून गेले सगळे. तर हे जे राहिले आहेत, त्यामधून सुधार होऊ शकतील असे जीव बरेच आहेत, अजून यात बरीच उच्च आत्मा आहेत.
आमच्या विषयी उलट विचार आला तर प्रतिक्रमण करून टाकायचे. मन तर 'ज्ञानीपुरुषचे' पण मूळ खोदून टाकते. मन काय नाही करत? पोळलेले मन समोरच्यालाही पोळून काढते.
प्रश्नकर्ता : 'जे गेलेत ते कोणाचे काही भले नाही करीत.' (असे बोलले)तर भगवान महावीरांचा अवर्णवाद त्यांना पोहचणार ?
दादाश्री : नाही, ते स्वीकारत नाही. त्यामुळे रीटर्न विथ थेंक्स् (साभार परत) दुप्पट होऊन येते. म्हणून स्वतः स्वतःसाठी पुन्हा पुन्हा माफी मागत रहायची. आपल्याला जोपर्यंत तो शब्द आठवत नाही, तोपर्यंत माफी पुन्हा पुन्हा मागत रहायची. महावीरचा अवर्णवाद बोलला असाल तर, माफी पुन्हा पुन्हा मागत रहायची. तर लवकर पुसले जाईल बस. सोडलेला तीर पोहचणार नक्की, परंतु ते स्वीकार नाही करत.
२४. आजीवन प्रवाहामध्ये वाहणाऱ्यांना तारे ज्ञान... प्रश्नकर्ता : आठवण करून पूर्वीचे दोष पाहू शकतो?
दादाश्री : पूर्वीचे दोष खरोखर तर उपयोगानेच दिसणार, आठवण केल्याने नाही दिसणार. आठवण करण्यासाठी तर डोके खाजवावे लागेल. आवरण आले म्हणून आठवण करावी लागते ना? कोणा बरोबर काही भानगड झाली असेल तर त्याचे प्रतिक्रमण करतानां तो हजेर होऊनच जाणार. तो उपयोगच ठेवायचा, आमच्या मार्गामध्ये आठवण करण्याचे काहीच नाही. आठवण करणे हे तर 'मेमरी' (स्मृति) चे आधीन आहे. जे आठवण येत असते ते प्रतिक्रमण करण्यासाठी येत असते, स्वच्छ करण्यासाठी.
या जगातली कोणतीही विनाशी वस्तु मला नाही पाहिजे' असे तुम्ही नक्की केले आहे ना? तरीसुद्धा का आठवण येत असते ? म्हणून प्रतिक्रमण करा. प्रतिक्रमण केल्यानंतर पुन्हा आठवण येते तेव्हा आपण समजून जायचे की अजून ही फिर्याद आहे! म्हणून पुन्हा हे प्रतिक्रमणच करायचे.